लॉक डाऊनच्या कृपेने जरा वेळ मिळतो नेहमीच्या रूटिनमधून तर ब्रेड बनवण्याचे प्रयोग सुरू असतात.
आणी मोदकांचे म्हणाल तर लग्नानंतरच उकडीचे मोदक खाल्लेत. आत्ता आत्ता कुठे थोडे जमतायं करायला.
तर जेव्हा ही स्पर्धा जाहीर झाली तेव्हा ब्रेड आणी मोदक असं काहीतरी फ्युजन करूया असा विचार केला आणी अर्थातच अमलात आणला. तर मायबोलीकर मंडळींसाठी सादर आहे स्टफ्ड ब्रेड मोदक.
यासाठी सारण आणी ब्रेड दोन्ही बनवायचे आहे.
आधी सारण बघूया.
सगळे साहित्य बारीक चिरून घ्यायचे.
सहा सात लसुण पाकळ्या
अर्धा इंच आलं
एक मध्यम कांदा
शिमला मिरची - 1 मध्यम
पत्ताकोबी - अर्धा कप
बीन्स - पाव कप
गाजर- अर्धा कप
कांदापात-
कोथिंबीर
पनीर
मटार
खरं तर भाज्या आपल्या आवडीप्रमाणे आणी कमी जास्त प्रमाणात घेता येतील.
कढईत थोड्या तेलावर आलं, लसुण, कांदा परतायचा.
सगळ्या भाज्या टाकून परतायचे. एक चमचा सोया सॉस, एक चमचा चिली सॉस, मिरी पावडर आणी मीठ घालायचे.
मी झाकण न ठेवता 10/12 मिनीट परतले. फार शिजवायचे नाहीये.
आता ब्रेड.
अर्धा कप कोमट पाण्यात एक चमचा साखर घालून ढवळले. त्यात एक चमचा इंस्टंट यीस्ट घालून दहा मिनीट ठेवले. यीस्ट चांगले फसफसायला पाहीजे.
दोन कप मैदा आणी एक कप कणिक घेतली. चवीनुसार मीठ, पाव कप तेल, थोडे ओरीगैनो आणी यीस्ट घातले. गरजेनुसार थोडे दुध आणी पाणी घालून अगदी सैल कणिक भिजवली आणी जवळपास वीस मिनीटे मळली.
नंतर एका भांड्यात हि कणिक ठेवून क्लिंज फॉईलने झाकून दोन तासांकरता ठेवून दिली.
दोन तासांनी कणिक जवळपास दुप्पट होते. पुन्हा थोडीशी मळून घेतली.
आता कणकेचा छोटा गोळा घेऊन, उकडीच्या मोदकांसारख्या कळ्या पाडून सारण भरले आणी मोदकांचा आकार दिला.
ओव्हनच्या ट्रे ला तेल लावून मोदक ठेवलेत. दोन मोदकांच्या मध्ये थोडी जागा असु द्या.
मोदकांना वरनं ब्रशने दुध लावले.
ओव्हनमध्ये 180 डिग्रीला जवळपास पंचवीस ते तीस मिनीटं लागली.
मोदक ओव्हनच्या बाहेर काढल्यावर अमुल बटर आणी कोथिंबीर मिक्स करून मोदकांना लावले. नंतर दहा ते पंधरा मिनीटे मोदक ओल्या कापडाने झाकून ठेवलेत.
तर करून बघा आणी आवडलेत का ते सांगा.
छान कल्पना
छान कल्पना
भारी आहे. फोटो छान काढलेत
भारी आहे.
फोटो छान काढलेत
फारच भारी , अवनमध्ये मोदकांचे
फारच भारी , अवनमध्ये मोदकांचे तोंड ओपन अप होईल ही भिती आहे... पण करावे वाटतंय. पुष्कळ वेगवेगळ्या स्टफिंग्सना वाव आहे. खूपच छान.
खूप छान.. सुंदर झालेत मोदक
खूप छान.. सुंदर झालेत मोदक
फारच सॉलिड दिसतायत
फारच सॉलिड दिसतायत
एकदम नवी फ्रेश कल्पना
नक्की करून बघणार
सादरीकरण पण आवडलं.
भारी आयडिया!
भारी आयडिया!
खुपच छान, यम्मी दिसताएत
खुपच छान, यम्मी दिसताएत
मस्तंच
मस्तंच .. स्टार्टर म्हणूनही मस्त लागतील
खूप छान दिसत आहेत मोदक..
खूप छान दिसत आहेत मोदक..
अमेझिंग क्रिएटिव्हिटी! झकास
अमेझिंग क्रिएटिव्हिटी! झकास दिसतायत ब्रेड मोदक.
मला plating लाही 10 मार्क extra द्यावेसे वाटले.
तो छोटा क्युट गणपती, लाल जास्वंद आणि ब्रेड मोदक..मस्तच.
फोटो बघूनच आह! असं झाले
फोटो बघूनच आह! असं झाले
अरे वा! इनोव्हेटिव मोदक बन्स!
अरे वा! इनोव्हेटिव मोदक बन्स!
झकास दिसतायत!
मस्त.
मस्त.
स्टफ्ड ब्रेड मोदक मस्त दिसत
स्टफ्ड ब्रेड मोदक मस्त दिसत आहेत.
मस्त क्रिएटीव्ह मोदक.
मस्त इनोव्हेटिव्ह. सुरेख.
छान आहेत मोदक!
छान आहेत मोदक!
कृती आणि प्रेझेंटेशन दोन्ही
कृती आणि प्रेझेंटेशन दोन्ही मस्त!
खुपचं छान सादरीकरण केलंय.
खुपचं छान सादरीकरण केलंय..मोदक पण मस्तच झाले असतील..
बाप्पा खूप क्युट दिसतोय.
अरे कसली सही कल्पना
अरे कसली सही कल्पना
मस्तच ग
फार सुरेख दिसताहेत ब्रेमो। ब्रेड मस्त लुसलुशीत दिसतोय अगदी।
लिहिलयस ही एकदम छान, मुख्य म्हणजे फार क्लिष्ट न करता लिहिलय
फोटो अप्रतिम सुंदर। सगळं प्रेझेंटेशन एक नंबर
कल्पना आणि प्रेझंटेशनमधे पहिला नंबर
खूपच मस्त कल्पना आहे! करून
खूपच मस्त कल्पना आहे! करून बघायला हवे.
Màst कल्पना आणि सादरीकरण.
Màst कल्पना आणि सादरीकरण.
छान आहेत मोदक/मोमो
छान आहेत मोदक/मोमो
एक नंबर भारी आहे हे!!!
एक नंबर भारी आहे हे!!!
चव तर बेस्ट असेलच पण नजरेला सुद्धा मेजवानी आहे
आवडली कल्पना.
आवडली कल्पना.
छान कल्पना
छान कल्पना
मस्त कल्पना आहे. आणि
मस्त कल्पना आहे. आणि execution सुद्धा मस्त
मला आपल्या लिझीकीची आठवण झाली
मला आपल्या लिझीकीची आठवण झाली
फार मस्त कल्पना आहे
फार मस्त कल्पना आहे,प्रेझेंटेशनही खूप आवडलं!
सर्वांगसुंदर! नाविन्यपूर्ण,
सर्वांगसुंदर! नाविन्यपूर्ण, सांगण्याची पंध्दत व सादरीकरण उत्कृष्ट!
नवीन कल्पना. सुंदर करणी, (!)
नवीन कल्पना. सुंदर करणी, (!) सुंदर भरणी (!). सुंदर मांडणी.
Pages