मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
संस्कृती
मायबोली गणेशोत्सव २०१८ - श्री गणेश प्रतिष्ठापना
अथर्वशीर्ष हा उपनिषदाचा एक भाग असून ते दहा ऋचांमध्ये विभागलेले आहे. सर्व स्तुती स्तोत्रांची असते तशीच अथर्वशीर्षातील ऋचा विशिष्ट हेतूने रचलेली आहे. सुरवातीच्या ऋचांमध्ये गणेशाच्या अधिदैविक रुपाचे वर्णन आढळते. वक्त्याचे, श्रोत्याचे तसेच दाता, धाता, आचार्य, शिष्य इत्यादींचे रक्षण करण्यासाठी काही ऋचा आहेत. तसेच शेवटी गणपतींच्या ‘व्रातपति, गणपति, प्रमथपति, लम्बोदर, एकदन्त, विघ्ननाशक, शिवतनय तथा वरदमूर्ति’ या आठ नावांना नमस्कार करुन अथर्वशीर्षाची फलश्रुती सांगीतली आहे.
परदेशस्थ भारतीय
इंदोरमध्ये 8 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान पार पडत असलेल्या 17व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या #pravasibharatiyadivas संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यंदाच्या प्रवासी भारतीय दिवसाची संकल्पना – समुदाय : अमृतकाळातील भारताच्या विकासासाठीचे विश्वासार्ह भागीदार (Diaspora : Reliable partners for India’s progress in ‘Amrit Kaal’) अशी ठेवण्यात आली आहे. यंदाच्या संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून भारतीय वंशाचे Cooperative Republic of Guyana चे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद इर्फान अली यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.
बेशरम (पठाण) : चित्रपट पृथगात्मतादमास
( मायबोली टंकनास येत असलेल्या अडचणींमुळे व अप्रकाशित सुविधा नसल्याने तसेच इतर एडीटर्सचा सराव नसल्याने इथेच पुढचा भाग अपडेट करत पूर्ण केले जाईल. वाचनखूण म्हणून संपादन १, २ हे कीवर्डस दिले जातील ).
एक.
मुरबाडच्या पुढे डोंगरदर्यात समतलपृष्ठावर सेट लागलेला आहे.
एक गाव दिसते. गावाकडे जाणारी नागमोडी वाट. वाटेवर एक भली थोरली शिळा. या शिळेवर बसून काही महान लोकांनी तंबाखू मळली असेल. शिळेला नागमोडी वळसा घालून वाट पुढे गावात शिरते.
पंचगंगातिरीचा दीपोत्सव
कला आणि संस्कृती चाहत्यांसाठी झपुर्झा म्युझियम
पुण्यातील शिवाजीनगर येथून 22 किमी आणि खडकवासला धरणापासून 8 किमी अंतरावर कुडजे गावात "झपुर्झा" हे कला व संस्कृती संग्रहालय वसलेले आहे. आपण इतिहास, कला व संस्कृती यांचे चाहते असाल तर हे म्युझियम बघायलाच हवे.
पुण्यातील केळकर म्युझियममध्ये जर तुम्ही तासनतास घालवू शकत असाल तर इथेही तुम्ही संपूर्ण दिवस घालवू शकता. मी 24 सप्टेंबर 2022 या तारखेला ह्या म्युझियमला भेट दिली. येथे एकूण 10 कलादालने म्हणजे आर्ट गॅलरीज आहेत. तसेच एक एम्फीथिएटर आहे. तिथून आपल्याला खडकवासला धरणाच्या पाण्याचे सुंदर दृश्य दिसते.
एलोमा पैलोमा गणेश देवा!
भारता मध्ये नवरात्र देशभरात साजरा होतो. बंगाली लोकांची दुर्गा पूजा, गुजरातचा गरबा प्रसिध्द. पण आता त्याची जागा दांडिया, डिस्को दांडियाने घेतलीये
पीटरहोफ
सेंट पीटर्सबर्ग ही रशियाची झारकालीन राजधानी असल्यामुळे अनेक सुंदर, आकर्षक राजवाडे, उद्याने, कारंजे, कॅथेड्रल्स, पुतळे, निवा (нева / न्येवा) नदीवरचे आकर्षक पूल अशा वास्तूवैविध्यांनी सजलेली आहे. या सर्वांमुळे जगातील सुंदर शहरांपैकी एक अशी या शहराची ओळख झाली आहे. सेंट पीटर्सबर्गच्या उपनगरात पीटरहोफ हे आकर्षक राजसंकुल स्थित आहे. याची उभारणी 1709 पासून पुढची अनेक वर्षे होत राहिली. पीटर द ग्रेटची एक छोटेखानी निवासस्थान म्हणून उभारणी झालेल्या मुख्य वास्तूचे Grand Palace मध्ये रुपांतर झाले 1717 ते 1728 दरम्यान.
पंचमीचा झोका माझा...
उंच माझा झोका,
घेई गगनाचा ठेका..
नारळाच्या दोरीचाही असे,
त्यास आनंद रे लेका..
आड्या फांदीला टांगला,
पंचमीचा सण बघा...
वाऱ्यासंग धाव घेत,
आसमाना मारी रेघा..
दोन सया गं सोबती,
एकमेका झुलवती..
श्रावणात धरणी जणु,
फुल पानं डोलवती....
झोका चढता चढना,
पाय थकले हाकुन...
बालपणाच्या खेळालाही,
आता ठेवलं झाकून...
नाही झोका कुठं बाई,
हारपली गं वनराई..
गॅलरीच्या झोक्याला गं,
सर पंचमीची न्हाई..
©® जगदीश ढोरे आसेगावकर
दिनांक :- २९-०७-२०२२
ग्रीक पुराणातील विलक्षण प्रेमकथा
-अन्यत्र पूर्वप्रकाशित-
चित्राचा मूळ संदर्भ - https://en.wikipedia.org/wiki/Fran%C3%A7ois-%C3%89douard_Picot
------------------------------------
ग्रीक पुराणातील विलक्षण प्रेमकथा वाचनात आली. तिचा हा अनुवाद -
Pages
