पाककृती स्पर्धा ३ - फास्टफूड स्पर्धा (कुरडईची भाजी)- sonalisl

Submitted by sonalisl on 27 August, 2020 - 19:53

लागणारा वेळ:
२०-२५ मिनिटे

लागणारे जिन्नस:
१ मोठी वाटी कुरडईचा चुरा
१ टेबलस्पून तेल
१ चमचा जिरे
१ तिखट मिर्ची
१ कांदा
२ रंगीत मिर्ची(sweet peppers)
१ छोटी वाटी मक्याचे दाणे(मी frozen घेतले आहेत)
१ चमचा लसूण पावडर(नसेल तर २-३ पाकळ्या लसूण घ्या)
१ चमचा तिखट मसाला
१/२ चमचा हळद
१ चमचा कश्मिरी मिर्ची पावडर
मीठ
कोथिंबीर

C53A61E4-E4C0-4B68-8EAD-49B057F88DC5.jpeg
.
A7202D7E-D042-40A5-8D92-4F68D351B13E.jpeg
———
पाककृती :

प्रथम कुरडई गरम पाण्यात भिजत ठेवावी. गरम पाण्यात लवकर मुरते.
तोवर कढईमध्ये तेल तापवून त्यात जिरे घालावे. जिरे फुलले कि त्यात मिर्चीचे तुकडे घालावे. मग चिरलेला कांदा घालून तो चांगला परतून घ्यावा. लसूण पाकळ्या वापरणार असाल तर त्या ठेचून कांद्या बरोबर परतून घ्या.
मग त्यात हळद, कश्मिरी मिर्ची पावडर, तिखट मसाला घालून परतावे.
त्यानंतर कापलेली रंगीत मिर्ची आणि मक्याचे दाणे घालून ते शिजेपर्यंत(म्हणजे मिर्ची जरा मऊ होईपर्यंत) परतावे.
मग त्यात लसूण पावडर आणि चवीनुसार(कुरडईमध्ये मीठ असते हे लक्षात घेऊन) मीठ घालावे.
त्यानंतर कुरडई निथळून पाणी फेकून द्यावे आणि कुरडई कढईत घालून चांगले परतावे.
आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवावे.

F404AA58-EAD9-42A0-A8C6-883BAAF32E4E.jpegवाढणी प्रमाण :
दोन व्यक्तिंकरिता

कधीतरी फक्त मसाला घालून केली जाते. या स्पर्धे निमित्त मका आणि रंगीत मिर्ची घालून केली. छान लागली.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह, कुरडया! इथे येउन बघेपर्यंत माझ्या डोक्यात करडईची होतं. हि नुडल्स सारखी, किंवा शेवयांचा उपमा करतो तशी, छान लागेल. कधी कुरडयांची केली नाही भाजी. साध्या शेवयांचं फ्युजन केलय ट्राय. हे करून बघितलं पाहिजे.

मस्त दिसतंय
मी पण आधी करडई वाचलं, माझ्या डोळ्यासमोर का माहित नाही, शेपू येत होता.

मलाही आधी करडईच वाटली.

रेसिपी मस्त आहे, नक्की करून पाहीन.

कुरडया हा प्रकार आमच्याकडे फारसा न होणारा पण यंदा मी कोरोनाच्या लाटेत चिकाच्या कुरडया केल्या Happy अर्थात इतके तळण घरात होत नाही म्हणून त्या तशाच पडून होत्या. परत कोरोनाच्या लाटेत युट्युबवरची कुरडयाची भाजी एकदा करून बघितली आणि मॅगीच्या तोंडात मारेल असे अफलातून मिश्रण तयार झाले. मी भाजी म्हणून केलेली पण अशीच उचलून खाल्ली. आता या उन्हाळ्यात परत कुरडया करेन. मॅगीपेक्षा चांगला आरोग्यदायी पर्याय.

भारी!!

माझी आवडती भाजी, ऑफीसला डब्यात नेली होती तेव्हा मित्रांनी पण पहिल्याण्दाच खाल्ली.