पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - पारंपारिक मोदक - मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 31 August, 2020 - 02:55

पाफा तुम्हाला अनेक धन्यवाद. तुमच्या मुळे खायला मिळाले आम्हाला मोदक. तुम्ही एवढं सांगितलंत म्हणून केले ह्या वर्षी मोदक नाहीतर केले नसते मी. भरपूर अडचणी होत्या मोदक करण्यात आणि कोरोनामुळे उत्साह ही नव्हता पण केले शेवटी. त्यासाठी मायबोली आणि पाफा ना पुन्हा एकदा धन्यवाद.

माझ्याकडे वासाचे तांदूळ नव्हते पण बेडेकरांची मोदक पिठी होती घरात म्हणून त्याची उकड काढली आहे .

मोदक पात्रातली चाळणी ही नव्हती घरात . आणू या आणू या म्हणतेय तोवर लॉक डाऊनच सुरू झाला. त्यामुळे मी ह्या वर्षी किसणीवर वाफवले आहेत मोदक. किसणीच्या छिद्रातून छान मिळाली वाफ त्याना अगदी चाळणी सारखी आणि मस्त मऊ लुसलुशीत झाले मोदक.

मी सगळे मोदक फुलांचे करणार होते म्हणून केशरपाणी केले होते पण उशीर व्हायला लागला म्हणून एकच केला. ते केशरपाणी सगळ्या मोदकांवर शिंपडून टाकले.

हा एकच फोटो काढू शकले आहे पण मोदक मीच केलेले आहेत ह्याची खात्री बाळगावी. बसत नसेल नियमात तर नाही प्रवेशिका ग्राह्य नाही धरली चालेल. हा धागा खास पाफा ह्यांच्या साठी.

IMG_20200831_120452.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावे nilakshi धन्यवाद.

फुलांचे म्हणजे करंजीच्या बाजूला एक केलाय बघ, कळ्या पाकळ्यां सारख्या दिसतायत तसे.

सुंदरच
मायबोलीवर स्पर्धा लावताना 'मोदक-बिगीनर' आणि 'मोदक-एक्स्पर्ट' अश्या दोन कॅटेगरी ठेवाव्या असा प्रस्ताव मी पुढच्या वर्षी मांडणार आहे Happy

सुंदर.
अनु यांना जोरदार अनुमोदन.

सुंदर.

अनु, एक्सपर्ट लोकांना जज नेमायचं Wink

ममो, उगाच लाजवू नका हो, असा नामोल्लेख करून. _/\_
हाडाच्या पाकृ कलाकाराला प्रोत्साहीत करणे ही मोठी गोष्ट नाहीये.
शास्त्र असतं ते!!!!

मोदक अगदी तोंपासु झाले आहेत. Happy

अडचणीतून मार्ग काढून जेव्हा एखादी गोष्ट घडते तेव्हा त्याची खुमारी वेगळीच असते. बाप्पा आपल्याकडून बरोबर करून घेतो, आपण फक्त नाममात्र. गणपती बाप्पा मोरया !!!!

१२ पदरी (कळ्या) मोदक मोजकीच सजावट करूनही खूपच सुंदर दिसत आहेत. घरातील उपलब्ध मोजक्याच साहित्यातून साकारलेली पाककृती विशेष उल्लेखनीय.

वरील सगळ्या प्रतिक्रियांना मोठा मोदक Happy ममो तुस्सी ग्रेट हो ! शब्द तोकडे पडले , केवढे सुरेख दिसताएत मोदक. नुसत्या एका फोटो वरून ओळखता येतील तुझे मोदक. खात्री पटवायची गरजच नाही!

अतिशय सुरेख ! एकसारखे निहार मोदक .. !! फुलांचा मोदक हि अप्रतिम च !
माझ्याकडे वासाचे तांदूळ नव्हते पण बेडेकरांची मोदक पिठी होती घरात म्हणून त्याची उकड काढली आहे>>तुमच्यासारख्या (म्हणजे इथल्या सगळ्याच )मोदक एक्स्पर्ट कलाकारांना वाळू दिली तरी त्याचे मोदक तुम्हाला वळता येतील असं मला वाटतं !!

मनीमोहोर तुमचे मोदक एक नंबर.. कळ्या .. पाकळ्या किती सुंदर.. फक्त बघत राहावेसे वाटतात .. अशी सुंदर कलाकृती खायचे जीवावर येते..

भरत म्हणतायत ते बरोबर आहे तुम्हाला परीक्षक व्ह्याला पाहिजे

खूप खूप सुंदर, मस्त, छान!

कळी पाकळी काय असतं ते पण सांगालं का?
( आम्ही आयते मोदक खाणार्या कैटेगरी मधले असूनही हे विचारण्याचा आगाउपणा करतेय पण तुमचे मोदक पाहून आयते खाण्याऐवजी करून बघायची इच्छा होतेय म्हणून विचारते)

Pages