पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा- चीझ मसाला डोसा

Submitted by Mansi kolambe on 31 August, 2020 - 08:03

चीझ मसाला डोसा
कृती-
डोश्याच्या पिठासाठी- 2 कप तांदूळ, 1 कप उडीद डाळ रात्रभर भिजवून ठेवावी. नंतर मिक्सर ला लावून नेहमीच्या डोश्याच्या पिठासारखे पीठ बनवावे. आणि तव्यावर दोषे बनवून घ्यावे.
चटणीसाठी- 1 वाटी पुदिना आणि 1 वाटी कोथिंबीर, 2 चमचे दही, 3 हिरव्या मिरच्या, काळं मीठ आणि साधं मीठ मिक्सर ला लावून चटणी बनवून घ्यावी.
बटाटयाच्या भाजीसाठी- 4-5 उकडलेले बटाटे, मिरची लसूण अद्रक यांची जाडसर वाटून पेस्ट करावी. पॅन मध्ये तेल तापल्यावर जिरे, मोहरी आणि ही पेस्ट परतून घ्यावी. 1 कप चिरलेला कांदा टाकून 10 मिन लो फ्लेम वर परतून घ्यावा. आता हिंग, हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून परतावे आणि मॅश केलेला बटाटा टाकून परतून घ्यावे. वरून चिरलेली कोथिंबीर टाकावी.
आता बनवलेला डोसा घेऊन त्यावर या भाजीचा लेअर पसरवावे. नंतर आवडीप्रमाणे चीझ चा थर द्यावा आणि डोश्याचा रोल बनवावा.
IMG-20200830-WA0027.jpgIMG-20200830-WA0026.jpgIMG-20200830-WA0028.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
पण या फास्तफूडला जास्त वेळ आणि पूर्वतयारी लागेल ना

मुलांना आवडेल चीज डोसा.
तसेही आमच्या कडे ईडली/डोसे आठवड्यातून चार वेळा होतात. पीठ असतेच फ्रिजमध्ये.
करून बघेन.

मस्त Happy