गणेशोत्सव

मायबोली गणेशोत्सव २०१९ - स्पर्धेचा निकाल

Submitted by संयोजक on 18 September, 2019 - 01:13

* शब्दधन चंद्र अर्धा राहिला स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक - चंद्र अर्धा राहिला - कुशस्थळीहून आलेला पाहुणा - पायस
https://www.maayboli.com/node/71451#new
chandra 1st prize a1.jpg
###
* हास्यलहरी स्पर्धेचा निकाल
प्रथम क्रमांक - हास्य लहरी - सर्टिफिकेट! - अज्ञातवासी

बृहनपुण्याचे बापट बाप्पामुळे बाल बाल बचावले

Submitted by Madan Hunkare on 27 August, 2026 - 12:47

पुणे शहराच्या महापालिकेत गणेश मंडळांची बैठक होती. महापौर भाजपच्या आणि सत्ताही भाजपचीच. सर्व नगरसेवक भाजपचेच.
अशा या वातावरणात बाप्पाचा उत्सव कसा करायचा यावर गंभीर चर्चा चालू असतानाच पुण्याचे एक नागरिक श्रीयुत बापट म्हणाले कि उत्सव करा पण डीजेमुक्त करा. कुठेच डीजेही नको किंवा स्पीकर्स नको.

यामुळे वातावरण तंग झालं. नगरसेवक, गणपती मंडळांचे कार्यकर्ते तापले. कोण आहे रे तो असे आवाज येऊ लागले. बाका प्रसंग उद्भवला.
बापटांना कुठे काय बोलायचं हे भान नसल्याचे दिसले.

विषय: 
शब्दखुणा: 

चित्रकला उपक्रम - माझे आवडते कार्टून - लहान गट

Submitted by संयोजक on 26 August, 2025 - 14:27

काय छोट्या दोस्तांनो?

शब्दखुणा: 

चित्रकला उपक्रम : माझी आवडती गाडी - किल्ली - ओम

Submitted by किल्ली on 20 September, 2024 - 00:43

Screenshot_20240920_103508_Gallery.jpg
ओमने (वय वर्षे ३) आधी हे एक cartoon रंगवलं होतं पण पार मारामारी केली होती तिकडे, अर्ध ice cream रंगवलं आणि अर्ध हेलिकॉप्टर.
गणेशोत्सवाच्या १० दिवसात एवढे प्रयत्न केले पण चित्र आज पूर्ण रंगवून झालं.
त्यातही वरची गुलाबी बॉर्डर आणि आरसे रमाने रंगवलेत मध्येच येऊन. ओम मी तुला शिकवते असं म्हणून... Proud

शब्दखुणा: 

चित्रकला उपक्रम : माझे आवडते कार्टून - स्वाती_आंबोळे - गौरी आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 16 September, 2024 - 09:38

माध्यम : डिजिटल अ‍ॅप 'प्रोक्रिएट'
कार्टून : 'झूको' - अ‍ॅवटार टीव्ही शो

शब्दखुणा: 

माझ्या आठवणीतली मायबोली - जागू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 12 September, 2021 - 14:45

जवळ जवळ १५ वर्षांपूर्वी (१४ वर्षे ९ महिने मायबोलीच्या नोंदीमध्ये आहेत. पण १५ वर्षे कस भारी वाटत ना) कुठलीतरी रेसिपी शोधत असताना मायबोलीवर ती रेसिपी सापडली. तेव्हा हितगुज हे ठळक अक्षरात येत असल्याने साईटचे नाव हितगुज आहे ह्याच भ्रमात मी कित्येक दिवस होते. वाचण्यासाठी विविध प्रकारची लेखने, कविता, रेसिपीज, अस बरचस साहित्य एकत्रित मिळाल्याने ही साईट मला अत्यंत प्रिय झाली व रोज मी मायबोली वाचू लागले.

शब्दखुणा: 

पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे - पारंपारिक मोदक - मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 31 August, 2020 - 02:55

पाफा तुम्हाला अनेक धन्यवाद. तुमच्या मुळे खायला मिळाले आम्हाला मोदक. तुम्ही एवढं सांगितलंत म्हणून केले ह्या वर्षी मोदक नाहीतर केले नसते मी. भरपूर अडचणी होत्या मोदक करण्यात आणि कोरोनामुळे उत्साह ही नव्हता पण केले शेवटी. त्यासाठी मायबोली आणि पाफा ना पुन्हा एकदा धन्यवाद.

माझ्याकडे वासाचे तांदूळ नव्हते पण बेडेकरांची मोदक पिठी होती घरात म्हणून त्याची उकड काढली आहे .

विषय: 
शब्दखुणा: 

लेखनस्पर्धा - माझा अनुभव कोविड-१९ लॉकडाऊन - ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 August, 2020 - 19:13

तसे प्रामाणिकपणे सांगायचे तर मी एक कमालीचा आत्मकेंद्रीत मनुष्य आहे.

विषय: 

आठवणीतला गणेशोत्सव

Submitted by वावे on 23 August, 2020 - 14:16

लहानपणी मी दरवर्षी गणपतीसाठी आईबरोबर आजोळी मुरुडला जायचे. मुरुड म्हणजे जंजिरा-मुरुड. आमच्या गावाहून आधी एसटीने किंवा कधी बाबाही सोबत असतील तर मोटरसायकलवर, दिघीला जायचं. तिथे लॉंचच्या धक्क्यावर पोचलं, की ’आगरदांडा की राजपुरी’ असा एक पर्याय असायचा. राजपुरीला जाताना लॉंच जास्त हलायची, कारण ते खुल्या समुद्राच्या जास्त जवळ आहे. अर्थात अगदी लहानपणापासून हा प्रवास अनेकदा केल्यामुळे लॉंच कितीही डुचमळली, तरी मला कधीच भीती वाटली नाही. लॉंच चालवणारी माणसं तर लीलया मोटरसायकली, स्कूटर्स लॉंचच्या टपावर वगैरे चढवायची.

मायबोली गणेशोत्सव २०१९ समारोप.

Submitted by संयोजक on 18 September, 2019 - 01:16

नमस्कार मायबोलीकरहो,
मायबोली गणेशोत्सवाचे हे यंदाचं २० वे वर्ष. जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले मायबोलीकर ज्यांना इच्छा असूनही गणपतीत घरी जाता येत नाही अश्या सर्वांसाठी अगदी आपला घरचा उत्सव. उत्सव ऑनलाइन असला तरी यात आरत्या होत्या, पंचपक्वान्नांचा नैवेद्य होता, आरास सजलेली, विविध उपक्रम होते, पानाफुलांच्या रांगोळ्या सजल्या, स्पर्धा झाल्या. उत्सवात मायबोलीचं वातावरण पण एकदम उत्साहपूर्ण असते आणि म्हणूनच नेहमी उत्सव दणक्यात होतो.

Pages

Subscribe to RSS - गणेशोत्सव