संस्कृती

मातीचा किल्ला : भाग दोन

Submitted by अंकुरादित्य on 1 November, 2013 - 06:00

माणूस सदनातून सदनिकेत रहायला गेल्यापासून सहजीवनातील मजा मर्यादित झाली . चाळ किंवा वाडा हे जरी सदनिकेचे प्रकार असले तरी त्यांच्या वास्तूत सहजीवन कोठेतरी खोलवर मुरले रुजले होते . एखाद्या खोलीतील जन्माचा आनंद आणि एखाद्या खोलीतील मरणाचे सुतक संपूर्ण चाळ साजरे करत होती ,पाळत होती . प्रत्येक घर दुसऱ्या घराचा पार्ट होता . . सदनिकेच्या उंच्या जशा वाढत गेल्या तशा घराच्या लांब्या आणि मनाच्या खोल्या आकसत गेल्या . किलबीलणारे अंगण , कुजबुजणारे स्वयंपाकघर ,समृद्ध परसबाग हे प्रकार नामशेष झाले . माती परकी आणि पोरकी झाली . जागेच्या आणि वेळेच्या युद्धात कुटुंबाचा विस्तार सुकत गेला .

'मन्हा गाव मन्हा देस' खानदेशातले ४ दुर्ग - एका दिवसात

Submitted by Discoverसह्याद्री on 21 October, 2013 - 14:59

सह्याद्री दुरांतो एक्सप्रेसनं ३३ तासात धुळ्याचे ४ किल्ले - लळिंग, सोनगीर, कंक्राळा, गाळणा | झोडग्याचं अद्भूत शिवमंदिर | ८२५ किमी प्रवास

00Dhule_Forts_DiscoverSahyadri.jpg

दिवाळी पहाट

Submitted by अनघा कुलकर्णी on 21 October, 2013 - 04:14

नुकतीच दिवाळीची सुट्टी लागलेली होती. दिवाळी ते आनंदाचे, भरभराटीचे,
कौतुकाचे, सुंदर दिव्यांचे, सुंदर सुंदर रांगोळ्या यांचे, रंगीबेरंगी आकाशकंदिलाचे व सकाळी
उठ उठ करत आज `दिवाळी पहाट' आहे असे सारखेसारखे सांगत आई हातातली कामे
पटापटा करत होती. छानशा झोपेचे खोबरे होणार म्हणून मी अंथरूणातच पडून दुरूनच तिची
मजा, धांदल बघत होते. सर्व झोपेत होते, पण आई मात्र सकाळी लवकर उठून, अंघोळ
करून पणत्या लाव, आकाशकंदील लाव, अंगणात रांगोळी काढ, तुळशी जवळ दिवा
लाव, मोठ मोठे कणीक-ज्वारीच्या पीठाचे दिवे चारी दिशांना ठेव, पाटाभोवती छान रांगोळी

बारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३

Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
तारीख/वेळ: 
19 October, 2013 - 06:01 to 11:59
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....

koja.JPG

कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! Happy

मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय

माहितीचा स्रोत: 
मी

शुभंकरोति

Submitted by vaiju.jd on 28 September, 2013 - 09:06

||श्री||

एके दिवशी दहा महिन्यांच्या युगंधरला कडेवर घेऊन आमची म्हणजे माझी आणि युगंधरची सायंप्रार्थना ‘शुभंकरोति’ म्हणून झाली तेवढ्यात मेधा, माझी सून मला म्हणाली ,’ किती बरे आहे नां आई, तुम्ही इथे घरी आहात! म्हणून युगंधरला संध्याकाळी हे सगळे म्हणायचे आणि करायचे असते, हे कळेल आणि तो पण म्हणेल, त्याला सवय पण होईल. पुढच्या आयुष्यात आई कितीवेळा गरज पडते प्रार्थनेची! देवाला काही सांगण्याची! आम्हाला कळते पण आम्ही ऑफीसमध्ये! पण तुम्ही आहात, मला युगंधरची काळजी नाही! त्याला कधी एकटे वाटले तर तो देवाशी दिवा लावून त्याच्याशीच बोलेल!’

शब्दखुणा: 

काल मी ' त्याच्याशी ' भांडलो , रड रड रडलो

Submitted by मस्त कलन्दर on 22 September, 2013 - 13:16

काल मी ' त्याच्याशी ' भांडलो ,
रड रड रडलो
मला माहित आहे सुखाचे क्षण खूप थोडे असतात
पण तो एक क्षण तरी माझा स्वत:चा असायला हवा होता
मला कधीच का जिंकता येणार नाही ?
ज्याने चोच दिली तो दाणा हि देतो
पण माझ्या हक्काचा दाणा कधीच का मिळणार नाही?
आतापर्यंत मनातल्या मनातच कुडत होतो
पण आता मात्र विस्फोट झाला
उजाड माळरानावर त्याची विनवणी करायला लागलो
सुरवात अर्थातच ढोंगी formality ने केली
" तुला माहीतच आहे किती अडचणी आहेत वगेरे
मला ह्यातून मार्ग पाहिचे , जर तू असशील तर ….
असं challenge वगेरे केल्याशिवाय काही होत नाही हि खुळचट भावना .
मधेच मनात विचार आला

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-४

Submitted by अत्रुप्त आत्मा on 11 September, 2013 - 14:05

भाग-३ http://www.maayboli.com/node/45079 >>> पुढे चालू..

आणखि एक गमतीदार,चवदार,व लज्जतदार विषय.संपूर्ण विषय ऐकल्यावर ,यातल्या गमती कोणत्या?चव कोणती? लज्जत कोणती? आणी या गोष्टी चाखणार्‍यांची नक्की दारं कोणती? हे न कळल्यामुळे तुमचीही अवस्था विधानसभे सारखी त्रिशंकू होइल,यात शंका नाही.............

=============================

जखमे सारखं

शब्दखुणा: 

|| गणपती बाप्पा मोरया ||

Submitted by मंदार शिंदे on 6 September, 2013 - 05:32

"नारायण, नारायण" असा जप करत नारदमुनी गजाननाकडं आले. दोन हातात दोन छोटे ब्रश आणि सोंडेत एक मोठा ब्रश. एक सुंदर निसर्गचित्र रंगवण्यात दंग होते श्रीगणेश. पृथ्वीतलावर सातत्यानं ये-जा करणार्‍या मोजक्या देवांपैकी श्रीगणेश एक. आपण जाऊ तिथला परिसर सुंदर बनवायचा त्यांचा आग्रह. हिरव्या-पिवळ्या रंगांची मुक्त उधळण केली होती त्या चित्रात. आता हे चित्र पूर्ण झालं की पृथ्वीवरच्या नक्की कुठल्या भागात बसवलं जाईल, या विचारात नारदमुनी गढून गेले. इतक्यात गणेशाचं त्यांच्याकडं लक्ष गेलं.

"प्रणाम मुनीवर, कसं काय येणं केलंत?" सगळे ब्रश बाजूला ठेवत गणेशानं नारदमुनींना विचारलं.

संकल्प शिक्षकदिनाचा....

Submitted by श्रीकांत काशीकर on 5 September, 2013 - 09:35

मातृदेवो भव, पितृदेवो भव पाठोपाठ समाजात आचार्य अर्थात शिक्षक श्रेष्ठ. 'आचार्य देवो भव' असं विशेष स्थान शिक्षकांना आहे. गुराख्याचा पोर असणार्‍या चंद्रगुप्ताला आपल्या बुद्धीसामर्थ्याच्या आधारे चाणक्याने चक्रवर्ती सम्राट बनवलं. अलिकडच्या काळात एक शिक्षक या राष्ट्राच्या सर्वोच्च पदावर पोचला होता. पाच सप्टेंबर हा दिवस या शिक्षकाचाच जन्मदिन. हा शिक्षक म्हणजेच आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन.

राहुल सांकृत्यायन- वोल्गा ते गंगा -पांडित्यातील प्रतिभा

Submitted by भारती.. on 4 September, 2013 - 14:21

राहुल सांकृत्यायन- वोल्गा ते गंगा -पांडित्यातील प्रतिभा

आधुनिक,स्वतंत्र भारताचा महापंडित होता तरी कसा ?

Pages

Subscribe to RSS - संस्कृती