लेखनस्पर्धा -- माझा अनुभव -- कोविड-१९ लॉकडाऊन -- विशाल

Submitted by विशाल८९ on 3 September, 2020 - 11:30

खरं सांगायचं तर मी अनेक वर्षांपासून रोमातील सभासद. पण इतक्या छान लेखांमुळे मलाही लिहावसं वाटलं.

मी एक मध्यमवयीन आणि मध्यमवर्गीय आयटीतील माणूस.कशाचा फार लोड घ्यायचा नाही हा माझा स्वभाव. आई-वडिल, बायको, मुलगा यांच्यासाठी काहीही करायची तयारी. माझं घर, काम, प्रवासाचा छंद आणि काही मित्र हे माझे आयुष्य.

लॅाकडाउन मध्ये माझे काम अफाट वाढले. घरून ॲाफिसचे काम चालूच होते. त्यात घरकाम(केर-फरशी-भांडी-इतर स्वच्छता), बाहेरून सामान आणणे, मुलाशी खेळणं, त्याचा अभ्यास, त्याला रमवणं इत्यादी. आमच्या घरात त्यातल्या त्यात निरोगी व फिट मीच असल्याने जास्तीत जास्त मेहनतीची कामे मी माझ्यावर घेतली.माझीच स्वच्छतेची standards जास्त असल्याने माझा वेळ यात खूप जायचा आणि श्रमही खूप व्हायचे. यातच मला पाठदुखी आणि टाचदुखी सुरू झाली.दर शनिवारी किंवा रविवारी जेवणासाठी एखादा छान पदार्थ ही मी पूर्वीपासून बनवतो जे मी आत्ता पण सुरू ठेवले.

मग आम्ही भांड्यासाठी डिशवॅाशर घेतला. त्यात काही भांडी छान निघत नव्हती.त्यामुळे ती आणि मोठी भांडी घासायचं काम मी माझ्याकडेच ठेवलं.अर्थात ही कामे मी माझी आवड आणि आपलं घर स्वच्छ राहिलं पाहिजे या भुमिकेतूनच करत होतो.

मुलाशी खेळणे, त्याच्या बरोबर वेगवेगळी challenges,tasks,activities,धमाल करणे यात आम्हाला दोघांनाही खूप आनंद मिळतो, मजा येते.

यात सारखं एकत्र राहिल्याने सासू-सुनांची भांडणे सुरू झाली होती. त्यामुळे कधी त्रयस्थ भुमिका घेणे, कधी शांत बसणे, भांडणाचे कारण कोणते काम असेल तर ते आपणच करून टाकणे असं माझं चालू आहे.

यात माझा me time म्हणजे रात्री किंडलवर काहीतरी वाचन करणे आणि अबरचबर खाणे.

यात आपण एकटेच कमावते आहोत याचा आर्थिक ताण ही जाणवत होता. तरीसुध्दा शक्य होईल तिथे आणि शक्य होईल तितकी आर्थिक मदत करणे चालू आहे.

मार्च मधला एक अनुभव लिहीतो.माझा मित्र कॅन्सरने आजारी होता. त्याच्यावर सर्जरी झाली. आणि सर्जरी नंतर त्याला कोरोनाच्या भितीने म्हणा, सर्जन वर कामाचा भार वाढल्याने म्हणा, किंवा त्याची परिस्थिती सुधारण्यासारखी नव्हती म्हणा, पण त्याला अनेकदा विनवणी करून सुध्दा कोणतीही after surgery care/treatment मिळाली नाही आणि त्यात तो गेला. याचे खूप दु:ख तर झालेच पण पुढे काय वाढून ठेवलयं याची जणू चुणूकच मिळाली.

आता maids यायला लागल्यामुळे घरकामाचा ताण बराच कमी झाला आहे. छंद जोपासायला आणि आराम करायला वेळ मिळाला लागला आहे.

कोरोनाने माझ्या क्षमतांची आणि स्वभावाची चांगली ओळख करून दिली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगलं लिहिलं आहे विशाल.यानिमित्ताने रोमातून बाहेर आलात.आता लिहिते व्हा.
एरवी बाहेर जात असलेले सदस्य खूप काळ एकमेकांच्या सहवासात राहायला लागल्याने थोड्याफार होणाऱ्या कुरबुरी हाही महत्वाचा भाग आहे.सगळीकडेच असतात.
बिग बॉस वगैरे सारख्या रिऍलिटि शोज मध्ये लोकांना असेच अनुभव येत असतील.
पाठदुखी टाच दुखी ला योग्य उपचार/फ्लॅट फूट साठीचे खास आकार असलेले सॉक्स घेतलेत का?

धन्यवाद mi_anu, मानव.
mi_anu-धन्यवाद, काळजीबद्दल. कैलास जीवन, मुव्ह, व्यायाम आणि आराम यांनी बरे आहे आता.

सुंदर मनोगत व्यक्त केले आहे. एखादा चांगला किंवा वाईट अनुभव आलेला प्रसंग लिहिला असता तर आणखी वाचनीय झाले असते. या निमित्ताने लेखनास सुरवात झाली हेही नसे थोडके .

धन्यवाद सर्वांना.
किशोरजी, तुम्ही सुचवल्याप्रमाणे बदल केलाय.