हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क)

Submitted by संयोजक on 12 August, 2020 - 17:26

नमस्कार मंडळी,

सध्या जगभर कोरोना या विषाणू ने थैमान घातले आहे. त्यापासून संरक्षणासाठी मास्क ही आजची अत्यंत आवश्यक गोष्ट बनली आहे. काही ठिकाणी मास्क ची मागणी इतकी वाढली की मास्क चा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळेच काही लोकांनी घरीच त्यांच्या मनासारखे मास्क बनवले. काही जणांनी तर साडी, ड्रेस असे कपड्यांना मॅचिंग विविधरंगी मास्क ही बनवले. यातूनच आम्हाला या स्पर्धेची कल्पना सुचली. मायबोलीवर खूप चांगले हौशी कलाकार आहेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्ही फक्त तुमच्या आवडीने बनवलेल्या मास्क चे फोटो टाकायचे.

नियम:

१) मास्क स्वतः बनवलेला असावा. बाजारातून विकत आणलेला मास्क आहे असे आढळून आल्यास प्रवेशिका बाद करण्यात येईल.
२) मास्क चे स्वरूप ठरवायला स्पर्धकाला पूर्ण स्वातंत्र्य आहे.
३) कापड कोणतेही वापरले तरी चालेल. फक्त जर तुम्ही वा इतर कोणीही जर तो मास्क वापरला तर श्वास घेण्यास त्रास होऊ नये असे साहित्य वापरावे. क्रोशे वापरूनही विणू शकता. शिलाई साठी हात शिलाई किंवा मशिन वर केलेली शिलाई ही चालेल.
५) स्पर्धेच्या प्रवेशिका २२ ऑगस्ट २०२० पासून तुम्ही पाठवू शकता. (IST)
६) एक id प्रत्येकी २ प्रवेशिका देऊ शकेल.
७) स्पर्धा महिला आणि पुरुष दोन्ही गटांसाठी खुली आहे.
८) प्रवेशिकेबरोबर मास्क बनवतानाच्या तयारीचे किमान दोन ते तीन प्रकाशचित्र देणे अनिवार्य आहे. पूर्ण झालेल्या मास्क चे एक चांगले प्रकाशचित्र द्यावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे बघता येईल. - https://www.maayboli.com/node/1556
९) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"हस्तकला स्पर्धा - {शिवणकाम} - {तुमचा आयडी}"
१०) स्पर्धेचे विजेते मतदानाद्वारे निवडण्यात येतील आणि 2 क्रिटिक अवॉर्ड असतील.

तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.

!!! गणपती बाप्पा मोरया!!!

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धांच्या पूर्वतयारीला पुरेसा वाव मिळावा म्हणून स्पर्धा नि नियम जाहीर करत आहोत. प्रवेशिका पाठवण्यासाठी प्रतिष्ठापनेनंतर धागे उघडले जातील.

स्पर्धेचे विजेते हे कल्पनाशक्ती, नावीन्य इत्यादी गोष्टींवरून ठरवले जातील.

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह. खरंच.
मी फक्त groups audience - private group.
एवढंच वाचलं.

हवा गाळून सोडणारा चार पदरी घडी केलेला रुमाल वगैरेच खरा मास्क हवेत तरंगणारे विषाणू अडवू शकतो म्हणतात. एका मुलाखतीत एका डॉक्टरने सांगितले की वाल्ववाले काहीच कामाचे नसतात. शोभेचे पातळ मास्क वेगळे आणि कामाचे वेगळे.

आमच्या समोर राहणाऱ्या मुलीचा सापू होता म्हणून तिच्यासाठी, तिच्या नवऱ्यासाठी आणि तिच्या आईसाठी मी एकूण 4 मास्क बनवले पण ते बनवतानाचे फोटो नाहीत माझ्याकडे.

मुलाचा मास्क त्याच्याकडे गेला, काकूंचा मास्क त्यांनी हरवला.

मुलीच्या 2 मास्क पैकी एक मुलाकडे गेला (गुलाबी) त्यामुळे त्याचा पूर्ण झाल्यानंतरचा फोटो माझ्याकडे नाही. तेंव्हा हे 2 च गोड मानून घ्यावेत.

साहित्य :-
जुन्या परकरचे तुकडे
जुन्या मास्कचे इलेस्टिक (नवीन आणायला वेळ मिळाला नाही)
ग्लू
कुंदन
ब्लाऊज पीस वरची design

**** app वरून फोटो टाकायचा option मिळत नाहीये.

नवीन Submitted by रीया on 27 August, 2020 - 10:36>> रीया, नविन धागा काढून प्रवेशिका पाठवा.