पाककृती स्पर्धा 2 - नैवेद्यम स्पर्धा -- वर्णिता

Submitted by वर्णिता on 25 August, 2020 - 10:42

IMG_20200825_190038.jpg

१) पाककृती स्वत: तयार केलेली असावी. --आहे
२) नैवेद्याचे पदार्थ शाकाहारी असावेत.--आहेत
३) नैवेद्याच्या पानात किमान 2 भाज्या -- बटाटा मटार भाजी , मिश्र कडधान्य उसळ
चटणी -- कोथिंबीर , पुदिना, ओलं खोबरं
मेतकूट। -- नाही, घरात विकतचे होते.
2 कोशिंबीरी -- बीट, टोमॅटो आणि दुसरी काकडीची
भात -- वरणभात, दहीभात, मसालेभात
पोळी/ पुरी -- पुरणपोळी
तळणीचा पदार्थ -- बटाटा भजी,कुरडई , या मे महिन्यात पहिल्यांदा च माबोवरच्या सगळ्या उत्साही मेम्बर्सच्या कुरडया गप्पा वाचून केल्या आणि चक्क जमल्या ही .
एखादे गोड पक्वान्न असावे. -- पुरणाची खीर , शेवयाची खीर
उकडीचे वा कोणत्याही प्रकारचे स्वत: केलेले मोदक -- उकडीचे तांदळाचे मोदक
४) नैवेद्याच्या पानात बाहेरून विकत आणलेला गोड ,तिखट,चटपटीत इत्यादींपैकी कोणताच पदार्थ नैवेद्यम च्या पानात नसावा. --नाही पानात.
५) शक्यतो नैवेद्याचे पान हे केळीचे किंवा इतर पान असावे. --केळीचे आहे.

थोडक्यात रेसिपी-
१ ) भाजी -- बटाटे उकडून, मटार वाफवून , फोडणी करून मीठ साखर मिरची घालून .
2) मिश्र कडधान्ये उसळ -- चवळी, मूग, मटकी, छोले, हरभरे, वाटणे सगळे पाव वाटी - दिवसभर भिजवून मोड आणून खोबरं, कोथिंबीर, आलं याचं वाटण करून फोडणी करून.
20200825_125251.jpg
3) कोशिंबिरी - बीट खिसून , काकडी कोचवून दही ,मीठ, साखर, शेंगदाणे कूट घालून.
4) भात -- मसालेभात - फ्लॉवर, मटार, टोमॅटो, ही मिरची आणि खडे मसाले घालून.
20200825_125433.jpg
5) चटणी --कोथिंबीर, पुदिना ( मी कुंडीत लावलेला ) , ओलं खोबरं ,मीठ, चिमूटभर साखर, लिंबूरस
6) पुरणपोळी -- आता कृती काय लिहू ? पुरण शिजवून , वाटून, उंडा करून ,भाजून , फोटोत नेमकी पूर्ण गोल न झालेली आलीय.
20200825_154636.jpg
7) सुरळीच्या वड्या -- 1 वाटी डाळीचं पीठ, 2 वाट्या ताक ,आलं ही मिरची ठेचून, मीठ घोटून कुकरमध्ये मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून परत घोटून ,पसरून, सुरळ्या करणे. सोप्पी पद्धत,
20200825_163733.jpg
8) अळूवड्या --अळूची पाने धुवून त्याला डाळीचं पिठ लावणे आणि वाफवून घेऊन , कापून शॅलो फ्राय करणे . पिठात मीठ, चिंच कोळ , तिखट, ओवा
20200825_144319.jpg
9) पुरणाची खीर-- शिजवलेले पण न वाटलेले पुरण दूध घालून, सुका मेवा घालून उकळणे, जायफळ, वेलदोडा पुरणातच होता.
10) उकडीचे मोदक -- तांदूळ पिठी - तूप, दूध, पाणी घालून मळून 10 मिनिटे वाफवून घेऊन, मळून , मोदक बनवून परत 15 मिनिटे वाफावणे
20200822_130204.jpg
11) कटाची आमटी -- हरभरा डाळ शिजल्यावर डाळ निथळून उरलेला कट घेऊन त्याला तमालपत्र, गरम मसाला, तिखट, गूळ, मीठ ,फोडणी त घालून उकळणे.
12 ) वाटली डाळ - - हरभरा डाळ 4 तास भिजवून मिक्सरमध्ये घेऊन त्यात आलं, ही मिरची , मीठ, साखर घालून अर्धबोबडं करून घेणे --कुकरमध्ये मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढून मग फोडणी देणे .
13) बटाटा भजी - बटाट्याचे काप काढून ते भजीच्या पिठात बुडवून तळणे
नेहमी यातले बरेचसे पदार्थ नैवेद्याला करते . या वेळी उपक्रमासाठी 4 जास्त केले.
गणपती बाप्पा मोरया.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पाककृतीतील सर्व पदार्थांची नावे आणि थोडक्यात कृती द्यावी. अधिक माहितीसाठी स्पर्धेच्या धाग्यावरील नियम पहा.

मस्त दिसतंय पान!
नियमात आहे म्हणून कृती ठीक आहे, पण या १५- २० एका वाक्यातील कृतींचा काय फायदा?

मस्तच. लिंबू शेजारी वाटीत काय आहे?? भाजी काय? मग तीन भाज्या झाल्या ना.... आणि ते मठ्ठा आहे की बासुंदी? खूप केलंत... बाप्पा मोरया!!

मस्त!

बापरे एवढे सगळे एकटीने केले तुम्ही 
खूप कौतुक, ताट अप्रतिम सुंदर दिसतेय>>>>VB शी सहमत.
अप्रतिम नैवेद्य. बाप्पाला आवडलाच असेल !!

बापरे एवढे सगळे एकटीने केले तुम्ही
खूप कौतुक, ताट अप्रतिम सुंदर दिसतेय>>>>VB शी सहमत.
अप्रतिम नैवेद्य. बाप्पाला आवडलाच असेल !! >>> 1111

वा वा मस्त ! मोदक आणि पुरणपोळ्या दोन्ही म्हणजे भारी आहे.
पुरणाची खीर कधी ऐकली नव्हती. पण चांगलय शास्त्रासाठी Happy

सगळ्यांचे मनापासून आभार. अगदी एकटीने नाही केले. ऑनलाईन शाळेमुळे मुलगा घरीच आहे त्यामुळे तो हाताशी होता पुरण वाटून द्यायला, बीट खिसून , बटाटे सोलून वगैरे . सीमंतिनी , लिंबूशेजारी वाटीत कटाची आमटी आहे आणि कुरडई च्या वर वाटीत वाटली डाळ आहे.
पराग -- पुरणाची खीर मी मागे एका मैत्रिणीकडे खाल्लेली , आवडलेली पण करायची राहून गेलेली , या वेळी झाली. शास्त्र Proud : शास्त्रासाठी पुरण आणि शेवयाची खीर पाय रोवून आहे. अजूनही ऐकते शास्त्रासाठी पुरण कर, खीर कर .

बाप रे इतके सारे पदार्थ ते पण इतके सुंदर सजवलेले पाहूनच भूक लागलीय..खरचं कौतुक वाटतं इतकं सगळं एकट्याने करणं म्हणजे सोप काम नाही..!

वर्णिता मघाशी मोदकाचा फोटो दिसलाच नव्हता.. आता दिसला.. कळ्या छान आल्या आहेत.. मोदक दे पाठवून स्पर्धेमध्ये ..

वर्णिता अप्रतिम, दंडवत स्वीकार. बाजुची रांगोळीपण सुरेख. कौतुक आहे. गणपतीबाप्पा मोरया.

मोदक दे पाठवून स्पर्धेमध्ये .. >>> अगदी अगदी.

सुंदर ताट..
इतके पदार्थ करणे म्हणजे खायचे काम नाही...
आपलं खूप कौतुक...

फारच उत्तम ताट झाले आहे. इतके एकावेळी करणे फारच अवघड आहे. त्या साठी कौतु क तुमचे. आणि गोपद्मांची रांगोळी तर अनेक दशकांनी बघितली. बाप्पा प्रसन्न होणारच.

Pages