परिशिष्ट - विजेते सूची - प्रवेशिका यादी

Submitted by संयोजक on 1 September, 2020 - 11:33

PicsArt_09-02-01.27.17_0.jpg
.... गणपती गेले गावाला .... चैन पडेना आम्हाला .....

मंडळी, गणपती प्रतिष्ठापना ते विसर्जन ११ दिवस उदंड उत्साहात गेले. वेळ कसा गेला ते कळलेच नाही.

पहिल्या दिवसापासून मायबोलीच्या २१व्या गणेशोत्सव उत्सवा निमित्त निरनिराळ्या स्पर्धा, उपक्रम राबविले गेले त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला त्याबद्दल समस्त स्पर्धकांचे, स्पर्धकांना प्रतिक्रियारुपी हुरूप देणाऱ्या वाचक सभासदांचे ही हार्दिक आभार. उपक्रम राबवताना काही चूका झाल्या असतील, काही उत्तरे द्यायची राहून गेली असतील तर त्याबद्दल क्षमस्व.

मंडळी, मागील धावपळीच्या ११ दिवसांत ज्यांना ईच्छा असूनही स्पर्धेत सहभागी होता आले नाही त्यांच्यासाठी स्पर्धेची अंतिम तारीख शनिवार ५ सप्टेंबर २०२० (PST) पर्यंत वाढविण्यात आली आहे.

बालरोप संवर्धन उपक्रमाची अंतिम तारीख पुढील महिन्यातील ५ ऑक्टोबर २०२० ही असेल. बालरोप संवर्धन उपक्रमाची माहिती इथे पाहू शकता. Entries आत्तापासून दिल्यासही हरकत नाही. फक्त धाग्या च्या शीर्षकामधे “बाल-रोप संवर्धन उपक्रम” असे नमूद करावे.

ज्या स्पर्धकांनी प्रवेशिकेत एकाहून जास्त चित्रे/बुकमार्क्स टाकले आहेत त्यांनी कृपया आपआपले धागे संपादन करून स्पर्धेसाठी कोणते चित्र/बुकमार्क घेण्यात यावी याचा उल्लेख करावा. अथवा मुदत संपल्यानंतर ही याचा उल्लेख नसेल तर प्रवेशिकेतील सर्वात पहिले चित्र/ बुकमार्क ग्राह्य धरण्यात येईल. अधिक माहितीसाठी त्या त्या स्पर्धांच्या धाग्यावर जाऊन नियम पाहावे अशी विनंती.

काही अपरिहार्य कारणांमुळे नियोजित स्पर्धा परीक्षक उपलब्ध नसल्यामुळे आपण सर्वच स्पर्धांचा निकाल वैयक्तिक मतदान पद्धतीने घेत आहोत.

----------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धांना आलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामूळे मतदान पद्धत उपलब्ध करताना नेहमीपेक्षा जास्त कालावधी लागला. एखादी प्रवेशिका नजरचूकीने राहून गेली असेल किंवा चूकीची लिंक झाली असेल तर नजरेस आणून द्यावी अशी नम्र विनंती. ह्या तसदीबद्दल मंडळ दिलगिरी व्यक्त करत आहे. एखादी प्रवेशिका चूकीने राहून गेली असेल तर खाली नमूद करावे अशी विनंती. अ‍ॅडमिन ती मतदानामधे समाविष्ट करतील.
मतदानाची अंतिम तारीख : १७ सप्टेंबर २०२० (PST). विजेते घोषीत करण्याची तारीख लवकरच कळवण्यात येईल.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रवेशिकांचे संकलन (मतदानाची लिंक प्रत्येक स्पर्धेखाली करण्यात आलेली आहे.
मतदान सुरू असेपर्यंत तुम्हाला तुमचे मत बदलता येईल. सर्व पर्यांयाच्या खाली "Cancel your vote” हे बटण दिसेल. त्यावर क्लिक करून पुन्हा नव्याने मत देता येईल.

हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क)
1- शुगोल
2- {sariva}" Reversible or 2 in one mask
3- तेजो
4- वृषाली
5- {sariva}
6- Aaradhya
7- sonalisl
8- ओजस
मतदान - हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क)

हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (अ गट)
1- जयु
2- समृद्धी
3- मित
4- ज्वाला
5- mansi kolambe
6- ओजस
7- परी
8- विजयालक्ष्मी
9- गौरी आंबोळे
10- निधी
मतदान - हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (अ गट)

हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (ब गट)
1- neelakshi
2- अमृताक्षर
3- sneha1
4- रिषिकेश
5- जाई
6- अंतरा
7- प्राजक्ता
8- सोनू
9- तेजो
10- धनुडी
11- अस्मिता
12- वृषाली
13- rr38
14- सूर्यगंगा
15- हर्पेन
16- मनिम्याऊ
17- mansi kolambe
18- लतांकुर-
19- मामी
20- ओजस
21- aradhya
22- वृंदा
23- गोल्डफिश
24- समृदधी
मतदान - हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (ब गट)

चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (अ गट)
1- मित
2- मानसी कोळंबे
3- swati_patel- ojal
4- swati_patel- ojasi
5- ओजस
6- ज्वाला
7- देवरूप
8- रित्विक विशे
मतदान - चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (अ गट)

चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (ब गट)
1- जाई
2- चिमु
3- लतांकुर
4- तेजो
5- रिषिकेश
6- मिहिरा
7- अंतरा
8- वृंदा
9- जाई.
10- मी_अस्मिता
11- Piku
मतदान - चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (ब गट)

चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त चित्र स्पर्धा
1- sonalisl- - विराज 
2- ऋन्मेऽऽष - परी
३- रूपाली विशे - पाटील - विवान विशे
मतदान - चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त चित्र स्पर्धा

पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे
1- मोक्षदा मोदक - मंजूडी 
2- खजूर अंजिराचे कुकी मोदक (वावे) 
3- लेसन फॉर लेमन्स - तृप्ती आवटी 
4- शाही मोदक- Sonalisl 
5- रसमलाई मोदक केक - वैष्णवीका 
6- उपवास मोदक/ उपवास शाही मोदक - साक्षी 
7- डिकन्सट्रक्टेड मोदक, सई केसकर 
8- ओरिओ आणि हैप्पी हैप्पी बिस्कीटचे मोदक, Rani 19 
9- ओरिओ-कन्फेटी मोदक 
10- पारंपारिक मोदक - मनीमोहोर 
11- मोदक - साक्षी 
12- मोदक - भरत
13- मिल्कमेड च्या सारणाचे पारंपारीक मोदक - स्मिता श्रीपाद 
14- मंजूताई दुतिरंगी मोदक 
15- तिखट रस्सा मोदक, म्हाळसा 
16- (स्टफ्ड ब्रेड मोदक) - Nilakshi 
17- लो कार्ब प्रोटीन रिच बेक मोदक-mi_anu 
18- (चॉकलेट ब्राउनी मोदक) - ShitalKrishna 
19- निल्सन 
20- ( सुकुर मोदक) - वावे 
21- मोदक बनवणे,उकडीचे मोदक, Urmila Mhatre 
मतदान - पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे

पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा
1- लतांकुर 
2- ओजस 
3- वर्णिता 
4- adm 
मतदान - पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा

पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा
1- मटार-पनीर चंपाकळी 
2- Red Rose Momos - ShitalKrishna 
3- डोसा बाइट्स - साक्षी 
4- स्पेशल टोस्ट सँडविच - Aaradhya 
5- "चिलीगार्लिक नुडल्स" - प्रांजल - जयु 
6- चीझ मसाला डोसा-Mansi kolambe 
7- (कुरडईची भाजी)- sonalisl 
8- बर्ड्स नेस्ट ---Nilakshi 
9- लसंगा/लसानिया ----ओजस 
10 - टोकरी/कटोरी चाट - Aaradhya 
मतदान - पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा

माझा अनुभव -लेखन स्पर्धा - कोविड-१९ लॉकडाऊन
1- ललिता-प्रीति 
2- Aaradhya
3- रूपाली विशे- पाटील 
4- atuldpatil
5- मुग्धमोहिनी 
6- ऋन्मेऽऽष 
7- कविन
8- mi_anu 
9- सीमंतिनी
10- सामोी
11- पाचू 
11- प्राचीन 
12- राहुल बावणकुळे
13- अतरंगी
14- मनीमोहोर
15- विशाल८९
मतदान - माझा अनुभव -लेखन स्पर्धा - कोविड-१९ लॉकडाऊन

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा
१ - अ गट प्रवेशिका
मतदान - श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - अ गट
२- ब गट प्रवेशिका
मतदान - श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - ब गट
======================================
मतदान बंद झाले असून लवकरच विजेत्यांना पारितोषके देण्यात येतील.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धांमधे हिरिरीने भाग घेणार्‍या सर्व स्पर्धकांचे तसेच त्यांना प्रोत्साहनाची थाप देणार्‍या सर्व प्रतिसादकांचे मंडळ आभारी आहे.

हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क) विजेते
१- {sariva}
२- शुगोल
३- Aaradhya

हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (अ गट) विजेते
१- परी
२- गौरी आंबोळे
३- ज्वाला

हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे (ब गट) विजेते
१- मामी
२- जाई.
३- सोनू

चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (अ गट) विजेते
१- जय
२- swati_patel- ojal
३- ओजस

चित्रकला स्पर्धा- श्री गणेश (ब गट) विजेते
१- रिषीकेश.
२- जाई.
३- मी_अस्मिता

चित्रकला स्पर्धा- मुक्तहस्त चित्र स्पर्धा विजेते
१- ऋन्मेऽऽष - परी
२- sonalisl- - विराज
३- रूपाली विशे - पाटील - विवान विशे

पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे विजेते
१- साक्षी
२- मनीमोहोर
३- म्हाळसा

पाककृती स्पर्धा २ - नैवेद्यम स्पर्धा विजेते
१- adm
२- वर्णिता
३- लतांकुर

पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा विजेते
१- मटार-पनीर चंपाकळी - सहेली
२- बर्ड्स नेस्ट ---Nilakshi
३- Red Rose Momos - ShitalKrishna

माझा अनुभव -लेखन स्पर्धा - कोविड-१९ लॉकडाऊन विजेते
१- कविन
२- Mi_anu
३- Atrangi

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा अ गट विजेते
१- यतीन माने
नभ्य
२- मल्हार
३- मिताली

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा ब गट विजेते
१- बोकलत
२- Pr@dnya
३- सूतो

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतदानाची तारीख कालपर्यंत होती

मी आताच रिझल्ट बघितले तर परत एकदा जाणवले की मतदान कदाचित गुणवत्तेनुसार न होता लोकप्रियतेनुसार झालेय Sad
अश्यावेळी वाईट वाटते हेही खरे

मला तर मत कॅन्सल करून बदलण्याचा ऑप्शन कधी दिसलाच नाही. आता परत चेक केलं. रिझल्ट पानच दिसतंय, मतदान पान पहाण्याचा पर्यायच दिसत नाही आता.
ब्राउजरचा काही इश्यु असावा का? मी फायरफॉक्स वापरतो.

मतदान कदाचित गुणवत्तेनुसार न होता लोकप्रियतेनुसार झालेय Sad >> असे व्हायला नको खरं तर Sad

आणि १४ तारखेपर्यंत तर लिस्टच अपडेट होत होती. लगेच काय मतदान बंद केले..

प्रवेशिकांच्या यादीच्या खाली कॅन्सल बटण आहे. >> मी बहुतेक रिझल्ट पेज वर शोधत होतो.
आता प्रवेशिका यादीचे पानच दिसत नाहीय.
टाइम झोन IST आहे- Asia -Kolkata.
बदलून बघतो.

भरत, तिथे आता फक्त निकालाचं (कुणाला किती मतं मिळाली याचं) पान दिसतं. प्रवेशिका यादी पान बघण्याचा पर्यायच नाहीय आता.

Screenshot_20200918-121721_Firefox.jpg

>>> मी आताच रिझल्ट बघितले तर परत एकदा जाणवले की मतदान कदाचित गुणवत्तेनुसार न होता लोकप्रियतेनुसार झालेय <<<
ते तर अगदी लक्ख दिसतय, म्हणजे नाविन्य असलेली प्रवेशिका दुर्लक्षित असणे आणि अतिशय सामान्य प्रवेशिकाला प्रतिसाद.. ना त्यात काही कलात्म्क्ता ना काही वेगळी अशी मेहनत...

पुढल्यावेळी, आयडीचे नाव जाहीर न करता स्पर्धा घ्याव्या.

मतदान कदाचित गुणवत्तेनुसार न होता लोकप्रियतेनुसार झालेय
>>>>

मला तर लेखनस्पर्धेतली फक्त ६ मते बघून याचेच जास्त वाईट वाटतेय की माझी लोकप्रियता ढासळली Sad

जोक्स द अपार्ट
यावर एक उपाय आहे
गुप्त मतदान न ठेवता कोणी कोणाला मत दिलेय हे उघड व्हावे. जेणेकरून मत देणारयाची जबाबदारी वाढून एखाद्या परीक्षकासारखी होईल.

लॉकडाउन अनुभव लेखन स्पर्धेसाठी मी मतदान केलं होतं.
तिथे मी cancel vote करून पाहिलं.
आता मतदानाचा पर्याय दिसायला हवा.
तर पुन्हा मतांची आकडेवारी आणि cancel पर्याय दिसले.
मी लक्ष देऊन तीनदा cancel केलं तर एकूण मतं १२९ वरून १२६ झालेली दिसली.
Screenshot_2020-09-18-12-32-59-354_com.android.chrome.jpgScreenshot_2020-09-18-12-39-38-554_com.android.chrome.jpg

मुलांच्या हस्ताक्षर स्पर्धेत मी मतदान केलं नाहीए. तिथे मतदान करण्याच्या आधीची स्थिती दिसतेय.
Screenshot_2020-09-18-12-40-15-219_com.android.chrome.jpg

पुढल्यावेळी, आयडीचे नाव जाहीर न करता स्पर्धा घ्याव्या.
>>>>>
हे कसे शक्य होणार?
सगळ्यांनी आपल्या प्रवेशिका संयोजकांना द्यायच्या आणि ते अपलोड करत बसणार का? वैतागवाणे काम होईल हे..
कि आणखी काही मार्ग आहे?

आणि त्यातही शैली वा संदर्भावरून लोकं ओळखू शकतातच. तसेच एखादा स्पर्धक आपल्या मित्रांना वगैरे आपली प्रवेशिका कोणती हे खाजगीत सांगू शकतोच.

Cancel your vote" बटन दिसतंय, त्या ठिकाणीही कधीच दिसलं नाही मला.
>>>>

मलाही ॲपवरून दिसले नाही कधीच
फक्त मला कधी गरज न पडल्याने मी तक्रार केली नाही.

सर्व उपक्रमानंतर रिझल्ट आधी आणि नंतर ही चर्चा गरजेची असते, नव्हे तसा प्रघातच आहे.

एक उपाय असा की त्या त्या स्पर्धेच्या स्पर्धकांनीच स्वतःच्या गटाकरता परिक्षक होऊन स्वतः सोडून एकमेकांना १० पैकी मार्कं द्यायचे. म्हणजे समजा स्पर्धेत १० स्पर्धकांनी भाग घेतला असेल तर ९ जणं मार्कं देतील. या मार्कांपैकी सर्वांत जास्त आणि सर्वांत कमी मार्कं काढून टाकायचे आणि उरलेल्या सात मार्कांची सरासरी जी येईल ते त्या स्पर्धकाचे अंतीम गुण समजायचे. असे प्रत्येक स्पर्धकाचे अंतीम गुण घेऊन मग क्रमांक लावायचे.

ते तर अगदी लक्ख दिसतय, म्हणजे नाविन्य असलेली प्रवेशिका दुर्लक्षित असणे आणि अतिशय सामान्य प्रवेशिकाला प्रतिसाद.. ना त्यात काही कलात्म्क्ता ना काही वेगळी अशी मेहनत>>>>

हे नेहमीच होते आणि इथेच काय सर्वत्र होते. आपल्या आवडीच्या कलाकाराला मत दिले जाते. मायबोलीवरच्या स्पर्धा खेळीमेळीच्या असतात, त्यामुळे मी दुर्लक्ष करते.

पण मुद्दाम मेहनत घेऊन जे इथे कला सादर करतात त्यांना हा प्रकार दुःखद वाटणार.

स्पर्धा जाहीर झाल्यावर त्यावर साधकबाधक आणि इतर सर्व प्रकारची चर्चा घडवून आणणाऱ्या मायबोलीकरांनी मतदान सुद्धा निःपक्षपातीपणे करायला हवे. पण तसे न होता कायम आवडीच्या व्यक्तीला/आईडीला मत दिले जाते. आजवर असेच झाले आहे, यापुढे बदल घडावे ही अपेक्षा आहे.

परीक्षक पण पुर्ण्पणे , निपक्षःपातीपणे करु शकतील का निवड?
मत देताना, काहीतरी पॅरामीटर्स हवे.
मी इतरत्र, ज्यात परीक्षक म्हणून काम केलेय काही स्पार्धांमध्ये , त्यात,नाविन्य,सहजता, उपल्बधता, वेळ वगैरे गोष्टी बघायचे. असो( हे आ. मा. म.) सगळ्यांनाच रुचावे असे काही म्हणणे नाही पण काही प्रवेशिकांसाठी वाईट वाटले म्हणून लिहिले.
मायबोलीवर, स्पर्धा खेळेमेळीच्याच इराद्याने घेतल्या, तरी मेहनत असतेच. आणि स्पर्धकच नसतील तर काय अर्थ ह्या स्पर्धांना?
ह्यावेळी, मला एकापेक्षा दोन प्रवेशिका आवडल्या एकाच कॅटागरीतील, आणि, त्या प्रवेशिका खुप मेहनत करून केलेल्या, पण मत एकालाच देवु शकले.
कलाकारांना आनंद , उत्साह मिळतो, भले स्पर्धा एक गंमत म्हणून जरी घेतली असली तरी.

ते तर अगदी लक्ख दिसतय, म्हणजे नाविन्य असलेली प्रवेशिका दुर्लक्षित असणे आणि अतिशय सामान्य प्रवेशिकाला प्रतिसाद.. ना त्यात काही कलात्म्क्ता ना काही वेगळी अशी मेहनत>>>>

हे असं नेहमीच होतं नाही का, मला खुप प्रवेशिका आवडल्या असतील आणि त्यातली एखादी माझ्या मैत्रिणीची असेल तर माझं मत तिलाच जाईल ना? आपल्या नकळत हे होऊन जातं.त्यामुळे त्यात चूक बरोबर असं काहीच नसावं असं निदान मला तरी वाटतेय.

मला स्वतःला अल्मोस्ट मतं मिळालीच नाहीयेत, पण मजा आली उपक्रमांमध्ये भाग घेऊन विशेषतः नैवेद्यं , मी व्हेज मध्ये पहिल्यांदा एवढा सगळं एकदम बनवलं, जे मी इतरवेळी कधीच नसतं केलं, सो ओव्हरऑल खूप छान वाटलं

मला यावेळ च्या स्पर्धा आवडल्या.फास्ट फूड मधून चमचमीत च्या भरपूर आयडिया मिळाल्या, ज्या मी एरवी युट्युब वर जाऊन शोधल्या नसत्या.
पुढच्या वर्षी कदाचित रोपटे उपक्रम गणपती च्या आधी एक महिना स्पर्धा म्हणून राबवता येईल आणि मग गणपती नंतर 1 महिन्यांनी सर्वांच्या रोपांची स्पर्धा असे काहीतरी. म्हणजे कॅलरी ची पण टोचणी नको Happy
या वर्षीच्या स्पर्धा मस्त होत्याच.आणि उपक्रमातही मजा आली.नाव गाव फळ फुल मध्ये.सर्व टीम चे आभार.
तसेच नेहमीच्या रेसिपी वेगळ्या पद्धतीने(ज्युनिअर मास्टर शेफ मध्ये तिखट सारखे दिसणारे गोड पदार्थ, गोड सारखे दिसणारे तिखट पदार्थ बनवणे असते तसे काही.) बनवायची स्पर्धा पुढच्या वर्षी घेता येईल.
नेहमीचे पदार्थ, गोड पक्वाने अगदी प्रो प्रमाणे करणाऱ्या अनेक हेड मास्टर गृहिणी इथे अलरेडी आहेत.

लतांकुर प्रतिसाद आवडला.

अनु छान सुचवल्यास एकेक कल्पना.

सगळेच उत्तम होते, मतदान नकोच वाटतं कधी कधी. एकच मत कोणाला द्यायचं प्रश्न पडतो. लहान मुलांच्यात तरी नको होतं मतदान असं वाटतं.

सर्वप्रथम बक्षीस विजेत्यांचे अभिनंदन. जर लोकप्रियतेमुळे बक्षीस मिळाले असेल तर अधिक अभिनंदन. लोकानुरंजन सोपे नसते. बाप्पा मोरया!!
नंतर भाग घेणार्‍या सर्वांचे अभिनंदन. अरे, मजा आली तुमच्यामुळे! नंतर, मतदार राजाचे धन्यवाद. ज्या ५ लोकांनी मला मत दिले त्यांचे अधिक धन्यवाद. तुमच्या रूपात परमेश्वर सापडला मला Happy सुखी झाले. संयोजकांचे आभार. पब्लिक (+मी) खिटखिट करतं पण तसं प्रेमळ असतं. म्हातारपणी आठवावे असे किस्से देतं ;). शेवटी, रिड-ओन्ली मोड वाचकांना धन्यवाद! कुठेतरी तुम्ही वाचत आहात हे फार दिलासा देणारे आहे... मोरया!!! एकूणात धम्माल आली. ह्यावर्षी काहीतरी छान घडलं....

Happy

Pages