बुकमार्क स्पर्धा-गोल्डफिश -ब गट

Submitted by गोल्डफिश on 28 August, 2020 - 03:50

माझ्यासारख्या आळशी आणि विसरभोळ्या लोकांसाठी जे पुस्तकाचे पूर्ण पानसुद्धा वाचून संपवत नाहीत आणि शेवटी कोणती ओळ वाचली ते सुद्धा लक्षात राहत नाही अश्याना बुकमार्कबरोबर सेन्टेन्स मार्कची सुद्धा गरज असते. अशांसाठी मी बनवलेला हा गणपती बाप्पा आणि उंदीरमामा यांचा बुकमार्क. यातील उंदीरमामा शिडीवरून खाली वर करतात आणि त्यांची शेपटी आपण शेवटचे कुठपर्यंत वाचलेय ते दर्शवते. तसेच या बुकशेल्फ मध्ये दोन कप्पे आहेत त्यात एखादी नोट उदा. फोन नंबर वैगैरे लिहून ठेऊ शकतो. सध्या मी एकामध्ये मायबोली हे पुस्तक आणि दुसऱ्यात गोल्डफिश पॉन्ड ठेवला आहे.

Bookmark_Goldfish_1.jpg

हे बनवताना लागलेले साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे.
साहित्य
१. केक बॉक्सचा पुट्ठा
२. स्केचपेन , फेविकॉल, कात्री

कृती
१. चित्र काढणे
Drawing.jpg

२. चित्र कापून घेणे
Cutting.jpg

३. आतील संरचना
Atil rachana.jpg

४.चिकटवून झाल्यावर
Chikatavun zalyanantar.jpg

५. रंगवून झाल्यावर
Final.jpg

कसा आहे बुकमार्क ? नक्की प्रतिसादात लिहा.
धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खुपच छान.
कृती सविस्तर सांगितल्याबद्दल धन्यवाद.
तुमच्या पध्दतीने बुकमार्क तयार करायला आवडेल. Happy

सर्व प्रतिसाद्कर्त्यांचे मनःपूर्वक आभार !!! कामात खूप जास्तच व्यस्त असल्यामुळे इतर स्पर्धकांच्या धाग्यांवरसुद्धा प्रतिसाद देता आला नाही. @ मनस्विता >> फिशटँकमधील माशांचे मला जरा जास्तच वेड आहे म्हणून हा आयडी घेतला Happy

फारच वेगळी कल्पना आहे.बुकमार्क मध्ये पेजमार्क बरोबरच लाईन मार्क.
सर्व चित्रं पण सुंदर.

Pages