संस्कृती

जराशी गंमत

Submitted by अंड्या on 2 September, 2013 - 12:22

मध्यरात्र उलटून गेल्यानंतरची गाढ झोपेची वेळ, पण तरीही सदानकदा बिछान्यात चुळबुळत पडलेला सदा. इतक्यात डोळ्यासमोर अचानक लक्ष लक्ष काजवे चमकल्यासारखे झाले अन तो दचकून बिछान्यातच उठून बसला. पाहतो तर समोर एक तेजस्वी सिद्धपुरुष ज्याच्या शरीरातून निघणार्‍या प्रकाशाने बेडरूमच्या डिमलाईटच्या प्रकाशाला पुरते झाकोळून टाकले होते. आपण स्वप्नात तर नाही ना हे बघण्यासाठी म्हणून सदा स्वताला चिमटा काढायला जाणार इतक्यात समोरूनच आवाज आला, "अरे राजा, स्वप्न पडण्यासाठी आधी झोप तरी यायला नको का?" .... हे मात्र सदाला पटले, गेले कित्येक दिवस त्याला मनासारखी झोप लागली नव्हती..

गणपती डेकोरेशन/गणपती सजावट

Submitted by webmaster on 31 August, 2013 - 23:41

गणपतीबाप्पा यायची वेळ झाली. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मायबोलीकरांच्या घरात गणपतीच्या सजावटीची तयारी सुरु झाली आहे. तुम्हाला नवीन कल्पना शोधणे सोपे जावे म्हणून गेल्या काही वर्षात गौरी गणपती सजावट/गणपती डेकोरेशन या विषयावरचे मायबोलीवर प्रकाशीत केलेले लेख इथे एकत्र संकलित करतो आहोत.

गणराजा साठी सजावट - वर्षु + शोभा १२३ श्टाईल....

गणपतीसाठी मखर / सजावट

शब्दखुणा: 

विषय क्र. १. - राममंदिर निर्माण चळवळ

Submitted by limbutimbu on 24 August, 2013 - 07:24

विषय क्र. १. राममंदिर निर्माण चळवळ

पार्श्वभूमि:

विविध देशांतल्या, प्रदेशातल्या श्रद्धा - अंधश्रद्धा आणि गमतीजमती, किस्से

Submitted by गमभन on 23 August, 2013 - 03:28

सध्या मायबोलीवरील वातावरण श्रद्धा,अंधश्रद्धा यांच्या चर्चेने काहीसे गरम झालेय. एक नाही, दोन नाही तर चार चार धागे चर्चेने धो-धो वाहत आहेत.

या तंग वातावरणाला थोडे हलके करण्याचा हा प्रयत्न!

http://www.maayboli.com/node/44750 या धाग्यावर रैना यांनी कुठल्याशा देशात नवीन काम सुरु करण्याआधी डुकराचे पिल्लू कापणे, घरात छत्री उघडणे इ. अंधश्रद्धाबद्दल सांगितले, त्यावरुन एक कल्पना सुचली.

आपल्याला माहिती असलेल्या अंधश्रद्धा(भारतातल्या, वेगवेगळ्या राज्यातल्या/देशांतल्या, ), गैरसमजुती, त्यातील गमतीजमती या धाग्यावर टाकूया.

१. घरात छत्री उघडणे
हे लोक छत्री कुठे व कशी वाळवत असतील? Happy

बादशाही...!

Submitted by अत्रुप्त आत्मा on 21 August, 2013 - 16:20

आज सांजच्याला अड्ड्यावरनं घरला निघालो,आणी गाडी सवईनी पानाच्या आमच्या आवाडत्या ठेल्यावर गेली. "बोलो साब...कितना...?" मी-"तीन बनाओ,तीनो पार्सल करो. असं म्हणालो आणी जरा कानावरचा हेडफोन दूर करुन आजूबाजुला न्याहाळायला लागलो. आमच्या सदाशिवपेठेतली ही गल्ली पूर्वी सदाशिवपेठेचा केवळ एक भाग होती आणी भरत नाट्य मंदिराचा चौक ते टिळक स्मारक मंदिराचा चौक यांना जोडणारी गल्ली.."इतकिच" नाट्यमय तिची ओळख होती.पण गेल्या १५ वर्षात या गल्लीला एक नविन ओळख मिळाली... मटण-गल्ली! हो....!

शब्दखुणा: 

विषय क्र. १ - स्वातंत्र्योत्तर काळातील घटना. "सहकार - एक चळवळ"

Submitted by बकुल on 21 August, 2013 - 02:14

"सहकार - एक चळवळ"

विश्व स्वधर्म सूर्ये पाहो

Submitted by नरेंद्र गोळे on 20 August, 2013 - 23:30

खूप खूप वर्षांपूर्वी मानवी जीवन हे पृथ्वीच्या सीमित भूभागावरच स्थिरावलेले होते. उपजीविकेच्या शोधात मानवाने मग नवनव्या भूप्रदेशांचा शोध घेतला. कालांतराने सबंध पृथ्वीचा शोध लागला. आज पृथ्वीवरचे बहुतेक सर्व भूभाग, त्यांवरील चराचरांसह ज्ञात झालेले आहेत.

सेंटिमेंट्स

Submitted by बेफ़िकीर on 20 August, 2013 - 11:32

अनेक प्रगत देशांच्या तुलनेत भारतीय समाज 'सेंटिमेंट्स'वर आयुष्य अधिक प्रमाणात कंठतो असे वाटते.

व्यक्तीपूजा, चमत्कारांची अपेक्षा, अव्यवहार्य भूमिका ही आपल्या लोकांची खास वैशिष्ट्ये वाटतात.

असा समाज भौगोलिक व राजकीयदृष्ट्या जे परकीय असतात त्यांच्या विविध प्रकारच्या हल्ल्यांचा बळी ठरण्याची शक्यता अधिक असावी असे वाटते. हे हल्ले थेट हल्ला, दहशतवाद, आर्थिक हल्लाबोल, शोषण अश्या प्रकारचे (व इतर काही) असू शकतात.

या अवस्थेचे फायदे तोटे यांचा हिशोब मांडला तर बहुधा तोटेच अधिक दिसून येतील.

शब्दखुणा: 

पीएचडी पुराण भाग २:- पीएचडीचा शोध

Submitted by विजय देशमुख on 19 August, 2013 - 22:19

पीएचडी पुराण - भाग १ :- पीएचडी म्हणजे काय?

Submitted by विजय देशमुख on 14 August, 2013 - 03:28

"सुटलं का तुमचं पीएचडी?" सासुबाईंच्या मैत्रीणीनं विचारलं अन मी जेलमधुन बाहेर पडलो की काय असं मला वाटुन गेलं.
एका अर्थाने तेही काही चुकीचं नव्हतं. पीएचडी केलेल्या अन करणार्‍या प्रत्येकाला असच वाटत असावं. पण पीएचडी म्हणजे नेमकं काय, याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत.
"आता तू पीएचडी करणार म्हणजे तुला नोबेल मिळणार का?" मला अ‍ॅडमिशन झाली तेव्हा माझ्या भाचीनं विचारलं होतं. तिला लहानपणापासुन नोबेल लॉरेटच्या गोष्टी सांगण्याचा परिणाम असावा.
"भाऊ मग तुम्ही नेमकं काय करणार आहे, पीएचडी म्हणजे एकदम धासू काम असेल ना"
"हां. मी लेजरवर काम करणार आहे."
"पण त्याचा तर खूप वास येत असेल ना"

Pages

Subscribe to RSS - संस्कृती