यंदा गणपती स्पर्धा जाहीर झाल्यापासून आपणही भाग घ्यावा असे वाटत होते. घरच्या गणपतींचे विसर्जन झाल्यावर, गोड गोड खाऊन झाल्यावर लेकाची फर्माईश आली आई लसंगा बनव. मग काय स्पर्धेचे औचित्य साधून घेतला लसंगा करायला. यासाठी लागणारा पिझ्झा सॉस व व्हाइट सॉस पण मी बनवून घेतला. तर क्रमवार कृती खालील प्रमाणे.
पिझ्झा सॉस साहित्य – ४ मध्यम आकाराचे टोमॅटो, १ कांदा , ७-८ लसून पाकळया , १/२ टी.स्पून मिरीपावडर , १/२ टी.स्पून मिक्स हर्ब्स , तेल , २ चमचे टोमॅटो सॉस,१ टी.स्पून तिखट ,चवीपुरते मीठ
व्हाइट सॉस साहित्य- २ चमचे मैदा ,१ चमचा बटर ,(मी घरचे लोणी वापरले ) १/२ टी.स्पून साखर , १/२ टी.स्पून मिक्स हर्ब्स ,चवीपुरते मीठ,पाणी .
लसंगा मधील भाज्या –सिमला मिरची ,कोबी ,फ्लावर,वाफवलेले मकयाचे दाणे ,बटाटा प्रत्येकी १/२ वाटी बारीक चिरून ,१ वाटी बारीक चिरलेला कांदा, ७-८ लसून पाकळया,१/२ इंच आले,२-३ हिरव्या मिरच्या, मिक्स हर्ब्स , तेल ,चवीपुरते मीठ आणि चीझ (कोणतेही चालेल, मी अमूलचे घेतले. ) पास्ता / लसंगा शीट साहित्य- दीड वाटी/कप मैदा, तेल, चवीपुरते मीठ,पाणी .
आता कृती –
पिझ्झा सॉस:- २ टोमॅटो उकडून मिक्सरमधून काढले. २ टोमॅटो व कांदा बारीक चिरून घेतले. कढ़ईमध्ये
तेल गरम झाल्यावर ठेचलेला लसूण , कांदा घालून परतले, मग टोमॅटो टाकून झाकण ठेवून शिजवले. मग त्याला रगडले. त्यात मिक्स हर्ब्स, मिरीपावडर, टोमॅटो सॉस, तिखट व चवीपुरते मीठ घातले व्हाइट सॉस:- यासाठी मैद्याची पाण्यात पेस्ट बनवली. कढ़ईत बटर घातले. त्यात थोड़े पाणी घातले. त्यात मैद्याची पेस्ट घातली. सतत ढवळत राहवे म्हणजे गुठळया होत नाही. दाटसर झाल्यावर त्यात साखर, मिक्स हर्ब्स, चवीपुरते मीठ घातले.
पास्ता शीट: – मैद्यामध्ये तेल, चवीपुरते मीठ घालून पीठ भिजवले.१० मिनिटे झाकून ठेवले। मग त्याचे ४ भाग बनवून पातळ पोळया लाटल्या. एका कापड़ावर टाकून १५-२० मिनिटे पंख्याखाली सुकवल्या.
भाज्या :– फ्लावर, बटाटा, जरा अर्धवट वाफवून घेतला. कढ़ई मध्ये तेल गरम झाल्यावर ठेचलेला लसूण , आलेमिरची पेस्ट, कांदा घालून सोनेरी रंगावर परतले. त्यात सर्व भाज्या घालून जरा परतले. त्यात मिक्स हर्ब्स, मिरीपावडर, चवीपुरते मीठ घातले.
आता महत्वाची स्टेप लसंगा साठी लेयर करणे :-
आधी एका फ्रायपॉन मध्ये खाली तळाला तेल लावून घ्या. त्यावर थोड़ा पिझ्झा सॉस लावा. आता त्यावर एक पास्ता शीट ठेवा. यावर एक पातळ थर पिझ्झा सॉस आणि व्हाइट सॉसचा लावा. आता भाज्यांचा एक थर लावा.त्यावर चीझ कीसून टाका.
परत आता त्यावर एक पास्ता शीट ठेवा.अनुक्रमे एक पातळ थर पिझ्झा सॉस आणि व्हाइट सॉस, भाज्यांचा एक थर, चीझ कीसून टाका। याप्रमाणे चारही थर लावून घ्या.
वर तुम्हाला चालेल तेवढे चीझ कीसून टाका. मंद आचेवर १०-१५ मिनीटे शिजू द्या. लसंगा तय्यार. गरमागरम लसंगा पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो सॉस बरोबर खा.
तयार लसंगा
अरे वा! कित्ती भारी!
अरे वा! कित्ती भारी!
मस्त दिसतोय
मस्त दिसतोय
जबरदस्त दिसतंय
जबरदस्त दिसतंय
लझानिया ची डिटेल कृती पहिल्यांदा वाचली
एकदा करून बघणार.
मस्त.
मस्त.
मस्त दिसतेय..
मस्त दिसतेय..
मला फार आवडते हे.. घरी करणे शक्य् असेल तर बायकोला फॉर्वर्ड करतो हे
लझान्या एकदम भारी , आणि डिटेल
लझान्या एकदम भारी , आणि डिटेल पाककृती लिहील्याबद्दल खूप आभार. तुम्ही लझान्या शिट्स पण घरी बनवल्या... ग्रेट.
जबरदस्त!
जबरदस्त!
सर्वांना खूप धन्यवाद...
सर्वांना खूप धन्यवाद...
भारी! मला वाटलं होतं की लसंगा
भारी! मला वाटलं होतं की लसंगा म्हणजे लसूण+लवंगा असतील.
छान
छान
मस्त
मस्त
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी
खूप मेहनत घेतली आहे. फोटो खूप
खूप मेहनत घेतली आहे. फोटो खूप छान.
फारच भारी केलंय हे! करून
फारच भारी केलंय हे! करून बघायला पाहिजे घरी!! मस्त!
अप्रतिम! एकदा तरी करायलाच
अप्रतिम! एकदा तरी करायलाच पाहिजे!