संस्कृती

आहे मराठीत माझ्या

Submitted by डॉ अशोक on 27 February, 2014 - 00:54

आहे मराठीत माझ्या
*----------------------*

आहे मराठीत माझ्या, गोडवा अमृताचा
आहे मराठीत माझ्या, गारवा सांवल्यांचा
*
कुठे लावणी तर कुठे भक्त गातो
आहे मराठीत माझ्या, ताजवा ताटव्यांचा
*
असो कोकणी वा, वऱ्हाडी राहणारा
आहे मराठीत माझ्या, चांदवा पौर्णिमेचा
*
अशी वाहते, ना थांबते कधी ती
आहे मराठीत माझ्या, कालवा निर्झरांचा
*
कुणा काय वाटे, पर्वा आहे कुणाला
आहे मराठीत माझ्या, थोरवा अंबराचा !
-अशोक

(जागतिक मराठी दिना निमित्तानं माझी एक जुनी कविता )

आठवणीतली (आवडलेली) पुस्तकं..

Submitted by बोबो निलेश on 22 February, 2014 - 14:00

आठवणीतली (आवडलेली) पुस्तकं..

आतापर्यंतच्या प्रवासात निस्वार्थीपणे बऱ्याच पुस्तकांनी सोबत दिली. त्या पुस्तकांचे आणि त्या लेखकांचे आभार मानण्याचा एक अपुरा, तुटपुंजा प्रयत्न.

का कुणास ठाऊक, पण पहिलं आठवलं… वीरधवल. नाथ माधव यांचं हे पुस्तक लहान पणी मनावर गारुड करून गेलं. आज हँरी पॉटर लहान मुलांवर जी जादू करतो, तीच जादू वीरधवलने त्या काळी माझ्यावर केली होती. त्याचं दुसरं पुस्तक पुस्तक - राय क्लब उर्फ सोनेरी टोळी सुद्धा भन्नाट होतं. त्यावर अशोक सराफचा चित्रपट निघाला होता. बहुधा द मा मिरासदारांचे संवाद होते. मला पुस्तक जास्त आवडलं चित्रपटापेक्षा.

माय मराठी

Submitted by शबाना on 21 February, 2014 - 07:06

माय मराठी ...

गणेश दिघेची आजची FB वरची पोस्ट वाचून बऱ्या च वेळा मनात आलेले हे विचार . या मराठी प्रेमिक मित्राने पातेले शब्दाचे समानार्थी शब्द बघता भगोने, भगुन या शब्दांची उत्पत्ती व वापर याबद्दल लिहिले होते

२०५० मध्ये जगात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या भाषा कोणत्या असतील?

Submitted by बोबो निलेश on 19 February, 2014 - 10:59

ज्ञान जालावर वाचलेला एक चित्तवेधक लेख. असं खरंच होईल का?
त्याचा सारांश अनुवादाच्या रुपात - खास माबोकरांसाठी -

एंगको नामक भाषांच्या भवितव्याविषयी अंदाज वर्तवणाऱ्या मॉडेलनुसार शतकाच्या मध्यापर्यंत(२०५०) जगात खालील पाच भाषा सर्वाधिक बोलल्या जातील.
१) चायनीज (मॅन्डरीन)
२) स्पॅनिश
३) इंग्लिश
४) हिंदी - उर्दू
५) अरेबिक

२०५० पर्यंत सर्वात जास्त स्पॅनिश बोलणारे लोक अमेरिकेत असतील.

शब्दखुणा: 

"आदिवासी जोडप्याने साजरा केला प्रेमाचा दिवस हेलिकॉप्टरमध्ये"

Submitted by निलेश भाऊ on 18 February, 2014 - 02:26

हाँगकाँग मधील मायबोलीकर

Submitted by लक्ष्मी गोडबोले on 17 February, 2014 - 06:56

हाँगकाँगमधील मायबोलीकर

हाँगकाँगमध्ये कुणी मायबोलीकर आहेत का? तिथे आरोग्य व्यवस्था कशी आहे? डॉक्टरला किती पगार मिळतो ? जीवनमान कसे असते?

शब्दखुणा: 

मराठी भाषेचं भवितव्य काय?

Submitted by बोबो निलेश on 15 February, 2014 - 23:01

मराठी भाषेचं भवितव्य काय?

कदाचित हा चावून चावून चोथा झालेंला विषय असेलही. पण मी हा प्रश्न आतापर्यंत माझ्या अनेक मित्रमंडळींना विचारला. पण अजून तरी मला या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर कुणी देऊ शकलेलं नाही.
सगळे जण जीव तोडून आजच्या स्पर्धेत धावताहेत. या प्रश्नावर विचार करायलासुद्धा कुणाला फुरसत नाही.
मराठी शाळा बंद पडताहेत. पडेनात का?
जवळ जवळ सर्वांची मुलं आज इंग्रजी माध्यमातून शिकताहेत. कदाचित काळाची गरज आहे किंवा थोडी फार हाईपसुद्धा म्हणता येईल किंवा मनातली एक असुरक्षिततेची भावना ही असेल कदाचित. किंवा हर्ड मेंटॅलिटी(कळपातली मानसिकता?)सुद्धा असेल कदाचित.

शब्दखुणा: 

फेसबुक नव्हतं तेव्हा..

Submitted by Aseem Bhagwat on 15 February, 2014 - 22:52

आजच्या आम्हा तरुणांना प्रश्न पडतो कि फेसबुक नव्हतं तेव्हां लोक काय करत असतील ? त्यांच्या जीवनात काय अर्थ असेल ? सोशल नेटवर्किंग, चॅट, गटग हे काहीच नव्हतं का ?

या लोकांचा टाईमपास काय असेल ?
आणि त्याचं उत्तर मिळालं..

पहाच !
.
.
.
.
.

facebook.jpg

प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - संस्कृती