हस्तकला स्पर्धा-{शिवणकाम}-{sariva}" Reversible or 2 in one mask प्रवेशिका क्र.2

Submitted by sariva on 29 August, 2020 - 20:53

वास्तविक पाहता शिवणकला हा माझा प्रांत नाही.कपड्याच्या काही किरकोळ दुरुस्त्या सोडल्यास आत्तापर्यंत माझा शिवणाशी दूरान्वयानेही संबंध आलेला नाही!
मात्र गेल्या वर्षी मायबोलीवरील काही मैत्रिणींमुळे embroidery शिकण्याचा योग आला.त्यामुळे बऱ्याच टाक्यांची ओळख झाली.
त्याचा फायदा असा झाला की कोरोनाच्या काळात रोजच्या वापरासाठी साधे मास्क विकत आणण्यापेक्षा हाताने मास्क शिवून बघावा ,जमेल असे वाटू लागले व मी स्वतःसाठी तीन पॅटर्नचे मास्क शिवले.
मायबोलीवरील मास्कच्या स्पर्धेमुळे काही तरी वेगळे करावेसे वाटू लागले. ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे आभार.
इंटरनेटवरील काही कल्पना वापरून, त्यात काही बदल करून मी इथे reversible /2 in 1 हा प्रकार सादर करत आहे.
यात मी embroidery चा वापर केला आहे.
कापडापासून सर्व साहित्य घरात होते तेच वापरले आहे.
हा मास्क तयार करताना बऱ्याच गोष्टींचा बारकाईने विचार करावा लागला..जसे.. Embroidery साठी कोणते डिझाईन निवडावे,ते कसे व केव्हा प्रिंट करून घ्यावे इ.
बाकी भाग तसा सोपा वाटला,पण शेवटी दोन्ही भाग जोडताना इलॅस्टिकची टोके दोन्हीकडूनही आत रहावीत,बाहेरून काही कळू नये..हे साधताना मात्र कौशल्य पणाला लागले व सुलट बाजू बाहेर काढेपर्यंत प्रयोग फसतो आहे का याची धाकधूक होती व embroidery ची दोन्ही डिझाइन्स प्रत्यक्षात हवी तशी दिसतील का नाही,याचाही अंदाज नव्हता.पण अखेर जमले ! पुढच्यावेळी करताना यात आणखी सोपेपणा आणता येईल व काही सुधारणाही करता येतील.
आता कृतीकडे वळते.
1) ड्रॉइंग पेपरवर 8 इंची व्यासाचे वर्तुळ काढून त्यापासून पॅटर्न कापून घेतला.
2) 2 वेगळ्या रंगाचे कापड घेतले.त्या पॅटर्नमधे मावेल असे डिझाइन त्या दोन्हीवर स्वतंत्रपणे काढून घेतले व भरतकाम पूर्ण केले.
3)नंतर पॅटर्नप्रमाणे दोन्ही कापडाचे कटिंग करून घेतले.
4) प्रत्येक तुकड्याच्या कापलेल्या चारही बाजू शिवून घेतल्या.त्याला इस्त्री केली.
IMG_20200829_192940_copy_1160x653.jpg
IMG_20200829_205032_copy_652x1159.jpg
5)मग दोन्ही कापडाचे तुकडे सुलट बाजू आत ठेवून विशिष्ट पध्दतीने शिवून घेतले.हे करतानाच इलॅस्टिक जोडून घेतले.इथे मात्र जरा कुशलता पणाला लावावी लागली.
6 मग सुलट भाग बाहेर काढून राहिलेली शिवण पूर्ण करून घेतली.अपेक्षित मास्क तयार झाला.
मास्कच्या दोन्ही बाजू.
हवी तेव्हा हवी ती बाजू दर्शनी ठेवायची.

दोन्ही तुकडे शिवून घेतल्यावर तयार झालेला मास्क
एक बाहेरची बाजू
दुसरी आतील बाजू
IMG_20200829_222718_copy_954x588.jpg
IMG_20200829_224102_copy_652x1159.jpg
बाहेरची व आतली बाजू
IMG_20200829_222936_copy_1160x653.jpg
IMG_20200829_224404_copy_1160x653.jpg
बाजूने पाहिल्यास..
IMG_20200830_053538_copy_800x450.jpg
IMG_20200830_053730_copy_800x450.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Mast.

जबरदस्त!!! खुपच आवडले. भरतकाम मस्त केलयत दोन्हीच.सहावी स्टेप कठीण असते!! फाईन शिवण आलय तुमचं.
मला कुठलाच भाग आत जावा असं वाटत नाही जेव्हा असं दोन्ही बाजूंनी वापरायची गोष्ट असते तेव्हा आतल्या बाजूवर अन्याय होतोय असं वाटत मला. Happy दोन्ही बाजू छानच आहेत,

सुपर्ब

आवडतील असे मास्क वापरायला मलाही

छानच बनवलेयत....
सुंदर आणि व्यवहार्य कलाकृती..

कल्पना छान आहे
Embroidery मस्तच!

शिवणयंत्राचा वापर केलात की हाताने टाके घातले? शिवण मस्त जमली आहे

MEGHA SK,मास्कसाठी हातशिलाईच केली आहे.उल्लेख करायचे राहून गेले होते.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.

Pages