शाळा

"राधा"

Submitted by @अज्ञात म्हणे on 8 August, 2026 - 13:45

​राधे तुझा रंग गोरा सावळ्यात भिनला कसा?
जगाचा पालनहार तुझ्या प्रणयात रंगला कसा?

​सप्तसुरांना सहज नाचवी ओठांवर मुरली,
चक्रधारी चक्रात तुझ्या अडकलाच कसा?

​अवघड ज्यास समजणे त्यास दिलीस साथ तू,
समजले एकाकी विटेवर उभा राहिला कसा!

धन्य तुझे प्रेम राधे, धन्य तुझी माया,
स्वये उजेड तुझा, छायेत रमला कसा!

-दक्ष

शब्दखुणा: 

माझी मराठी माध्यम शाळा

Submitted by sumukh on 23 May, 2026 - 00:35

गेल्याच आठवड्यात क्रांतीज्योती विद्यालय ( मराठी माध्यम ) हा चित्रपट माझ्या पाहण्यात आला आणि ते दिवस माझ्या समोर आले शाळेत तेव्हा मिळत असलेला बाबू चा वडापाव शाळेत असलेले आमचे आवडीचे चित्रकला चे चोणकर सर आणि काही से न आवडणारे सहस्त्रबुद्धे सर ( आणि मुख्याध्यापक देखील ) आणि अतिशय कठोर शिस्तीच्या काही बाई अर्थात तेव्हा ठेवलेली आमची टोपण नाव . अनेक अशा आठवणी तराळून गेल्या आणि सोबत आठवल ते आजच्या मुलाची आवडती मीमीक्री आणि सोबत साने गुरुजी ची खरा तो एकची धर्म ही कविता .

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

पिंपळपान

Submitted by अनन्त्_यात्री on 20 May, 2026 - 06:43

चाळत असता वही शाळकरी
आत मिळाले पिंपळपान
आठवणींच्या धबधब्यात मग
भवतालाचे सुटले भान

आठवणी काही धूसरश्या
काही जिव्हारी रुतलेल्या
अर्थ उमगण्या आधी काही
कापूर होऊनी उडलेल्या

पिंपळपानाच्या जाळीतून
काळ निसटला, तरी जेव्हा
वही चाळली शाळेमधली
मला भेटलो मीच नवा

विषय: 

कथा: कोवळ्या सरी- भाग 8 (Last Part: हरवलेला 'षड्ज', #SchoolDaysOf90s)

Submitted by AD75 on 14 April, 2026 - 20:38

कथा: कोवळ्या सरी- भाग 7 (आघात, #SchoolDaysOf90s)

Submitted by AD75 on 14 April, 2026 - 00:00

कथा: कोवळ्या सरी- भाग 6 (स्वर आले जुळूनी, मंदिर वही बनाएँगे!, स्नेहसंमेलन: मिले सूर मेरा तुम्हारा,#SchoolDaysOf90s)

Submitted by AD75 on 13 April, 2026 - 00:49

कथा: कोवळ्या सरी- भाग 5 (क्रिकेटच्या क्षितिजावर नवीन तारा, दाहकतेची चाहूल, बर्फातून आलेले रक्ताचे अश्रू, #SchoolDaysOf90s)

Submitted by AD75 on 9 April, 2026 - 20:24

कथा: कोवळ्या सरी- भाग 4 (मृदगंध (Musical turn to story), संगीतमय झालेली ताडोबा सहल आणि कब्बडीचा तो रंगलेला सामना, #Schooldaysof90s)

Submitted by AD75 on 7 April, 2026 - 15:19

कथा: कोवळ्या सरी- भाग 3 (उन्हाळ्याची सुट्टी, आजी आजोबा, जंगल कॅंप, #SchoolDaysOf90s)

Submitted by AD75 on 5 April, 2026 - 14:47

तुमच्या शाळेचे नाव सांगा आणि थोडी माहिती पण. चला जुन्या आठवणींना उजाळा देऊया.

Submitted by सुमित बागडी on 5 February, 2026 - 10:44

आपल्या शाळेचे नाव, गाव, तिथले शिक्षक आता जरी आपल्यापासून दूर असले तरी कधी कधी आपल्या सर्वाना त्याची आठवण येतेच. आठवण अली कि आपल्या लक्षात येते कि आपल्या आयुष्यातले किती सुंदर दिवस होते ते. इथे आपण सर्व एकतर येऊन आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा देऊया. आपल्या सर्व गमती जमती आणि आठवणी आपण इथे व्यक्त करू शकता.

Pages

Subscribe to RSS - शाळा