परिशिष्ट - विजेते सूची - प्रवेशिका यादी

Submitted by संयोजक on 1 September, 2020 - 11:33

PicsArt_09-02-01.27.17_0.jpg
.... गणपती गेले गावाला .... चैन पडेना आम्हाला .....

मंडळी, गणपती प्रतिष्ठापना ते विसर्जन ११ दिवस उदंड उत्साहात गेले. वेळ कसा गेला ते कळलेच नाही.

पहिल्या दिवसापासून मायबोलीच्या २१व्या गणेशोत्सव उत्सवा निमित्त निरनिराळ्या स्पर्धा, उपक्रम राबविले गेले त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला त्याबद्दल समस्त स्पर्धकांचे, स्पर्धकांना प्रतिक्रियारुपी हुरूप देणाऱ्या वाचक सभासदांचे ही हार्दिक आभार. उपक्रम राबवताना काही चूका झाल्या असतील, काही उत्तरे द्यायची राहून गेली असतील तर त्याबद्दल क्षमस्व.

मंडळी, मागील धावपळीच्या ११ दिवसांत ज्यांना ईच्छा असूनही स्पर्धेत सहभागी होता आले नाही त्यांच्यासाठी स्पर्धेची अंतिम तारीख शनिवार ५ सप्टेंबर २०२० (PST) पर्यंत वाढविण्यात आली आहे.

बालरोप संवर्धन उपक्रमाची अंतिम तारीख पुढील महिन्यातील ५ ऑक्टोबर २०२० ही असेल. बालरोप संवर्धन उपक्रमाची माहिती इथे पाहू शकता. Entries आत्तापासून दिल्यासही हरकत नाही. फक्त धाग्या च्या शीर्षकामधे “बाल-रोप संवर्धन उपक्रम” असे नमूद करावे.

ज्या स्पर्धकांनी प्रवेशिकेत एकाहून जास्त चित्रे/बुकमार्क्स टाकले आहेत त्यांनी कृपया आपआपले धागे संपादन करून स्पर्धेसाठी कोणते चित्र/बुकमार्क घेण्यात यावी याचा उल्लेख करावा. अथवा मुदत संपल्यानंतर ही याचा उल्लेख नसेल तर प्रवेशिकेतील सर्वात पहिले चित्र/ बुकमार्क ग्राह्य धरण्यात येईल. अधिक माहितीसाठी त्या त्या स्पर्धांच्या धाग्यावर जाऊन नियम पाहावे अशी विनंती.

काही अपरिहार्य कारणांमुळे नियोजित स्पर्धा परीक्षक उपलब्ध नसल्यामुळे आपण सर्वच स्पर्धांचा निकाल वैयक्तिक मतदान पद्धतीने घेत आहोत.

----------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धांना आलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामूळे मतदान पद्धत उपलब्ध करताना नेहमीपेक्षा जास्त कालावधी लागला. एखादी प्रवेशिका नजरचूकीने राहून गेली असेल किंवा चूकीची लिंक झाली असेल तर नजरेस आणून द्यावी अशी नम्र विनंती. ह्या तसदीबद्दल मंडळ दिलगिरी व्यक्त करत आहे. एखादी प्रवेशिका चूकीने राहून गेली असेल तर खाली नमूद करावे अशी विनंती. अ‍ॅडमिन ती मतदानामधे समाविष्ट करतील.
मतदानाची अंतिम तारीख : १७ सप्टेंबर २०२० (PST). विजेते घोषीत करण्याची तारीख लवकरच कळवण्यात येईल.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रवेशिकांचे संकलन (मतदानाची लिंक प्रत्येक स्पर्धेखाली करण्यात आलेली आहे.
मतदान सुरू असेपर्यंत तुम्हाला तुमचे मत बदलता येईल. सर्व पर्यांयाच्या खाली "Cancel your vote” हे बटण दिसेल. त्यावर क्लिक करून पुन्हा नव्याने मत देता येईल.

हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क)
1- शुगोल
2- {sariva}" Reversible or 2 in one mask
3- तेजो
4- वृषाली
5- {sariva}
6- Aaradhya
7- sonalisl
8- ओजस
मतदान - हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क)

हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (अ गट)
1- जयु
2- समृद्धी
3- मित
4- ज्वाला
5- mansi kolambe
6- ओजस
7- परी
8- विजयालक्ष्मी
9- गौरी आंबोळे
10- निधी
मतदान - हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (अ गट)

हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (ब गट)
1- neelakshi
2- अमृताक्षर
3- sneha1
4- रिषिकेश
5- जाई
6- अंतरा
7- प्राजक्ता
8- सोनू
9- तेजो
10- धनुडी
11- अस्मिता
12- वृषाली
13- rr38
14- सूर्यगंगा
15- हर्पेन
16- मनिम्याऊ
17- mansi kolambe
18- लतांकुर-
19- मामी
20- ओजस
21- aradhya
22- वृंदा
23- गोल्डफिश
24- समृदधी
मतदान - हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (ब गट)

चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (अ गट)
1- मित
2- मानसी कोळंबे
3- swati_patel- ojal
4- swati_patel- ojasi
5- ओजस
6- ज्वाला
7- देवरूप
8- रित्विक विशे
मतदान - चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (अ गट)

चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (ब गट)
1- जाई
2- चिमु
3- लतांकुर
4- तेजो
5- रिषिकेश
6- मिहिरा
7- अंतरा
8- वृंदा
9- जाई.
10- मी_अस्मिता
11- Piku
मतदान - चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (ब गट)

चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त चित्र स्पर्धा
1- sonalisl- - विराज 
2- ऋन्मेऽऽष - परी
३- रूपाली विशे - पाटील - विवान विशे
मतदान - चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त चित्र स्पर्धा

पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे
1- मोक्षदा मोदक - मंजूडी 
2- खजूर अंजिराचे कुकी मोदक (वावे) 
3- लेसन फॉर लेमन्स - तृप्ती आवटी 
4- शाही मोदक- Sonalisl 
5- रसमलाई मोदक केक - वैष्णवीका 
6- उपवास मोदक/ उपवास शाही मोदक - साक्षी 
7- डिकन्सट्रक्टेड मोदक, सई केसकर 
8- ओरिओ आणि हैप्पी हैप्पी बिस्कीटचे मोदक, Rani 19 
9- ओरिओ-कन्फेटी मोदक 
10- पारंपारिक मोदक - मनीमोहोर 
11- मोदक - साक्षी 
12- मोदक - भरत
13- मिल्कमेड च्या सारणाचे पारंपारीक मोदक - स्मिता श्रीपाद 
14- मंजूताई दुतिरंगी मोदक 
15- तिखट रस्सा मोदक, म्हाळसा 
16- (स्टफ्ड ब्रेड मोदक) - Nilakshi 
17- लो कार्ब प्रोटीन रिच बेक मोदक-mi_anu 
18- (चॉकलेट ब्राउनी मोदक) - ShitalKrishna 
19- निल्सन 
20- ( सुकुर मोदक) - वावे 
21- मोदक बनवणे,उकडीचे मोदक, Urmila Mhatre 
मतदान - पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे

पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा
1- लतांकुर 
2- ओजस 
3- वर्णिता 
4- adm 
मतदान - पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा

पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा
1- मटार-पनीर चंपाकळी 
2- Red Rose Momos - ShitalKrishna 
3- डोसा बाइट्स - साक्षी 
4- स्पेशल टोस्ट सँडविच - Aaradhya 
5- "चिलीगार्लिक नुडल्स" - प्रांजल - जयु 
6- चीझ मसाला डोसा-Mansi kolambe 
7- (कुरडईची भाजी)- sonalisl 
8- बर्ड्स नेस्ट ---Nilakshi 
9- लसंगा/लसानिया ----ओजस 
10 - टोकरी/कटोरी चाट - Aaradhya 
मतदान - पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा

माझा अनुभव -लेखन स्पर्धा - कोविड-१९ लॉकडाऊन
1- ललिता-प्रीति 
2- Aaradhya
3- रूपाली विशे- पाटील 
4- atuldpatil
5- मुग्धमोहिनी 
6- ऋन्मेऽऽष 
7- कविन
8- mi_anu 
9- सीमंतिनी
10- सामोी
11- पाचू 
11- प्राचीन 
12- राहुल बावणकुळे
13- अतरंगी
14- मनीमोहोर
15- विशाल८९
मतदान - माझा अनुभव -लेखन स्पर्धा - कोविड-१९ लॉकडाऊन

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा
१ - अ गट प्रवेशिका
मतदान - श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - अ गट
२- ब गट प्रवेशिका
मतदान - श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - ब गट
======================================
मतदान बंद झाले असून लवकरच विजेत्यांना पारितोषके देण्यात येतील.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धांमधे हिरिरीने भाग घेणार्‍या सर्व स्पर्धकांचे तसेच त्यांना प्रोत्साहनाची थाप देणार्‍या सर्व प्रतिसादकांचे मंडळ आभारी आहे.

हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क) विजेते
१- {sariva}
२- शुगोल
३- Aaradhya

हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (अ गट) विजेते
१- परी
२- गौरी आंबोळे
३- ज्वाला

हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (ब गट) विजेते
१- मामी
२- जाई.
३- सोनू

चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (अ गट) विजेते
१- जय
२- swati_patel- ojal
३- ओजस

चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (ब गट) विजेते
१- रिषीकेश.
२- जाई.
३- मी_अस्मिता

चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त चित्र स्पर्धा विजेते
१- ऋन्मेऽऽष - परी
२- sonalisl- - विराज
३- रूपाली विशे - पाटील - विवान विशे

पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे विजेते
१- साक्षी
२- मनीमोहोर
३- म्हाळसा

पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा विजेते
१- adm
२- वर्णिता
३- लतांकुर

पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा विजेते
१- मटार-पनीर चंपाकळी - सहेली
२- बर्ड्स नेस्ट ---Nilakshi
३- Red Rose Momos - ShitalKrishna

माझा अनुभव -लेखन स्पर्धा - कोविड-१९ लॉकडाऊन विजेते
१- कविन
२- Mi_anu
३- Atrangi

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा अ गट विजेते
१- यतीन माने
नभ्य
२- मल्हार
३- मिताली

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा ब गट विजेते
१- बोकलत
२- Pr@dnya
३- सूतो

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमंतिनी यांना +७८६

गेले दोन वर्षे मी नव्हतो गणोशोत्सवात माबोवर. त्यामुळेही यण्दा जास्त छान वाटले. मुलीलाही पहिल्यांदा भाग घ्यायला लावला. तसेच बायकोलाही पाकृ उपक्रम दाखवून पुढल्यावेळी तिलाही आमंत्रण दिले आहे. त्सेच वय वर्षे ६० च्या वरच्या नागरीकांसाठीही पुढच्या वर्षी स्पर्धा घ्या म्हणतो Happy

सुप्रिया अभिजित यांचे अक्षर मला प्रचंड आवडले... रिझल्ट बघून निराशा झाली.. माझे एकच वोट आहे.. म्हणजे त्यांनी स्वतःलाही वोट दिले नाही?
का वोटिंग प्रोसेस मध्ये ग्लिच आहे?

मी सुद्धा त्यांनाच दिलं मग एकच कसं मिळालं त्यांना?
--- आता चेक केलं, दोन व्होट्स आहेत च्रप्स!

आणि गंमत म्हणजे मला कुणीतरी मत दिलंय हस्ताक्षराला! Uhoh जे मी स्वतःच स्वतःला दिलं नाही.

हस्ताक्षर मध्ये इतक्या एन्ट्री आल्या की मतदान करणाऱ्या लोकांनी बहुधा डोळे मिटून माउस गरारा फिरवून तो जिथे क्लिक झाला तेथे मत टाकले असेल Happy
खूप जणांची जणींची अक्षरं सुंदर होती.पण धागे उघडून पाहून मतदान करायला कंटाळा आला त्यामुळे कोणालाच मत दिले नाही.
मोदक मध्ये 2 एंट्रीज ना जास्त मते मिळालीत ते पूर्ण बरोबर आहे.पण त्या आयडीज चे मोदक इतके यो उच्च आहेत की त्यांनी जज बनावे.स्पर्धक बनू नये Happy
फास्ट फूड मध्ये पब्लिक इंडियन फूड कम्फर्ट झोन मध्ये गेलंय.काही पदार्थ आवडूनही प्रोसेस जमेल का या शंकेने थोड्या भारतीयत्व दाखवणाऱ्या पदार्थास मत.फास्ट फूड मधल्या सगळ्या एन्ट्री एक एक वीकेंड करून बघणार आहे.(कदाचित अनेक वर्षं चालेल हा वीकेंड कार्यक्रम )
बुकमार्क पण लहान मुलांनी इतके मस्त बनवलेत.सगळ्यांना पहिला नंबर देऊन टाका.
मास्क मध्ये पण इतके चांगले चॉईस होते की शेवटी एक निवडून मत द्यावं लागलं.

हस्ताक्षर मध्ये बर्‍याच एन्ट्री छान आहेत.
मला तर खुप सार्‍या आवडल्या...
चिमु,मानसी, सुप्रिया-अभिजीत, ऐश्वर्या देगावकर, आणि एक दोन अतिशयच आवडल्या. पटकन आश्या इतक्याच आठवतात आता, पण अजुन आहेत. असो.
सगळ्यांचे अभिनंदन.
( हस्ताक्षरांपासून व्यक्तीस्वभाव सांगायचा खेळ आठवला, बरीच लोकं यायची विचारायला मला, सगळं गंम्मत म्हणूनच पण बरोबर निघायचं).

मी आताच रिझल्ट बघितले तर परत एकदा जाणवले की मतदान कदाचित गुणवत्तेनुसार न होता लोकप्रियतेनुसार झालेय
>> प्रत्येक स्पर्धेसाठी दोन मतांचा कोटा (एका
प्रवेशिकेला एक मत) ठरवुन दिला तर आवडत्या आयडीला मत दिल्याचे समाधान मिळेल आणि गुणवत्तेलाही न्याय मिळेल. तसेच ज्या स्पर्धेत दोन‌ उत्कृष्ट कलाकृती असतील तेथे दोघांना मत देता येईल. यावेळी अनेक स्पर्धांमधल्या तुल्यबळ कलाकृती पाहुन मत कोणाला द्यावे हा प्रश्न पडत होता.

सगळ्या स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन

<<झाले का विजेते डिक्लेर?>> लेखाच्या शेवटी बघा craps

मतदान - श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - गट अ मध्ये टाय झालाय न यतीन माने अन नभ्य मध्ये मग एकाला विजेता घोषित केले, कळले नाही का?

निदान लहान मुलांमध्ये स्पर्धा नको हे मी खूप आधी बोलले होते, मग जिथे टाय झालाय तिथे विभागून द्यायला काय हरकत आहे

उत्सवात वाद झाले नाहीत पण मतदान प्रक्रियेत घोळ घालून संयोजक स्वतःच ती कमतरता पूर्ण करायचा प्रयत्न करत आहेत अस दिसतेय. आधी पूर्ण प्रवेशिका आधीच मतदान आणि आता विजेते जाहीर करण्यात Wink

तीन नंबर नाही? फक्त एक विजेता?>>>> +1000

दरवर्षी तीन विजेते असतात . यावर्षी काय झालं ?

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सगळ्यांचेही स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन!
व संयोजकांचेही अभिनंदन!
आणि उत्सवात दणकून सहभागी होणाऱ्या सर्व माबोकरांचेही अभिनंदन!

खूप मजा आली व समाधान वाटले यंदाच्या गणेशोत्सवात.

संयोजकांचे अभिनंदन. आणि इतके छान आयोजन केले म्हणून आभार.
खूप वेगवेगळ्या प्रवेशिका पाहायला मिळाल्या.
चित्रकला स्पर्धा जाहीर केल्याने मी माझे चित्रकलेचे सामान हुडकून काढले. प्रवेशिका दिली नाही तो भाग वेगळा. पण १० वर्षांनी ब्रश हातात घेतला. त्यामुळे त्या करता देखील धन्यवाद!

गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या सर्व स्पर्धा व उपक्रम छान होते.त्यामुळे यंदा मी प्रथमच दोन स्पर्धांमधे सक्रीय सहभाग नोंदवला.मजा आली.बऱ्याच गोष्टी बघता आल्या,शिकता आल्या.
संयोजक,सहस्पर्धक,प्रवेशिका वाचणारे,उत्साहाने प्रतिसाद देणारे,मला मतदान करणारे,प्रोत्साहन देणारे...या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

सर्व विजेत्यांचे व संयोजकांचे हार्दिक अभिनंदन. ह्यावेळी सगळ्याच स्पर्धांना उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. हस्ताक्षर स्पर्धेने आरती, श्लोक आणि कथा ज्या इतरवेळी वाचल्या जात नाहीत त्या केवळ हस्ताक्षर चांगले म्हणून वाचले. काही अक्षरे तर एवढी भारी होती की तसा फॉन्ट असता तर बरं झालं असतं असं वाटतंय.
कोविड १९ लेखनस्पर्धेत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या बाजू वाचायला मिळाल्या. इकडे आपण मजेत असताना दुसरा काय परिस्थितीत जगतोय हे ह्या निमित्ताने जाणवले.
पाककृती स्पर्धा म्हणजे जिभेवर अन्याय असतो. म्हणजे कुठेतरी शेवटचा पूर्ण रेसिपीचा फोटो बघून असं वाटत होतं की पटकन उचलून खावं. किंवा बनवणारा चिडवतोय बघ आमच्याकडे कसलं खत्री बेत आहे तुला नाहीच Lol
बुकमार्क प्रकार मला माहित न्हवता पुस्तक वाचायला असल्या भानगडी कोण करेल पण छान बनवली सगळ्यांनी. मास्क पण चांगले बनवलेले सगळ्यांनी.
एवढा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर उत्तेजनार्थ पर्यंत बक्षीस दिले असते तर (मला पण एखादं मिळालं असतं Lol ) चाललं असतं. पण विजेता एकच असतो बाकी मनाचं समाधान Light 1
बुकमार्क मध्ये लहानगट मोठ्या गटापेक्षा जरा जास्त क्रिएटिव्ह वाटला.
पुन्हा एकदा उपक्रम यशस्वी करणाऱ्या संयोजकांचे अभिनंदन.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
प्रत्येक विजेत्या प्रवेशिकेत काहीतरी युएसपी आहे.लोकप्रियता आहेच पण गुणवत्ता पण आहे.निव्वळ लोकप्रियतेवर जिंकले असं नसावं.
मुख्य म्हणजे बऱ्याच प्रवेशिका तले प्रयोग करून बघण्या सारखे सोपे आहेत.(मोदक 21 कळ्या आणि मोदक बाप्पा सोडून )
असेच उपक्रम येत राहोत, वाचनमात्र मंडळीही लेखण्या सरसावून उत्साहाने पुढे येवोत.

संयोजकांचे आभार मतदारांचे धन्यवाद.
सर्वच विजेत्यांचे अभिनंदान
घरात दोन बक्षीसे आली
अर्थात मुलीला या मतदानाबद्दल काही बोललो नव्हतो. तिच्या डोक्यातूनही हे निघून गेलेय आता.
पण आता सर्टिफिकेट मिळेल ते दाखवेन. तेवढेच एक पार्टीचे निमित्त, दोन चार आनंदाचे क्षण. Happy

लहान मुलांमध्ये तरी तीन नंबर काढायला हवे होते असे वाटले. किंबहुना संयोजकांना विनंती आहे की शक्य झाल्यास आम्हा सर्व लहान मुलांना प्रशस्तीपत्र द्या. पार्टीसाठी आणि आनंदी व्हायला ते पुरेसे आहे. मग त्यावर पहिला नंबर लिहिलेले असो वा सहभाग घेतल्याबद्दल असो.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या सर्व स्पर्धा व उपक्रम छान होते. धन्यवाद संयोजक.

भाग घेतलेल्या सगळ्यांचेच अभिनंदन. तुमच्यामुळे इतके छान काही बघायला आणि वाचायला मिळाले.

विजेत्यांचेही अभिनंदन

आणि मत, प्रतिसाद आणि प्रोत्साहन दिलेल्या माबोकरांचे आभार. Happy

सर्व विजेत्यांचे आणि सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन.

भरत यांच्या पोस्टशी सहमत. पहिले ३ क्रमांक काढायला हवे . दरवर्षी तसेच असते.

मी कधी संयोजनात भाग घेतला नाही पण कल्पना नक्कीच करू शकतो की ईतका मोठा स्पर्धेचा घाट घालणे ते सुद्धा आपली कामे सांभाळून हे सोपे नाही. बरेच गोंधळ निव्वळ वेळेअभावीच होत असावेत.
अश्यात मुख्य स्पर्धा गणेशोत्सवाच्या धामधूमीत उत्साहात एक्स्ट्रा एफर्ट घेत होतात. मात्र त्यानंतर पुढच्या मतदानाच्या टप्प्यात थकवा येणे स्वाभाविकच आहे. त्यातही याच धाग्यावर नजर टाकली तर दिसून येते की स्पर्धेला भरभरून मिळालेल्या प्रतिसादाने मतदान प्रक्रियेतही किती काम वाढवले होते. तरीही संयोजक पुरुन उरले. हस्तलेखनाच्या लिंक एकत्र देणे हे सुद्धा एक कमाल होते. त्यामुळे एकूणच संयोजकांनी यंदा जे एफर्टस घेतले आहेत त्याबद्दल त्यांचे कौतुकच नाही तर हॅटस ऑफ करावेसे वाटतेय.

सर्वच स्पर्धकांचे आणि संयोजकांचे अभिनंदन !

ज्यांना जास्त मतं मिळाली ते केवळ टेक्निकली विजेते ठरले आहेत पण इतरांच्या पाककृती, कलाकृती, चित्रं, लेखन, हस्ताक्षर, शिवणकाम सर्वच फार मनापासून आणि उत्तम होतं.

विजेते ठरलेले sariva , परी (ऋन्मेऽऽष), जय (Mansi kolambe), रिषिकेश., साक्षी, Adm, सहेली, कविन, नभ्य (दीप्स), बोकलत या सर्वांचे अभिनंदन! आणि विजेत्यांत एक माझेही नाव आहे म्हणून ज्यांनी मला मतं दिली त्यांचे आणि ज्यांनी ज्यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! __/\__

खूप मस्त झाला यंदाचा गणेशोत्सव!

प्रथम सर्व विजेत्यांचे, स्पर्धकांचे , संयोजकांचे मनापासून अभिनंदन. तसेच समस्त मायबोलीकरांना मनपूर्वक धन्यवाद. त्यांनी सर्व स्पर्धकांना प्रतिसाद देऊन त्यांचा उत्साह वाढवला. खरंतर माझा मायबोलीवरचा हा पहिलाच गणेशोत्सव होता पण मला खरचं इथे नवखेपणा जाणवला नाही. मी खूप आनंदाने इथे सहभागी झाले. सगळ्या स्पर्धकांच्या प्रवेशिका खरचं उत्तम होत्या त्यामुळे मतदान करताना मनाचा थोडा गोंधळ उडाला. सर्व प्रवेशिकांमधून नविन खूप काही शिकायला मिळाले.
पुढील वर्षी येणाऱ्या गणेशोत्सावातील रंगत यावर्षी सारखीच रंगेल अशी आशा बाळगते.

पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन.

दर वर्षीप्रमाणे यावर्षी देखील प्रत्येक स्पर्धेतून ३ विजेते काढण्यात आले आहेत. वेळेअभावी सर्व विजेत्यांची नावे घोषित करण्यास विलंब झाला त्याबद्दल दिलगीर आहोत. सर्व स्पर्धेतील विजेत्यांची नावे अपडेट करण्यात आली आहेत. ज्यांना सारख्या संख्येत मते मिळाली आहेत त्यांना क्रमांक विभागून देण्यात आले आहे. सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

भरगच्च गणेशोत्सवासाठी संयोजकांचे आभार आणि अभिनंदन.

मायबोलीकरांनी वेळोवेळी केलेल्या सूचनांची, काढलेल्या शंकांची तत्पर दखल घेऊन उत्तरे दिल्याबद्दल आणि बदल केल्याबद्दल विशेष कौतुक.

सर्व विजेत्यांचे , सहभागींचेही अभिनंदन.

संयोजक , शेवटची सूचना.
या धाग्याचे शीर्षक बदलून गणेशोत्सव स्पर्धांचा निकाल असे करा.

मु़बै पुण्याबद्दलच्या प्रश्र्नांची बरोबर उत्तरे सांगितलीत का?

ग्रेट
नव्याने भर पडलेल्या सर्व विजेत्यांचे अभिनंदन

मु़बै पुण्याबद्दलच्या प्रश्र्नांची बरोबर उत्तरे सांगितलीत का? >> हो, दिली आहेत उत्तरे.

Pages