स्थळ : बँक, अमेरिका
काउंटरवरच्या बाईने हसून हिंदीत त्याच गाव विचारलं, स्वतःच सागितलं.
साहजिकच त्यालाही जरा आपलेपणा वाटला.
म्हणूनच चेक देताना तो अवघडत बोलून गेला, “आकडा तसा छोटा आहे पण बऱ्याच अवधीने पगाराचा चेक मिळालाय.”
मंदसं हसली आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहिलं.
“आकडा असू दे, पण पगाराचा चेक मिळालाय,नोकरी आहे ते जास्त महत्वाचं. गुडलक!”
तिच्या धीराच्या शब्दांनी सुखावलेला तो ही “गुडलक” म्हणत वळला.
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची,
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ता फळांची..
गणेशोत्सवाच्या निमित्ताने माझ्या आईने फुलांच्या सहाय्याने केलेली गणपतीची रेखाटने.
सर्व पाने फुले फळे भाज्या घरातल्या बागेतील आहेत.

--

--
यावर्षी आमची टेरेस गार्डन छान बहरली आहे. त्यामुळे रोज पानाफुलांचा वापर करून गणपती बनवण्याचा उपक्रम केला.
लाल कर्दळीच्या पाकळ्यांचा वापर करून

जास्वदींची पाने, आलमण्ड चे फूल, मोगऱ्याची फुले वापरून

एक्झोरा ची फुले, गलांडा च्या पाकळ्या, लाल कर्दळीच्या पाकळ्या, आलमण्ड ची फुले वापरून
गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत रोज रांगोळीमधून मी काढलेली गणपतीची वेगवेगळी रूपे
1)
2)
3)
4)
माझा मुलगा स्वयम 9 वर्षांचा आहे. त्याने घरातील साहित्य वापरून वेगवेगळे गणपती बनवले आहेत.
गणपती बाप्पा मोरया
नांव- सौ.साधना ओक
गट ब
मायबोली आयडी- sadho

'मी नाही गौरी आणू देणार घरी', पोरगी खट्टू होत म्हणाली
अन् लहान मोठे आघात झेललेलं माझं मन थोडं हबकलंच
अपशकुनांना घाबरत...
मग थोडा तिला दटावूनच म्हणालो,
असे बोलतात का कधी, गणपती बाप्पा रागवेल हं...
त्यावर लेक म्हणाली चेहऱ्यावरचा भाव न बदलता,
अरे पण ती त्याची आई आहे, त्याला घेऊन जायला येते ना
मला नाही द्यायचा आमचा जी बाप्पा...
मी नाही तिला आणू देणार घरी....
अन् त्या अजाण निरागसतेमधलं धारिष्ट्य भावले मला...
कुठे हरवून बसलोय अशी निरागसता मी?
हवी आहे ती मला... लेकीचा वारसा चालवीन म्हणतोय
तथास्तु
हात जोडून डोळे मिटून
गणपती समोर उभा होतो
बंद डोळ्यात रुप त्याचेच
साठवत होतो
तेवढ्यात त्यानेच साद घातली
म्हणाला डोळे उघडे असेपर्यंत
दर्शन माझे होत नाही
कारण माझ्या व्यतिरिक्त
दिसते तुला बरेच काही
करायला गेलो गणपती पण झाला मारोती
(टुकारवाडीत वाघ)