मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
काय मिळतं वाचून?
'काय मिळतं रे वाचून?'
किंवा 'कसं काय वाचत बसतो रे एवढा वेळ?'
ह्या अर्थाचे प्रश्न विचारले जातात मला कधीकधी.. म्हणून म्हटलं, जरा शोधून बघू की काय कारणं असतील
दिठी
दिठी म्हणजे दृष्टी. ’आतां आमोद सुनास जालें’ ही अमृतानुभवा’तल्या जीवन्मुक्त-दशा-कथन या नवव्या अध्यायतली पहिली ओवी. सुवासच नाक होतो आणि स्वतःला भोगू शकतो. ध्वनीच कान होतो आणि स्वतःला ऐकू शकतो. आरसा, डोळे आणि दृष्टी एकरूप होतात. त्यांचं अद्वैत होतं. ज्याला भोगायचं आहे आणि जे भोगायचं आहे, ते दोन्ही एकरूप होतात. ज्याला जाणायचं आहे आणि जे जाणायचं आहे, ते एकरूप होतात आणि हा अमृतानुभव असतो.
सुएझची सुटका
“एव्हर गिव्हन” हे मालवाहू जहाज ईजिप्तमध्ये अडकले आहे (हो, अजूनही अडकले आहे पण आता वेगळ्या कारणासाठी). निसर्गाचा अतर्क्यपणा आणि माणसाचे चक्रमपणा ह्याचा उत्तम नमूना ह्या सुटका नाट्यात बघायला मिळाला.ह्या सुटका नाट्याच्या अनुषंगाने काही प्रश्न पडत गेले आणि त्यांची उत्तरे शोधताना जी माहिती हाती आली त्याचे संकलन म्हणजे हा लेख
मुंबईच्या तीन प्रमाणवेळा
मुंबईत एकेकाळी तीन प्रमाणवेळा अस्तित्वात होत्या, अगदी 1955 पर्यंत या प्रमाणवेळा पाळल्या जात होत्या. हे माहीत आहे का? याबद्दल अजून माहिती वाचा या लेखात...
अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ
दर वर्षी फेब्रुवारी महिना हा अमेरिकेत 'ब्लॅक हिस्टरी मंथ' म्हणून साजरा केला जातो. गेली ४०० वर्षं उत्तर अमेरिकेच्या इतिहासाचा मोठा हिस्सा असलेल्या कृष्णवर्णीयांचा इतिहास ४० वर्षांपासून वर्षातला १ महिना सर्वांसमोर येतो. या उपक्रमाची गरज का भासली, काय होता हा ४०० वर्षांचा इतिहास, अमेरिकेच्या जडणघडणीत मोठा वाटा असलेल्या लोकांचा प्रवास कसा झाला आहे याचा आढावा.
ये दुख काहे खतम नही होता बे?
सध्या दुसरा लॉकडाऊनची चर्चा सुरू आहे. पण गेल्या वर्षीच्या पहिल्या लॉकडाउन दरम्यान अनेक लोकांना जे हाल सोसावे लागले त्यातून मदत मिळावी यासाठी अनेक संस्था पुढे आल्या. अमित ढोले यांची साद प्रतिष्ठान ही एक संस्था, लोकांना तयार अन्नाची पॅकेट्स वाटणे ,इथपासून सुरू केलेले काम, हळू हळू रेशन किट वाटणे, बाहेर गावच्या लोकांच्या याद्या करून , त्यांची वैद्यकीय चाचणी करून , त्यांच्या साठी गाड्या अरेंज करणे असे अनेक टप्पे घेत पुढे गेले.
’नायिका महाभारताच्या’
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने आयोजित केलेल्या ’नायिका महाभारताच्या’ या व्याख्यानमालेमध्ये डॉ. सुचेता परांजपे, डॉ. गौरी मोघे आणि डॉ. अरुणा ढेरे या तीन विदुषींची एकूण सहा व्याख्यानं होती. तीन शनिवार-रविवारच्या सकाळी चाललेल्या या व्याख्यानमालेविषयी थोडंसं मनोगत.
मायबोली आयओएस अॅप प्रकाशीत झाले.
मायबोलीचे अँड्रॉईड अॅप प्रकाशीत झाल्या दिवसापासून , iOS अॅप कधी येणार अशी विचारणा सुरू होती.
मायबोलीचे ios अॅप, अॅपल अॅपस्टोअरमधे सगळ्यांंसाठी उपलब्ध आहे.
आयफोन आणि आय पॅड दोन्हीवरही हे अॅप चालेल.
मायबोली अँड्रॉईड अॅप प्रकाशीत झाले
२०१७ मधे मायबोलीची मोबाईल सुलभ आवृती प्रकाशीत झाल्यापासून , मोबाईलवरून मायबोलीवर येणार्यांची संख्या प्रकर्षाने वाढली आहे. मायबोलीचे अॅप असावे अशी सुचना बर्याच मायबोलीकरांकडून येत असते.
मायबोलीचे अँड्रोईड अॅप आजपासून गुगल प्ले स्टोअर मधे सर्वांसाठी उपलब्ध आहे.
२१ व्या वाढदिवसाला मायबोलीकरांची जगाला भेट : maayboli.cc
मायबोलीच्या २१ व्या वाढदिवसाच्या या आनंदाच्या दिवशी, मायबोलीकरांकडून सगळ्या जगाला आपण ही भेट अर्पण करतो आहोत. मायबोली क्रियेटीव्ह कॉमन्स www.maayboli.cc ही साईट आजपासून सुरु होते आहे. अनेक मायबोलीकर छायाचित्रकारांच्या देणगीमुळेच हा प्रकल्प उभा राहिला आहे. ही प्रकाशचित्रे प्रताधिकारमुक्त आहे आणि कुणाचीही परवानगी न देता विनामूल्य ही प्रकाशचित्रे वापरता येतील
क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर्स : निर्वासित मुलांना रिझवणारे ‘जोईज्’
मेझिंगसारखे अनेक विदूषक आपली ही दुर्मिळ पण अस्सल कला जगभरातल्या निर्वासित मुलांसमोर सादर करण्यासाठी झटत आहेत. त्यांना प्रसिद्धी नको आहे, पैसा नको आहे; निर्वासित मुलांच्या चेहर्यांवर हसू फुलावं इतकीच त्यांची इच्छा आहे. मेझिंगसारख्या विदूषकांना एकत्र आणलंय ‘क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर (सीडब्ल्यूबी)’ या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघटनेने.