काल मी ' त्याच्याशी ' भांडलो , रड रड रडलो

Submitted by मस्त कलन्दर on 22 September, 2013 - 13:16

काल मी ' त्याच्याशी ' भांडलो ,
रड रड रडलो
मला माहित आहे सुखाचे क्षण खूप थोडे असतात
पण तो एक क्षण तरी माझा स्वत:चा असायला हवा होता
मला कधीच का जिंकता येणार नाही ?
ज्याने चोच दिली तो दाणा हि देतो
पण माझ्या हक्काचा दाणा कधीच का मिळणार नाही?
आतापर्यंत मनातल्या मनातच कुडत होतो
पण आता मात्र विस्फोट झाला
उजाड माळरानावर त्याची विनवणी करायला लागलो
सुरवात अर्थातच ढोंगी formality ने केली
" तुला माहीतच आहे किती अडचणी आहेत वगेरे
मला ह्यातून मार्ग पाहिचे , जर तू असशील तर ….
असं challenge वगेरे केल्याशिवाय काही होत नाही हि खुळचट भावना .
मधेच मनात विचार आला
मला वेड तर नाही लागले ?
कधीपासून एकटाच ह्या माळरानावर बडबडतोय .
मन घाबर घुबर झालं
जोरात ओरडलो " तू आहेस ना ? ऐकतोयस ना ?
………
पाखरांची किलबिल थांबली
क्षणभर आसपासचा आसमंत स्तब्ध झाला ,
कि माझा मलाच भास झाला ?
…………………………….
ते काही असो
त्या दिवसानंतर परत त्याच्याशी भांडायची वेळ नाही आली
----

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान
माझा एक शेर आठवला

तुला जसा पाहिजे तसाही नसेन अगदी
कसाच का भांडतोय ना विठ्ठला तुझ्याशी