
.... गणपती गेले गावाला .... चैन पडेना आम्हाला .....
मंडळी, गणपती प्रतिष्ठापना ते विसर्जन ११ दिवस उदंड उत्साहात गेले. वेळ कसा गेला ते कळलेच नाही.
पहिल्या दिवसापासून मायबोलीच्या २१व्या गणेशोत्सव उत्सवा निमित्त निरनिराळ्या स्पर्धा, उपक्रम राबविले गेले त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला त्याबद्दल समस्त स्पर्धकांचे, स्पर्धकांना प्रतिक्रियारुपी हुरूप देणाऱ्या वाचक सभासदांचे ही हार्दिक आभार. उपक्रम राबवताना काही चूका झाल्या असतील, काही उत्तरे द्यायची राहून गेली असतील तर त्याबद्दल क्षमस्व.
मंडळी, मागील धावपळीच्या ११ दिवसांत ज्यांना ईच्छा असूनही स्पर्धेत सहभागी होता आले नाही त्यांच्यासाठी स्पर्धेची अंतिम तारीख शनिवार ५ सप्टेंबर २०२० (PST) पर्यंत वाढविण्यात आली आहे.
बालरोप संवर्धन उपक्रमाची अंतिम तारीख पुढील महिन्यातील ५ ऑक्टोबर २०२० ही असेल. बालरोप संवर्धन उपक्रमाची माहिती इथे पाहू शकता. Entries आत्तापासून दिल्यासही हरकत नाही. फक्त धाग्या च्या शीर्षकामधे “बाल-रोप संवर्धन उपक्रम” असे नमूद करावे.
ज्या स्पर्धकांनी प्रवेशिकेत एकाहून जास्त चित्रे/बुकमार्क्स टाकले आहेत त्यांनी कृपया आपआपले धागे संपादन करून स्पर्धेसाठी कोणते चित्र/बुकमार्क घेण्यात यावी याचा उल्लेख करावा. अथवा मुदत संपल्यानंतर ही याचा उल्लेख नसेल तर प्रवेशिकेतील सर्वात पहिले चित्र/ बुकमार्क ग्राह्य धरण्यात येईल. अधिक माहितीसाठी त्या त्या स्पर्धांच्या धाग्यावर जाऊन नियम पाहावे अशी विनंती.
काही अपरिहार्य कारणांमुळे नियोजित स्पर्धा परीक्षक उपलब्ध नसल्यामुळे आपण सर्वच स्पर्धांचा निकाल वैयक्तिक मतदान पद्धतीने घेत आहोत.
----------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धांना आलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामूळे मतदान पद्धत उपलब्ध करताना नेहमीपेक्षा जास्त कालावधी लागला. एखादी प्रवेशिका नजरचूकीने राहून गेली असेल किंवा चूकीची लिंक झाली असेल तर नजरेस आणून द्यावी अशी नम्र विनंती. ह्या तसदीबद्दल मंडळ दिलगिरी व्यक्त करत आहे. एखादी प्रवेशिका चूकीने राहून गेली असेल तर खाली नमूद करावे अशी विनंती. अॅडमिन ती मतदानामधे समाविष्ट करतील.
मतदानाची अंतिम तारीख : १७ सप्टेंबर २०२० (PST). विजेते घोषीत करण्याची तारीख लवकरच कळवण्यात येईल.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रवेशिकांचे संकलन (मतदानाची लिंक प्रत्येक स्पर्धेखाली करण्यात आलेली आहे.
मतदान सुरू असेपर्यंत तुम्हाला तुमचे मत बदलता येईल. सर्व पर्यांयाच्या खाली "Cancel your vote” हे बटण दिसेल. त्यावर क्लिक करून पुन्हा नव्याने मत देता येईल.
हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क)
1- शुगोल
2- {sariva}" Reversible or 2 in one mask
3- तेजो
4- वृषाली
5- {sariva}
6- Aaradhya
7- sonalisl
8- ओजस
मतदान - हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क)
हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (अ गट)
1- जयु
2- समृद्धी
3- मित
4- ज्वाला
5- mansi kolambe
6- ओजस
7- परी
8- विजयालक्ष्मी
9- गौरी आंबोळे
10- निधी
मतदान - हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (अ गट)
हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (ब गट)
1- neelakshi
2- अमृताक्षर
3- sneha1
4- रिषिकेश
5- जाई
6- अंतरा
7- प्राजक्ता
8- सोनू
9- तेजो
10- धनुडी
11- अस्मिता
12- वृषाली
13- rr38
14- सूर्यगंगा
15- हर्पेन
16- मनिम्याऊ
17- mansi kolambe
18- लतांकुर-
19- मामी
20- ओजस
21- aradhya
22- वृंदा
23- गोल्डफिश
24- समृदधी
मतदान - हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (ब गट)
चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (अ गट)
1- मित
2- मानसी कोळंबे
3- swati_patel- ojal
4- swati_patel- ojasi
5- ओजस
6- ज्वाला
7- देवरूप
8- रित्विक विशे
मतदान - चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (अ गट)
चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (ब गट)
1- जाई
2- चिमु
3- लतांकुर
4- तेजो
5- रिषिकेश
6- मिहिरा
7- अंतरा
8- वृंदा
9- जाई.
10- मी_अस्मिता
11- Piku
मतदान - चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (ब गट)
चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त चित्र स्पर्धा
1- sonalisl- - विराज
2- ऋन्मेऽऽष - परी
३- रूपाली विशे - पाटील - विवान विशे
मतदान - चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त चित्र स्पर्धा
पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे
1- मोक्षदा मोदक - मंजूडी
2- खजूर अंजिराचे कुकी मोदक (वावे)
3- लेसन फॉर लेमन्स - तृप्ती आवटी
4- शाही मोदक- Sonalisl
5- रसमलाई मोदक केक - वैष्णवीका
6- उपवास मोदक/ उपवास शाही मोदक - साक्षी
7- डिकन्सट्रक्टेड मोदक, सई केसकर
8- ओरिओ आणि हैप्पी हैप्पी बिस्कीटचे मोदक, Rani 19
9- ओरिओ-कन्फेटी मोदक
10- पारंपारिक मोदक - मनीमोहोर
11- मोदक - साक्षी
12- मोदक - भरत
13- मिल्कमेड च्या सारणाचे पारंपारीक मोदक - स्मिता श्रीपाद
14- मंजूताई दुतिरंगी मोदक
15- तिखट रस्सा मोदक, म्हाळसा
16- (स्टफ्ड ब्रेड मोदक) - Nilakshi
17- लो कार्ब प्रोटीन रिच बेक मोदक-mi_anu
18- (चॉकलेट ब्राउनी मोदक) - ShitalKrishna
19- निल्सन
20- ( सुकुर मोदक) - वावे
21- मोदक बनवणे,उकडीचे मोदक, Urmila Mhatre
मतदान - पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे
पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा
1- लतांकुर
2- ओजस
3- वर्णिता
4- adm
मतदान - पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा
पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा
1- मटार-पनीर चंपाकळी
2- Red Rose Momos - ShitalKrishna
3- डोसा बाइट्स - साक्षी
4- स्पेशल टोस्ट सँडविच - Aaradhya
5- "चिलीगार्लिक नुडल्स" - प्रांजल - जयु
6- चीझ मसाला डोसा-Mansi kolambe
7- (कुरडईची भाजी)- sonalisl
8- बर्ड्स नेस्ट ---Nilakshi
9- लसंगा/लसानिया ----ओजस
10 - टोकरी/कटोरी चाट - Aaradhya
मतदान - पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा
माझा अनुभव -लेखन स्पर्धा - कोविड-१९ लॉकडाऊन
1- ललिता-प्रीति
2- Aaradhya
3- रूपाली विशे- पाटील
4- atuldpatil
5- मुग्धमोहिनी
6- ऋन्मेऽऽष
7- कविन
8- mi_anu
9- सीमंतिनी
10- सामोी
11- पाचू
11- प्राचीन
12- राहुल बावणकुळे
13- अतरंगी
14- मनीमोहोर
15- विशाल८९
मतदान - माझा अनुभव -लेखन स्पर्धा - कोविड-१९ लॉकडाऊन
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा
१ - अ गट प्रवेशिका
मतदान - श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - अ गट
२- ब गट प्रवेशिका
मतदान - श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - ब गट
======================================
मतदान बंद झाले असून लवकरच विजेत्यांना पारितोषके देण्यात येतील.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धांमधे हिरिरीने भाग घेणार्या सर्व स्पर्धकांचे तसेच त्यांना प्रोत्साहनाची थाप देणार्या सर्व प्रतिसादकांचे मंडळ आभारी आहे.
हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क) विजेते
१- {sariva}
२- शुगोल
३- Aaradhya
हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (अ गट) विजेते
१- परी
२- गौरी आंबोळे
३- ज्वाला
हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (ब गट) विजेते
१- मामी
२- जाई.
३- सोनू
चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (अ गट) विजेते
१- जय
२- swati_patel- ojal
३- ओजस
चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (ब गट) विजेते
१- रिषीकेश.
२- जाई.
३- मी_अस्मिता
चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त चित्र स्पर्धा विजेते
१- ऋन्मेऽऽष - परी
२- sonalisl- - विराज
३- रूपाली विशे - पाटील - विवान विशे
पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे विजेते
१- साक्षी
२- मनीमोहोर
३- म्हाळसा
पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा विजेते
१- adm
२- वर्णिता
३- लतांकुर
पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा विजेते
१- मटार-पनीर चंपाकळी - सहेली
२- बर्ड्स नेस्ट ---Nilakshi
३- Red Rose Momos - ShitalKrishna
माझा अनुभव -लेखन स्पर्धा - कोविड-१९ लॉकडाऊन विजेते
१- कविन
२- Mi_anu
३- Atrangi
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा अ गट विजेते
१- यतीन माने
नभ्य
२- मल्हार
३- मिताली
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा ब गट विजेते
१- बोकलत
२- Pr@dnya
३- सूतो
प्रवेशिका बाद वगैरे काय
प्रवेशिका बाद वगैरे काय बोलताय? वोट अपील असेल तर भरपूर पोटेनशीयल आहे स्पर्धा अजून जोरदार करण्यात येऊ शकेल..
संयोजक बोला...
असलं पोटेंशियल तरी ते इतरांना
तुमचा लेख छान आहे पण लोक
तुमचा लेख छान आहे पण लोक प्रवेशिकेला नाही आवडत्या आयडी ला वोट करतात असा ट्रेंड आहे...
निनावी प्रवेशिका घ्यायला हव्यात खरे तर.. जिंकल्यावर सांगायचे कोण होता ते..
बादवे वोट चेक करा आता 4 असतील...
>>> माझं धरून ३ मते आहेत मला.
>>> माझं धरून ३ मते आहेत मला.>>> हाहाहा माझंही शेम टू शेम. शेमचे दोन्ही अर्थं धरा ना विंग्रजी व मराठी. माझे मत धरुन ३ LOL
धन्यवाद च्रप्स!
सामो,
ज्याच्याकडे ड्यु आय डीं चे
ज्याच्याकडे ड्यु आय डीं चे सैन्य असेल त्याने मतदान कसे करावे? याबद्दल काही नियम आहेत का? (मनात आलेली एक शंका
)
वीरू >>>
वीरू >>>
संयोजक मी आगबाबूला या
संयोजक मी आगबाबूला या आयडीवरून माझ्या बायकोची प्रवेशिका दिली होती. ती या मतदानाच्या लिस्टमध्ये नाही दिसत. जर नियमात बसत असेल तर ऍड करा, नसेल तर नका ऍड करू.
सीमंतीनी खरंच आहे ना गं..
सीमंतीनी
खरंच आहे ना गं...मला फारसा वेळ नसतो. प्रवेशिका वाचून मग मतदान करायचे. मी आय डी पाहून मत देत नाही. 
>>>>तुमचा लेख छान आहे पण लोक
>>>>तुमचा लेख छान आहे पण लोक प्रवेशिकेला नाही आवडत्या आयडी ला वोट करतात असा ट्रेंड आहे...
निनावी प्रवेशिका घ्यायला हव्यात खरे तर.. जिंकल्यावर सांगायचे कोण होता ते..<<<<<<
अगदी.
कितीतरी नाविन्यपुर्ण प्रवेशिका, काही नवीन आयडींच्या आहेत पण, त्यांना मिळालेली मतं पाहून , दिसतय की हेच करतात लोकं.
अपील करण्यात काय वाईट, आपले नेता लोकं करतात्च की मतदानाला...
सिमंतिनी, तुमचा लॉ़अडॉउनचा लेख उलट खुशखुशित आहे, रटाळ तोचतोचपणा नाहि वाटला इतर लॉकडोउन लेखात दिसला तसा..
हो मलाही आवडला.लॉक डाऊन चे
हो मलाही आवडला.लॉक डाऊन चे लेख म्हटल्यावर एक औदासिन्य, ग्रीम पणा येतोच.सीमंतिनी ने तो अजिबात येऊ दिलेला नाहीये.हे कौशल्य पूर्ण काम.
कितीतरी नाविन्यपुर्ण
कितीतरी नाविन्यपुर्ण प्रवेशिका, काही नवीन आयडींच्या आहेत पण, त्यांना मिळालेली मतं पाहून , दिसतय की हेच करतात लोकं.>> अहो नवीन आय डी च्या खुसखुशीत कॉमेंटला दाद द्यायला पण कंटाळा करतं पब्लीक. वोटींग तो दुरकी बात है.
मी तर स्वतःच स्वतःला मत दिलं
मी तर स्वतःच स्वतःला मत दिलं नाही, मग ओळखीच्या आयडीची काय बिशाद?
म्हणजे मतदान केलं हां, नाहीतर समजाल केलंच नाही.
हस्तलेखन स्पर्धेला मतदान नाही
हस्तलेखन स्पर्धेला मतदान नाही का? श्या!! मी जिंकणार होतो.
मास्क मध्ये आराध्याची लिंक,
मास्क मध्ये आराध्याची लिंक, हे पान पहायची परवानगी नाही असे येतेय
मास्क मध्ये आराध्याची लिंक>>
मास्क मध्ये आराध्याची लिंक>> तो धागा आता सर्वांना दिसेल असा बदल केला आहे.
हस्तलेखन स्पर्धेला मतदान नाही का?>> सर्व मतदानाचे दुवे लेखनात दिले आहेत.
मतदान करायचा धागा हाच की
मतदान करायचा धागा हाच की दुसरा आहे? या धाग्यावर मत कसे द्यायचे?
मतदानाचे धागेच सापडत नाहीत
मतदानाचे धागेच सापडत नाहीत मला तर
लॉकडाउनचा बुकमार्क करुन ठेवलाय. पण दुसरा एकही सापडला नाही.
@देवकी, वर धाग्यात 'मतदान -
@देवकी, वर धाग्यात 'मतदान - हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क)' ....हे आणि असेच मतदान - ... लिहीलेली वाक्य दिसतील तिथे क्लिक केलेत की मतदान धाग्यावर जाल. त्याच लिंक्स आहेत दिलेल्या
कोविड -१९ लॉकडाउन स्पर्धा
कोविड -१९ लॉकडाउन स्पर्धा हे बदलून लॉकडाउन - माझा अनुभव -लेखन स्पर्धा असं काहीतरी करायला हवं.
गणेशोत्सव ग्रुपच्या मुख्य पेजवर गेलं की मतदानाच्या सगळ्या लिंक्स नीट दिसताहेत. इथे ( या धाग्यावर) जरा शोधायला लागतं.
हस्तलेखन स्पर्धेच्या
हस्तलेखन स्पर्धेच्या प्रवेशिका यादीत आणि मतदान धाग्यावर आमची प्रेविशिका काही दिसली नाही... म्हणजे काही कारणाने ती बाद झाली समजायची का?
होईना का बाद, काही हरकत नाही पण नेमके कारण कळाले असते तर बरं झालं असतं.
धन्यवाद कविन.
धन्यवाद कविन.
हाब, गेल्या वर्षीची खुन्नस
हाब, गेल्या वर्षीची खुन्नस काढत असावेत :दिवा घ्या:
हाब, कृपया स्पर्धे मधील नियम
हाब, कृपया स्पर्धे मधील नियम क्रमांक दोन बघ. तुला लक्षात येईल.
हाब, कृपया स्पर्धे मधील नियम
हाब, कृपया स्पर्धे मधील नियम क्रमांक दोन बघ. तुला लक्षात येईल. >> तुम्हीच संयोजकांचा खालचा प्रतिसाद वाचून बघा, तुम्हाला लक्षात येईल.
गणपतीबद्दल लिखाण असल्यामूळे गणेशोत्सवाबद्दलही चालेल. लिहिण्याला किमान किंवा कमाल मर्यादा नाही. तुम्ही दोन?/ चार ओळींचा एक श्लोक लिहू शकता किंवा 'माझ्या लहाणपणी पाहिलेले गणपती विसर्जन' असा चार पानी निबंध लिहू शकता. सुवाच्य हस्ताक्षरामधले मोठे लेख वाचायला कोणाला आवडणार नाहीत, नाही का !
नवीन Submitted by संयोजक on 18 August, 2020 - 17:35
माझी गणेशोत्सोव आणि गणपती विसर्जनाची ठळक आठवण म्हणजे लाऊड स्पीकरवर संध्याकाळी ढणाणा वाजणारी 'जवा नवीन पोपट हा', 'बिलनची नागीन निघाली', 'हाताला धरलंया', 'बुगू बुगू वाजतंय', 'कल्लुळाचं पाणी' अशी गाणी. पुढे लाऊड स्पीकर जाऊन डीजेच्या भिंती आल्या तेव्हाही ही गाणी वाजत... मी तरी कधी चार सहा तास नाचून काढलेल्या गणपती विसर्जनात अथर्वशीर्ष आणि आरत्या म्हंटल्या नाहीत... हीच गाणी रिपीट मोड वर कानांचे पडदे फाटेपर्यंत ऐकली आहेत.
गणपती सोडून ईतरवेळी ही गाणी मी अपवादानेच ऐकली आहेत... मग ही गाणी माझ्या गणेशोत्सोवाच्या आठवणींचा भाग होत नाहीत का?
मला वाटले प्रवेशिका 'गाण्याच्या प्रताधिकाराचा भंग' नियमावर बोट ठेऊन बाद केली असेल.
बाद करायला हरकत नाही. पण ,'ह्या अमुक कारणासाठी ग्राह्य धरता येणार नाही', हा पारदर्शीपणा संयोजक वेळीच दाखवू शकले असते.
असो..
मी तरी कधी चार सहा तास नाचून
मी तरी कधी चार सहा तास नाचून काढलेल्या गणपती विसर्जनात अथर्वशीर्ष आणि आरत्या म्हंटल्या नाहीत... हीच गाणी रिपीट मोड वर कानांचे पडदे फाटेपर्यंत ऐकली आहेत.
>>>>>>
+७८६
याला अनुमोदन
कदाचित हा आदर्श गणेशोत्सव नसेल, पण धमाल यातही होतीच. आणि तेवढीच मजा आरत्यातही होती.
बाकी पंचांचा निर्णय अंतिम. मला त्यावर भाष्य करायचे नाहीये.
अरेरे हाब यांची प्रवेशिका
अरेरे हाब यांची प्रवेशिका नाही घेतली??
संयोजक मंडळी - आता भोगा आपल्या कर्माची फळे
गणेशोत्सवाचं आयोजन
गणेशोत्सवाचं उत्तम आयोजन केल्याबद्दल संयोजकांच कौतुक आणि आभार! सगळ्या वयोगटांसाठी सर्वसमावेशक स्पर्धा आणि उपक्रम ठेवल्यामुळे प्रतिसादही भरभरून लाभलेला दिसला. ( तितका उत्साह मतदानात दिसला नाही हेमावैम. )
)
....आणि त्यामुळेच विशेषतः मोदक, हस्ताक्षर , बुकमार्क या स्पर्धांना मतदान करताना एका पेक्षा अधिक पर्याय आवडले तेव्हा बाकीच्या स्पर्धकांवर अन्याय होतोय का अशी रुखरुख लागून राहिली. प्रवेशिकांची संख्या जास्त असल्यामुळे त्या प्रमाणात २ किंवा ३ मतं देता आली असती तर ? (एकाच व्यक्तीला ३ मतं नव्हेत
मोदक स्पर्धेत तिखट आणि गोड किंवा पारंपरिक आणि आधुनिक (?) अशी वेगवेगळी कॅटेगरी चालली असती.
लहान मुलांच्या स्पर्धेत क्रमांक न ठेवता सगळ्याच बाल स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक दिले तर मुले हिरमुसणार नाहीत आणि पुढच्या स्पर्धेत त्यांचा सहभागी होण्याचा त्यांचा उत्साह टिकून राहील. या उद्देशाने मी तिथे मतदान केलं नाही.
अर्थात मतदान करता करता मनात आलेले विचार आहेत हे. संयोजकांचं आयोजनाचं स्वातंत्र्य मान्य आहेच! वरचे प्रतिसाद वाचायला वेळ झाला नाही तेव्हा असेच इतर आणखी कोणाला वाटले असल्यास कल्पना नाही.
सहभाग शक्य नव्हता पण जमेल तेव्हा उपक्रमाचा आनंद नक्कीच लुटला. पुनश्च आभार!
चंद्रा +१
चंद्रा +१
एकापेक्षा अधिक मतं देण्याची सोय हवी होती.
चंद्रा +१
चंद्रा +१
लहान मुलांच्या स्पर्धेत क्रमांक न ठेवता सगळ्याच बाल स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक दिले तर मुले हिरमुसणार नाहीत आणि पुढच्या स्पर्धेत त्यांचा सहभागी होण्याचा त्यांचा उत्साह टिकून राहील. या उद्देशाने मी तिथे मतदान केलं नाही. + १
Pages