हस्तकला स्पर्धा - शिवणकाम(मास्क) - Sonalisl

Submitted by sonalisl on 5 September, 2020 - 17:07

कुर्त्याच्या बाह्या ज्या वापरल्या गेल्या नाहीत पण कापड चांगले आहे म्हणून टाकूनही द्याव्याशा वाटल्या नाहीत. अशाच बाह्यांचे कापड वापरून मी मास्क हातशिलाईने शिवला आहे.

बाह्यांचे कापड एकावर एक ठेऊन माझ्याकडे वापरात असलेला मास्क त्यावर ठेऊन पेनाने तसा आकार काढला. मग थोडी जागासोडून तो कापला.
5BA35D1C-F415-4AA3-A581-6791F75D7B36.jpeg
अश्याच मापाने दुसरे कापड कापून घेतले.
त्यानंतर गोलाईचा भाग शिऊन दोन्ही कापडांना (बाह्या आणि अस्तर) एकावर एक ठेवून त्याचे काठ एकसारखे करून शिवले.
आतल्या बाजूने शिवताना...

E0ADDB42-6A99-4D3D-B0E1-E4632009A744.jpeg

मग बाहेरचे कापड आतल्या बाजूस ढकलून त्यात इलॅस्टिक जोडून शिलाई केली.
अचूक मार्गदर्शनासाठी हा व्हिडिओ बघू शकता... https://youtu.be/u4SfTm38GIk
पहिली बाजू...
3B9A0703-BB0E-4161-A194-4FB2A9CB55AF.jpeg
आणि ही दुसरी बाजू...
F031D20F-1676-417E-913C-4A8CFC9F2B06.jpeg

खालच्या फोटोत मापासाठी घेतलेला आणि मी शिवलेला असे दोन्ही मास्क.....

CC6B0C3A-8CCD-42DF-8E11-74D58C4AB167.jpeg

या स्पर्धेच्या निमित्ताने मास्क शिवायचा प्रयत्न केला आणि जमलाही.
आता वर्षभर मास्क वापरायचेच आहेत तर ड्रेसला मॅचिंग मास्क शिवता येतील Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांना मनापासून धन्यवाद!
आत कार्बन फिल्टर घालू शकता का?>>> कडेने थोडी फट ठेवली तर फिल्टर आत घालता येउ शकेल.