लेखनस्पर्धा - २०१३
रोहन प्रकाशनच्या सहकार्याने आयोजीत केलेल्या लेखनस्पर्धा २०१३ मधले सर्व लेख इथे वाचायला मिळतील. स्पर्धा आता संपली आहे आणि लेख परिक्षकांकडे गुणांकनासाठी पाठवले आहेत. लवकरच निकाल जाहिर केला जाईल.
'गोष्टी सार्याजणींच्या' : 'मिळून सार्याजणी'तल्या निवडक कथा/a>
'मिळून सार्याजणी' या मासिकाचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष. जगण्याचा अनुभव देणार्या, या मासिकात आजवर प्रसिद्ध झालेल्या अशाच काही निवडक कथांचा संग्रह - 'गोष्टी सार्याजणींच्या'.या संग्रहाच्या सुरुवातीला 'मिळून सार्याजणी'च्या संपादिका डॉ. गीताली वि. मं. यांनी संग्रह प्रकाशित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. संग्रहाला प्रस्तावना लाभली आहे ज्येष्ठ लेखिका-कवयित्री नीरजा यांची.
महिला दिन २०१३
८ मार्च २०१३ ... आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे संयुक्ताचे हे चौथे वर्ष! स्त्रीबाबत समाजाच्या मानसिकतेचा विकास होणे ही फक्त काळाची गरज राहिली नसून स्त्री-स्वास्थ्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे प्रत्येकाची गरज झाली आहे. त्याच दिशेने मार्गक्रमणा करताना, वाटेतल्या अडसरांना ओलांडून पुढे जात असताना जे प्रश्न आपल्या मानसिकतेचा व वर्तनाचा पुनश्च विचार करायला लावतात अशा प्रश्नांचा वेध घेण्याचा व त्यांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या वर्षीच्या महिला दिन उपक्रमात केला आहे.
तेंडुलकर स्मृतिदिन लेखमाला - समारोप
८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
या संमेलनातील निवडक कार्यक्रमांची ध्वनिमुद्रणे इथे आपल्याला ऐकता येतील. महाबळेश्वर येथे पार पडलेल्या ८२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. कौतिकराव ठाले-पाटील यांनी केलेले भाषण खास आपल्यासाठी..
हितगुज दिवाळी अंक २०१३
आपण सगळे ज्याची आतुरतेनं वाट पाहात होतात, तो हितगुज दिवाळी अंक २०१३ आपल्या हाती सोपवताना आमच्या मनात आनंद, उत्कंठा, हुरहुर अशा संमिश्र भावना आहेत. बदलत्या काळात सोहळ्यांत फरक झाले असले, तरी दिवाळीच्या दिवशी अभ्यंगस्नान करून, खुसखुशीत खमंग फराळाबरोबर ’दिवाळीअंक’ हवाच! मराठी मनांत दिवाळीअंकाचं स्थान खास जिव्हाळ्याचं आहे. सणानिमित्त आपल्या भाषेच्या साहित्यात भर घालण्याची अनोखी परंपरा आपण जपतोय, याचा आम्हांला आनंद आहे.
मातृदिन २०१३
'मातृदिन' किंवा 'मदर्स डे' म्हणजे अलिकडच्या पिढीचा आईसाठी असलेला खास दिवस! मातृत्त्वाचा गौरव करणारा जागतिक सणच जणू! "आई" ही संकल्पना थोडी विस्तृत करून केवळ जन्मदात्या आईलाच केंद्रस्थानी न ठेवता, आजच्या युगातील मातेच्या धावपळीच्या जीवनात मुलांच्या संगोपनात साथ देणारे,जन्मदात्या आईच्या गैरहजेरीत "आईच्या" ममतेने, वात्सल्याने तिच्या बाळांची काळजी घेणारे आजी- आजोबा, केअरटेकर्स, पाळणाघरे यांनाही या उपक्रमात सामील करत आहोत.
पपेट्सच्या विश्वात : बाहुलीनाट्यकार सुषमा दातार
''प्रौढत्वी निज शैशवास जपणे'' ह्या आपल्या बाण्याशी प्रामाणिक राहून गेली दोन दशके लोकरंजनाबरोबरच सामाजिक जागृती, पर्यावरण प्रबोधन व मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या कठपुतळीकार आणि ''संवाद''शिल्पी सुषमा दातार यांच्याशी त्यांच्या कठपुतळी कलेविषयी व हातमोजांच्या कठपुतळ्यांचे खेळ करण्याविषयी केलेला हा खास संवाद!
मराठी गझल कार्यशाळा -२
आमच्यासाठी गेला महिनाभर खूप आनंदात, एक प्रकारच्या भारलेल्या मनःस्थितीत गेला. आधी म्हटल्याप्रमाणे जर ते 'वेड' आम्ही तुम्हालाही लावू शकलो असू, तर तेच कार्यशाळेचं यश.
'उत्तम गज़ल लिहिता येणं' हे साध्य खरंच, पण ती लिहिताना आणि वाचतानाही तिचा सर्वांगीण आस्वाद घेता आला, तर तो प्रवास त्या मंज़िलइतकाच, नव्हे त्याहूनही सुंदर होतो. या आनंदयात्रेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!