हस्तकला स्पर्धा २ - बुकमार्क बनवणे

Submitted by संयोजक on 15 August, 2020 - 16:27

मायबोलीवरच्या कलाकारांसाठी आणि त्यांच्या पाल्यांसाठी आम्ही ही हस्तकला स्पर्धा घेऊन आलो आहोत. कागद, चार्ट पेपर्स, कार्डबोर्ड, रंग स्केचपेन्स इ काहीही उपलब्ध सामान वापरून बुकमार्क बनवायचं आहे.

नियम-
१) ही स्पर्धा दोन गटांसाठी आहे.
अ गट) लहान मुलं (१३ वर्षे नि त्याखालील)
ब गट) मोठ्यांसाठी
२) स्पर्धकांनी प्रवेशिका देताना गटाचा उल्लेख करणे बंधनकारक आहे.
३) बुकमार्क बनवण्यासाठी आणि सजावटीसाठी साहित्याची कोणतीही मर्यादा नाही फक्त ते स्वतः बनवलेले असावे.
४) लहान मुलांच्या गटातही त्यांनी स्वतः बनवलेलं बुकमार्क अपेक्षित आहे. पालक त्यांना मार्गदर्शन करू शकतात. पण मुलांनी बुकमार्क
बनवणे अपेक्षीत आहे.
५) एक id ब गटातून एकच प्रवेशिका सादर करू शकतो. अ गटासाठी एक id one per kid प्रवेशिका सादर करू शकतो.
६) प्रवेशिका देताना तुम्ही काय काय साहित्य वापरले इ ची माहिती थोडक्यात देणे आवश्यक आहे.
७) अ आणि ब गटातील विजेते वेगवेगळे निवडण्यात येतील.
८) तुम्ही तुमच्या प्रवेशिका २२ ऑगस्ट पासून पाठवू शकता. (IST)
९) काढलेल्या चित्राची किमान २ प्रकाशचित्रे द्यावी.
प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे बघता येईल. - https://www.maayboli.com/node/1556
१०) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"बुकमार्क स्पर्धा- - - - - {तुमचा आयडी}"
११) स्पर्धेचे विजेते मतदानाद्वारे निवडण्यात येतील आणि 2 क्रिटिक अवॉर्ड असतील.

तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.

!!! गणपती बाप्पा मोरया!!!

------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्पर्धांच्या पूर्वतयारीला पुरेसा वाव मिळावा म्हणून स्पर्धा व नियम जाहीर करत आहोत. प्रवेशिका पाठवण्यासाठी गणपती प्रतिष्ठापनेनंतर धागे उघडले जातील.

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

३) लहान मुलांच्या गटात त्यांनी स्वतः बनवलेलं बुकमार्क अपेक्षित आहे.

दोन्ही गटात स्वतः बनवलेलं बूकमार्क अपेक्षित आहे ना.

दोन्ही गटात स्वतः बनवलेलं बूकमार्क अपेक्षित आहे ना.>>हो
मुलांच्या बाबतीत पालकांच्या किंवा दुसऱ्या कोणाच्याही मदती शिवाय असा अर्थ आहे.

एका सदस्याला दोन मुले असतील तर? >> दोघांना एकवीस कळ्यांचा मोदक करायला बसवून पालकांनी शांततेत बुकमार्क करावा. Wink

<<<दोघांना एकवीस कळ्यांचा मोदक करायला बसवून पालकांनी शांततेत बुकमार्क करावा. >>> Rofl प्रचंड हसले मी, डोळ्यासमोर आले चित्र

स्पर्धा आहे म्हणजे प्रत्येक प्रवेशिकेत एकच बुकमार्क द्यायचा आहे कि बरेच द्यावे? बरेच दिले तर त्यांचे गुणांकन आणि परिक्षण कसे करणार. परिक्षण संयोजक करणार कि त्या विषयातील तज्ञ मंडळी कि सदस्यांचे मतदान? या गोष्टी कृपया धाग्यात लिहा कारण याआधी असे बरेच वाद झालेले आहेत.
माझ्यामते एवढ्या स्पर्धा ठेवण्याऐवजी उपक्रम म्हणून ठेवले तर जास्त सदस्य भाग घेतील.