पाककृती स्पर्धा ३ - {फास्टफूड स्पर्धा} - - बर्ड्स नेस्ट ---Nilakshi

Submitted by Nilakshi on 29 August, 2020 - 12:03

आज मुलींसाठी संध्याकाळचे खाणे करायचे होते. शिवाय फास्टफूड स्पर्धेत भाग घ्यावा का हा विचार मनात होताच. मग दोन्ही गोष्टींची सांगड घालत हे बर्ड्स नेस्ट बनवले.
हे म्हणजे आपले कटलेट्सच फक्त वेगळ्या रुपात.

IMG-20200829-WA0019.jpg

तर साहीत्य बघुया.
तिन मध्यम उकडलेले बटाटे,
एक चमचा आलं, लसुण, हिरवी मिरची, कोथिंबीरीची पेस्ट,
धणे, जीरे पुड,
चिमुटभर आमचूर आणी गरम मसाला,
पाव कप जरासे वाफवलेले मटारचे दाणे,
एक चमचा कॉर्नफ्लोअर,
चवीनुसार मीठ.
हे साहीत्य एकत्र करून गोळा बनवून घ्या.

IMG-20200829-WA0031.jpg

एका वाटीत कॉर्नफ्लोअर ची किंचित पातळ पेस्ट बनवा.
भाजलेल्या शेवया एका प्लेटमध्ये घ्या.
बटाट्याच्या मिश्रणाचा एक छोटा गोळा घेऊन जरा वाटीसारखा आकार द्या.
IMG-20200829-WA0030.jpg

कॉर्नफ्लोअर च्या पेस्टमध्ये बुडवून शेवयांमध्ये घोळवा. सगळे कटलेट्स बनवून झाल्यावर पंधरा मिनीटे फ्रिजमध्ये ठेवा. नंतर तळून घ्या.
नेस्टमध्ये ठेवलेली अंडी बनवण्यासाठी थोडे पनीर मळून घेतले. मीठ आणी मिरपूड घालून छोटे छोटे गोळे बनवून तळले.
एक नेस्ट घेऊन त्यात थोडी पुदीना चटणी लावली आणी पनीरचे अंडे ठेवले कि बर्ड्स नेस्ट तयार!!

IMG-20200829-WA0021.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर दिसतंय अगदी
(वेलकम पिक्चर च्या स्टाईल मध्ये : भाईसाब ये किस लाईन मे आ गये आप?आयटी छोडकर शेफ बन जाओ)

(वेलकम पिक्चर च्या स्टाईल मध्ये : भाईसाब ये किस लाईन मे आ गये आप?आयटी छोडकर शेफ बन जाओ )>>>हे हे सेकंड ऑप्शन असलेले बरे.

सगळ्यांचे आभार

Chhan.

फार इनोव्हेटिव्ह आणि सुंदर आहे हे 
मुलं तर खुष होतील अगदी
फोटोग्राफि मस्तच एकदम...+1
लेकीला दाखवले तर तू पण करं नं म्हणे Happy

Wow!!

Pages