दिवाळी पहाट

Submitted by अनघा कुलकर्णी on 21 October, 2013 - 04:14

नुकतीच दिवाळीची सुट्टी लागलेली होती. दिवाळी ते आनंदाचे, भरभराटीचे,
कौतुकाचे, सुंदर दिव्यांचे, सुंदर सुंदर रांगोळ्या यांचे, रंगीबेरंगी आकाशकंदिलाचे व सकाळी
उठ उठ करत आज `दिवाळी पहाट' आहे असे सारखेसारखे सांगत आई हातातली कामे
पटापटा करत होती. छानशा झोपेचे खोबरे होणार म्हणून मी अंथरूणातच पडून दुरूनच तिची
मजा, धांदल बघत होते. सर्व झोपेत होते, पण आई मात्र सकाळी लवकर उठून, अंघोळ
करून पणत्या लाव, आकाशकंदील लाव, अंगणात रांगोळी काढ, तुळशी जवळ दिवा
लाव, मोठ मोठे कणीक-ज्वारीच्या पीठाचे दिवे चारी दिशांना ठेव, पाटाभोवती छान रांगोळी
काढ, अशी धावपळ करत होती. तिने महिरप वेलबुट्टी, पाने, फुले इत्यादींची रंग भरून,
छानशी रांगोळी काढली होती. तेलाचा सुगंध, उदबत्तीचा सुवास, सुगंधी उटणे अशी जय्यत
तयारी होत होती. मधूनच माझी आठवण येऊन, मला उठवत होती. मी पांघरूणात पडून
तिचा गोड ओरडा खात होते. एकदाची सर्वांची अभ्यंगस्नाने मध्येच येऊन
निरंजन, कुंकू, अक्षतांनी व सुपारी, अंगठी सर्व ताम्हणात घेऊन ओवाळा यची. ताम्हणातील
निरंजनाची ती सुखद वात सर्व न्हाणीघर उजळू वून टाके, दोघांच्याही चेहऱ्यावर सुंदर तेज
पसरलेले असे व आनंद ओसंडून वाहताना दिसे. गरमगरम ऊनऊन पाण्याची ती छान
अंघोळ , सोबतीला सुगंधी तेल, उटणे व नंतर कपाळा वर अर्धवट राहिलेला लाल टिळा
त्यामुळे सर्वांचेच रूपडे खुलून दिसत होते. नंतर देवपूजा व फराळा वर ताव मारणे.
हे काम आवडीने नाचत, गात, आनंदात उडया मारत पार पडायचे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users