पाककृती स्पर्धा ३- फास्टफूड स्पर्धा

Submitted by संयोजक on 20 August, 2020 - 03:36

नमस्कार मायबोलीकर,

विविध सण आणि पूजेसाठी बनवलेले गोडाधोडाचे पदार्थ खाऊन सगळेच कंटाळले असतील ना?? आता सर्वांनाच काहीतरी तिखट, चमचमीत खावेसे वाटत असेल. त्यांच्यासाठी आम्ही घेऊन येतोय फास्टफूड स्पर्धा. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्ही बाजारात मिळणारे सर्व फास्ट फूड जसे की पिझ्झा, बर्गर, समोसा, वडे, fries किंवा काहीही fusion etc etc घरीच बनवायचे आहे आणि त्याचे फोटो कृतीसह आम्हाला पाठवायचे आहेत.
चला तर मग! लागा तयारीला.
नियम:
१) ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
२) पाककृती शाकाहारी असावी.
३) पाककृतीत किमान एका भाजीचा समावेश असावा. उदा. पालक, मेथी, भोपळा, सिमला मिरची इ पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य यापैकी एक किंवा अनेक कोणत्याही भाज्या वापरल्या तरी चालतील. त्यावर कोणतेही बंधन नाही.
४) रेडी टू ईट/फ्राय पदार्थ वापरून बनवलेली जसे की रेडिमेड पाणी पुरीच्या पुऱ्या, रेडिमेड पिझ्झा बेस प्रवेशिका बाद करण्यात येईल.
५) सॉस, बर्गर बन, लादी पाव यांसारखे घरी बनवण्यास अतिशय कठीण असे साहित्य रेडिमेड वापरले तर चालतील. रॉ पास्ता, रॉ स्पगेटी नूडल्स विकतचे चालतील. मॅगी, yippie इ. सारख्या नूडल्स चालणार नाहीत. तसेच रेडिमेड पास्ता, नूडल्स मसाले वापरू नयेत. शक्यतो रेडिमेड साहित्य वापरू नये. मंडळी तुमची क्रीएटीवीटी दिसू द्या.
६) पाककृतींची किमान २-३ स्टेप बाय स्टेप प्रकाशचित्रे देणे बंधनकारक आहे. प्रवेशिका देताना पदार्थाचे नाव आणि त्यांची सविस्तर पाककृती द्यावी.
प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे बघता येईल. - https://www.maayboli.com/node/1556
७) विजेती प्रवेशिका ठरवताना पाककृतींचे सादरीकरण हा मुद्दा ही विचारात घेतला जाईल.
८) तुम्ही तुमच्या प्रवेशिका २२ ऑगस्ट पासून पाठवू शकता. (IST)
९) एक id फक्त २ प्रवेशिका पाठवू शकेल.
१०) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"पाककृती स्पर्धा ३ - {फास्टफूड स्पर्धा} - - {तुमचा आयडी}"
११) स्पर्धेचे विजेते मतदानाद्वारे निवडण्यात येतील.

तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.

!!! गणपती बाप्पा मोरया!!!

------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धांच्या पूर्वतयारीला पुरेसा वाव मिळावा म्हणून स्पर्धा व नियम जाहीर करत आहोत. प्रवेशिका पाठवण्यासाठी गणपती प्रतिष्ठापनेनंतर धागे उघडले जातील.

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव मी मॅगी बनवणार....
चालेल का नियमात ? मॅगी नूडल्स फक्त विकतच्या असतील

इथे २ क्रिटीक अवॉर्ड नाही का? म्हणजे आता खरपूस पदार्थाचा "तेरा क्या होगा कालिया?" करत खरपूस समाचार घ्यायची जबाबदारी गब्बर जनतेचीच की... संयोजक, इथेही क्रिटीक अवॉर्ड द्या की प्लिज ...

मॅगी नाही चालणार.... म्हणजे धावायची स्पर्धा घ्यायची नि उसेन बोल्टाला येऊ नको म्हणायचं. ब्रँडनेम म्हणून मॅगी नको असेल तर ठीक पण कुठल्या कुठल्या नूडल्स चालू द्या की...

छान स्पर्धा संयोजक !!
फास्ट फुड आहेतर झटपट बनवता आले पाहिजे , म्हणून मगं करायला लागणाऱ्या वेळेचे बंधन आहे का ?
की पटकन खाता आले पाहिजे या अर्थाने (snack) चटपटीत फास्ट फूड आहे त्यामुळे वेळेचे बंधन नाही.

रॉ पास्ता, नूडल्स ज्या आपण फक्त बॉइल करून घेतो ते कोणतेही चालतील. मसाले आणि सॉस स्पर्धकांनी स्वतः बनवणे अपेक्षित आहे. पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या वेळेचे कोणतेही बंधन नाही.

रॉ पास्ता, नूडल्स ज्या आपण फक्त बॉइल करून घेतो ते कोणतेही चालतील. मसाले आणि सॉस स्पर्धकांनी स्वतः बनवणे अपेक्षित आहे
>>>>

म्हणजे मॅगी वा चिंग्स वगैरे कुठल्याही ब्रांडच्या फक्त नूडल्स घेऊ शकतो. त्यातील मसाला वापरायचा नाही. हे कर्रेक्ट आहे का?

पण मला वाटते बरेचसे लोकं ईतर मसालेही विकतचे वापरतात. म्हणजे एवरेस्ट ब्रांडचे वगीरे. ते सुद्धा चालणार नाही का?

म्हणजे मॅगी वा चिंग्स वगैरे कुठल्याही ब्रांडच्या फक्त नूडल्स घेऊ शकतो. त्यातील मसाला वापरायचा नाही. हे कर्रेक्ट आहे का?>>>>>>
हो
पिझ्झा बेस घरात झटपट बनवता येतो यीस्ट न वापरता. बर्गर बन, लादी पाव घरात बनवणे वेळखाऊ आणि थोडे कठीण आहे. त्यामुळे त्यात सवलत देण्यात आली आहे.

लॉक डावूनमध्ये इकडे बरीच लोकं लादीपाव सारखे आयटमसुद्धा बनवायला शिकले आहेत तर घटक पदार्थ सर्व काही स्वतः बनवलेले असावेत हां नियम ठेवल्यास स्पर्धा अधिक आकर्षक बनेल.

गोड फास्टफूड चालणार आहे का?
म्हणजे प्रस्तावनेवरुन गोड फास्टफूड अपेक्षित नाहिये असे वाटतेय पण नियमात तसे काही स्पष्ट लिहलेले नाहीये!

जयु, भाग घेण्यास हरकत नाही.

व्रुंदा, ह्य बाफाच्य शिरोभागी ही माहिती दिलेली आहे.
"या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्ही बाजारात मिळणारे सर्व फास्ट फूड जसे की पिझ्झा, बर्गर, समोसा, वडे, fries किंवा काहीही fusion etc etc घरीच बनवायचे आहे आणि त्याचे फोटो कृतीसह आम्हाला पाठवायचे आहेत."

सयोजक मला वाटत तुम्ही अजुन क्लॅरिटिने लिहा
जस बर्गर केलात तर बन विकतचा चालेल(घरी केला तर उत्तम) पण पॅटी घरी करणे अपेक्षित आहे, सॉस वैगर व्हेरिएशन देवुन ट्विस्ट देवु शकता.