लेखन

ह्याचं आपलं काहीतरीच...!

Submitted by पाचपाटील on 1 June, 2020 - 00:57

ह्याच्या सध्याच्या जगण्याबद्दल किंवा जगण्याच्या नावाखाली किंवा जगणं चालू रहावं, यासाठी हा जो काही करतोय, त्याबद्दल बोलताना ह्याला अवघडल्यासारखं होतं.

अर्थात त्यात काही स्वत:ची शरम वाटावी असं काही नाही. पण मन लावून बोलण्यासारखंही काही नाही, असं ह्याला वाटतं.

पण 'असं काय आहे' की जे करता करता किमान स्वत:शी तरी मनापासून बोलता येईल, हे काही त्याला माहित नाही.

आणि मुळात 'असा' काही प्रकार असतो का, याबद्दलही‌ ह्याला अलीकडे संशय यायला लागला आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

तरही - नकोसेच वाटे तुझे गाव आता

Submitted by सुप्रिया जाधव. on 31 May, 2020 - 22:30

ओळीसाठी प्राजूचे आभार मानून..

इतंभूत झालेत बदलाव आता
नकोसेच वाटे तुझे गाव आता

तुला मिळवताना हरवते स्वतःला
नको जीवघेणा लपंडाव आता

गरजतोस येथे, बरसतोस तेथे ?
सहन होत नाहीय घुमजाव आता

किती काळ ठेवू भिजत घोंगडे हे ?
तुझ्या तू मनाचा छडा लाव आता

नशीबा तुझ्या वाग मर्जीप्रमाणे
तुझा सोसवेना बडेजाव आता

कुटुंबे मिळवलीस देशोधडीला
नको अंत पाहूस रे धाव आता

उथळ वाटणारी नदी खोल झाली
प्रवाहास आला ठहेराव आता

सुप्रिया मिलिंद जाधव

विषय: 

शापित यक्ष

Submitted by Theurbannomad on 30 May, 2020 - 20:20

चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी ही माध्यमं आवडत नसलेला मनुष्यप्राणी सापडणं आजच्या जगात मिळणं जवळ जवळ अशक्यप्राय आहे. मागच्या चाळीस-पन्नास वर्षात या क्षेत्रात झालेल्या जबरदस्त प्रगतीमुळे आज लहान मुळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येक जण या दृक्श्राव्य माध्यमाशी जवळ जवळ व्यसनाधीन झाल्यासारखा जोडला गेलेला आहे. आजच्या 'डिजिटल' युगात आंतरजालाच्या पायावर उभी राहिलेली OTT platforms या सगळ्यात अजून भर घालत आहेत.

विषय: 

असाही एक लॉक डाऊन

Submitted by nimita on 30 May, 2020 - 05:43

भल्या पहाटे कोंबड्याच्या आरवण्यानी दुर्गाची झोप चाळवली. तिनी हळूच डोळे किलकिले करून खिडकीच्या दिशेनी बघितलं. बाहेर अजून बऱ्यापैकी अंधारच होता. तिनी अजून थोडा वेळ झोपायचं ठरवलं आणि पुन्हा स्वतःला पांघरुणात गुरफटून घेतलं. 'आत्ता मिळतंय झोपायला तर झोपून घे.' दुर्गा स्वतःलाच म्हणाली. पण रोजची लवकर उठायची सवय ...त्यामुळे परत काही झोप लागेना ! उगीच लोळत पडण्यात अर्थ नाही- असा विचार करत शेवटी ती उठलीच. सवयीनुसार हाताबरोबर अंथरूण- पांघरूण आवरून ठेवलं आणि ती स्वैपाकघरात शिरली. आज किती छान वाटत होतं...पहाटेची ही शांत वेळ दुर्गाला नेहेमीच आवडायची. हवेत एक हवाहवासा वाटणारा हलकासा गारवा असायचा.

Pages

Subscribe to RSS - लेखन