यंदा गणेशोत्सव २७ ऑगस्टला सुरु होत आहे. मायबोली गणेश उत्सवाचे हे २६ वे वर्ष.
या गणेशोत्सवात मायबोलीला २९ वर्षे पूर्ण होतील. आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळे आणि सहकार्यामुळे गेली २९ वर्षे मराठीतली पहिली वेबसाईट सुरु आहे.
मायबोली गणेशोत्सव २०२५ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.
मायबोली गणेशोत्सव २०२४ स्पर्धा मतदानाचे धागे
लेखन विभाग
लेखन स्पर्धा १- स्त्री असणं म्हणजे
आम्ही पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. मनोगत लिहिण्याचे काम चालू असतानाच चुकीने धागा ठरलेल्या वेळेआधीच प्रकाशित झाला. आम्ही आतापर्यंत आलेल्या सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार मानतो आणि आमच्या मनोगतासह धागा पुन्हा प्रकाशित करत आहोत.
कालचा ववि धम्माल झाला. सगळी मरगळ दूर झाली असेलच. आम्हा संयोजकांना तर "याची साठी केला होता अट्टाहास" अशी भावना दाटून आली.
प्रचि गृप फोटो इथे दिलाच आहे. बाकी फोटोंची देवाणघेवाण वैयक्तीकच राहू द्यावी ही विनंती. काही आयडींनी गृप फोटो व्यतिरिक्त वैयक्तीक फोटो पब्लिक फोरमवर टाकू नये असा पर्याय निवडल्यामुळे त्याच्या मताचा आदर म्हणून ही विनंती आहे. बाकी बच्चे कंपनीचा (गृपमधे किंवा स्वतःच्या मुला/मुलीचा), स्वतःचा, निसर्गाचा, खादाडीचा, बॅनरचा असे फोटो यायला हरकत नाही.

मायबोलीकरांच्या सहभागाने आणि प्रोत्साहनामुळे यंदाचा मराठी भाषा गौरव दिन सोहळा दणक्यात साजरा झाला. एकूण ४ उपक्रम, ५ खेळ आणि साहित्यिकांच्या स्मरणार्थ विशेष आमंत्रित लेख यांसह भरगच्च कार्यक्रम २५ जुलै ते १ मार्च ह्या दिवसांत घेतले गेले. मराठी भाषेच्या प्रेमाखातर अनेकांनी उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रमाला शोभा आणली.
नमस्कार मंडळी!
आपल्या कवी आणि साहित्यिकांच्या दिमाखदार कृतींनी बहरलेल्या मायबोली मराठीच्या मायेपोटी आपण कवीवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी मराठी भाषा दिन साजरा करतो. ह्या वर्षी ह्या सोहळ्यासाठी नव्या दमाने पुन्हा सज्ज होऊया! आपल्या मायबोलीचा हा उत्सव यंदा २५ फेब्रुवारी ते १ मार्च ह्या काळात विविध उपक्रमांसह उत्साहाने साजरा करूया! ( लेख आणि अभिवाचनासाठी मुदत २ मार्चपर्यंत वाढवली आहे).
