उकडीचे मोदक

पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - लेसन फॉर लेमन्स - तृप्ती आवटी

Submitted by तृप्ती आवटी on 31 August, 2020 - 18:21

मी मागे एकदा लेमनांसाठी भाकरीची पाककृती लिहिली होती. भाकरीचं पीठ मळण्यासाठी एस आकाराचं ब्लेड लावून फुड-प्रोसेसर वापरायचा. एकदम छान, भेगा न पडता भाकरी होतात. उकड मळण्यासाठी हीच पद्धत वापरून मोदक पण छान होतात. उकड मळण्याइतकंच कौशल्याचं काम आहे एकसारख्या कळ्या घेऊन मोदक वळणं. आमच्या घरी मोदक म्हटलं की तळणीचेच. नारळाचा ताजा चव घालून केलेले तळणीचे मोदक फार छान लागतात. उकडीच्या मोदकांशी ओळख झाली ती एका मैत्रिणीच्या घरी. एकदा खाल्ल्यावर तेच जास्त आवडू लागले. सुरूवातीला अनेक वर्ष गौरी-गणपतींसाठी घरी जाणं व्हायचं तेव्हा दोन्ही घरी दोन्ही प्रकारचे मोदक मिळायचे.

विषय: 
शब्दखुणा: 

पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - साक्षी

Submitted by साक्षी on 30 August, 2020 - 10:58

साहित्य
पारीसाठी-

१) २ भांडी (अंदाजे पाव किलो) बासमती तांदूळ पिठी - घरी करणार असाल तर बासमती तांदूळ धुवून, खडखडीत वाळवून पीठ करावे. मी तयार पीठ वापरते.
२) पीठा इतकेच पाणी
३) १ चमचा लोणी किंवा तेल
४) चिमूटभर मीठ

सारणासाठी-
५) २ नाराळांचा चव ( अंदाजे ३ भांडी) ताजा खोवला असेल तर उत्तम - खोबरं खोवताना चॉकलेटी, पाठीचा भाग घ्यायचा नाही. पांढरं शुभ्र खोबरं घ्यावं.
६) गूळ - २ भांडी (गोडाच्या आवडीप्रमाणे वाढवा/ कमी करा) चिरून किंवा जरा बारीक करून घ्यावा.
७) वेलदोड्याची पूड

माघी गणेशजयंतीनिमित्त उकडीचे आंबा मोदक..!!

Submitted by माणिकमोती on 22 January, 2015 - 02:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 

|| गणपती बाप्पा मोरया ||

Submitted by मंदार शिंदे on 6 September, 2013 - 05:32

"नारायण, नारायण" असा जप करत नारदमुनी गजाननाकडं आले. दोन हातात दोन छोटे ब्रश आणि सोंडेत एक मोठा ब्रश. एक सुंदर निसर्गचित्र रंगवण्यात दंग होते श्रीगणेश. पृथ्वीतलावर सातत्यानं ये-जा करणार्‍या मोजक्या देवांपैकी श्रीगणेश एक. आपण जाऊ तिथला परिसर सुंदर बनवायचा त्यांचा आग्रह. हिरव्या-पिवळ्या रंगांची मुक्त उधळण केली होती त्या चित्रात. आता हे चित्र पूर्ण झालं की पृथ्वीवरच्या नक्की कुठल्या भागात बसवलं जाईल, या विचारात नारदमुनी गढून गेले. इतक्यात गणेशाचं त्यांच्याकडं लक्ष गेलं.

"प्रणाम मुनीवर, कसं काय येणं केलंत?" सगळे ब्रश बाजूला ठेवत गणेशानं नारदमुनींना विचारलं.

गणपती बाप्पा - माय फ्रेंड गणेशा... :)

Submitted by सेनापती... on 15 September, 2010 - 01:14

शामिकाच्या मावशीकडचा दीड दिवसाचा गणपती यंदा आमच्या दोघांच्या हस्ते बसवला होता. संपूर्ण सजावट शामिकाने फुले वापरून केली. ह्या २ दिवसात घेतलेले काही फोटो... Happy

१. ऑर्किड आणि जरबेराच्या फुलांची सजावट.

२.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - उकडीचे मोदक