उषःकाल
चिरून छाती रात्रीची तांबडे फुटेल परत
दूर मग क्षितिजे उधळतील रंग गगनात
प्रभाव काळ्या निषेचा लुप्त होईल क्षणात
अनुपम सुंदर उषेचे रूप राहील मनात
परत एकदा आशेची हृदयात फुटेल पालवी
विश्वास होईल प्रबळ बदलेल सगळी स्थिती
मंतरलेल्या क्षणात तरी सावट कधी पडते
देखावा मोहक जरी वास्तव मग पछाडते
करते चिंता घर जादुचाच ठरेल प्रहर
वेगाने होईल क्षय उन्हे बोचतील परत
राहील तरी प्रतीक्षा उषेची मनातील सदैव
आशा राहील अतूट आणेल अभिप्रेत अर्थ
दिलीप फडके
३ जूनला ’निसर्ग’ या चक्रीवादळाचा तडाखा उत्तर कोकण किनारपट्टीला आणि पालघर, ठाणे, मुंबईला बसणार ही बातमी मी वादळाच्या एक दिवस आधी वाचली. मी जरी सध्या बंगळूरला रहात असले, तरी माझं मूळ गाव श्रीवर्धन तालुक्यातलं. अर्थातच त्यामुळे काळजी वाटली. आदल्या दिवशी रायगडच्या जिल्हाधिकार्यांचा एक व्हिडिओ बघितला, ज्यात त्यांनी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, प्रशासनाने काय खबरदारी घेतलेली आहे, याची चांगली माहिती दिली होती.
निसर्गाने सूक्ष्म हे
दैत्य असे सोडले
अहंकारी माणसा
गर्व सारे तोडले
धूर हा हवेत रोज
नदीत जहर सांडले
प्रतिशोध हा असेल
तुला घरात कोंडले
उपसलेस बहुत तेल
गिरी अनेक फोडले
सजेल ही धरा पुन्हा
तव हस्तक्षेप खोडले
विकास नाव देऊनी
वृक्ष अमाप छाटले
दुःख ते अपार किती
वसुंधरेस वाटले ?
मोडलेस घर त्यांचे
नांगर थेट फिरवले
झुंजलेत पशु त्यांना
हिंसक तूच ठरविले
शिक आता दिला धडा
जरा तरी सुधार तू
देई स्वार्थ सोडुनी
हो मनुजा उदार तू
वृक्षपरीचे दर्शन
कर्नाटक राज्यातील उत्तरकन्नडा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीतील जंगलात भटकायचा योग चालून आला होता. ह्या सदाहरित घनदाट जंगलातून काली नदी वाहते. नदीवर मोठे धरण सुद्धा बांधले आहे. हे जंगल अतिशय समृद्ध असून पश्चिम घाटात असलेली मुबलक जैवविविधता येथे बघायला मिळते. वाघ, बिबट, हत्ती, महाधनेश तसेच किंग कोब्राचा इथे अधिवास आहे.
जंगलातल्या मैत्रीची गोष्ट
भल्या पहाटेच बंटी आणि चिकू जंगलात आले होते. निमित्तही तसेच होते. मुंबईचे प्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉ. सालीम अली त्यांच्या गावाला आले होते. सालीम अंकल (खरे तर आजोबा) त्यांच्या बाबांच्या परिचयातले होते. त्यामुळे सकाळी फिरायला त्यांनी ह्या दोन चुणचुणीत मुलांना सोबत न्यायचे कबुल केले होते. मुलांना थोडी भीती वाटत होती. कारण ते खूप म्हणजे खूपच मोठे शास्त्रज्ञ आहेत असे त्यांना पुन्हा पुन्हा बजावले गेले होते.
बाल्कनीत पक्षी, फुलपाखरे येण्यासाठी काय करता?
नुकताच माझा अमेरीकेतला नव्या नवलाईचा संसार सुरु झाला होता. काही कामानिमित्त बाहेर पडलो. रस्ता एका हाउंसिंग सबडिविजनमधून जात होता. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यामुळे छोट्या फुलबागा बहरल्या होत्या. मला सगळेच नविन त्यामुळे गाडीच्या खिडकीच्या काचेला अगदी नाक लावून बाहेर बघत होते. एका घराच्या पोर्चबाहेर काचेचे लाल झाकणाचे काहीतरी टांगलेले दिसले. पुढे गेल्यावर तसेच एका आवारातील झाडाच्या फांदीला देखील टांगलेले दिसले.
"ते झाडाला लाल झाकणाचे बाटली सारखे काय टांगलय?" मी कुतुहलाने विचारले.
"हमिंगबर्ड फिडर." रस्त्यावरची नजरही न हटवता नवर्याने उत्तर दिले. कुतुहल शमायच्या ऐवजी वाढले.
" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"
पाऊस! पाऊस!!
पाऊस! पाऊस!! झाला सारा
भणाणलेला त्यासवे आला वारा
वारा उडवीतो माझे मन
मनामध्ये तू आहेस खरा
चिंब मी भिजलेली
माझ्यासवे तुझे भिजले तन
हिरव्या रानात घेवूनी कवेत
मीच हरवले माझे मन
पाणी आले पानोपानी
झाडे भिजली रानोरानी
मिठीत तुझ्या मी आलंगूनी
विसरले मी, गेले हरवूनी
- बी ऑलवेज लाईक मी
- ऑलवेज युवर्स पाभे
०३/०८/२०१९