नमस्कार. माझी भाची यंदा बारावी झाली, रिझल्टची वाट बघतोय आता. तिला डिझाईनमध्ये पुढचं शिक्षण घ्यायचं आहे. ती पुण्यात रहात नाही पण तिने हायब्रिड मोड वापरून पुण्यातल्या प्रसिद्ध "गुरूमंत्रा" क्लासमधून १ वर्षं डिझाईनचा क्लास केला आहे. NID, युसिड, पारुल विद्यापीठ (अहमदाबाद) वगैरे ठिकाणच्या एंट्रन्स एक्जाम्स पणा देऊन झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाची यंदाच चालू झालेली डिझाईन सीईटी पण दिली आहे. NID शॉर्ट्लिस्ट नाही झाली पण ऑल इंडिया रँक ३०४ आहे त्यामुळे काही ठिकाणी तिला स्कॉलरशिप मिळण्याची शक्यता खूप वाढली आहे. पण काही गोष्टींचा विचार केल्याशिवाय पुढे जाता येत नाहिये म्हणून धागा काढलाय.
माझ्या मैत्रिणीची लेक सॅन फ्रान्सिस्कोला लॉ कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी येत आहे. ती रहायला जागा शोधत आहे. कुणी आहे का आपलं तिथे?
तिच्या लेकीला कुठला भाग सुरक्षित आहे ही माहिती आणि भाड्यानी जागा कशी शोधायची ही माहिती हवी होती. धन्यवाद.
लव्ह प्रॉ हा शब्द तुम्हाला माहित आहे का? ज्योतिष विषयक छोट्या जाहिरातीत असतो. काही ज्योतिषी या लव्हप्रॉचे स्पेशालिस्ट असतात. थोडक्यात प्रेमप्रकरणाच्या समस्या दूर करणारे ज्योतिषी. या लव्हप्रॉ म्हटलं की मला आठवण येते ती जुन्या पिढीचे सिनेनट व ज्योतिषी श्री शाहू मोडक यांची. त्यांच्या कडे जेव्हा मुंबईत मी ज्योतिषाच्या सर्व्हेनिमित्त भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांनी मला हा प्रश्न विचारला होता.
तुमचे काही प्रेमप्रकरण वगैरे?
मी छे छे अस लाजून म्हटले होते.
असाध्य ते साध्य, करिता सायास!
कारण अभ्यास, तुका म्हणे !!
नीट, जेईई, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, सर्व राज्यांचे लोकसेवा आयोग, रेल्वे, बँकिंग, शॉर्ट सर्विस कमिशन, विमा, संरक्षण दलातील विविध स्पर्धा परीक्षा, इयत्ता १ ली ते १२ वी च्या राज्य अन सीबीएसई / आयसीएसई बोर्ड परिक्षा..... स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अभ्यासासोबतच परिक्षा देण्याचा सराव हा तितकाच महत्त्वाचा असतो!
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले...
आणि तो वैतागला.
"अगं ती फुलांची पिशवी हातात घेऊन काय करते आहेस?"
ती काही बोलणार इतक्यात त्याने ती फुलं परातीत ओतून चुरून टाकली. तेवढ्यात एक डोळा दरवाज्याकडे ठेवत ती स्टूल घेऊन आली. तो परात वर धरून उभा राहिला. तिनं पाकळ्या पंख्याच्या पात्यांवर पसरून टाकल्या. विजेच्या वेगाने पुढील हालचाली करत उतरून स्टूल जागेवर ठेवलं, दिवे मालवले आणि बाकीच्या लोकांप्रमाणे सोफ्यामागे जाऊन लपून बसली.
आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती. थोडी हटके.
आमची Fresher's Party होती. Party Games मधे एक लाल रंगाचा रुमाल मागितला.
"लाल रंगाचा रुमाल ? कोण वापरतं ??" आम्ही विचार करतोय तोपर्यंत तिने तो काढूनही दिला आणि बक्षिसपण मिळवले.
नंतर ती कोणाशी तरी बोलताना ऐकलं " अरे , वो party games मे ना ऐसा ही कुछ पुछते है इसलिये मै लाल रुमाल राखति हू |" झालात ना आश्चर्यचकीत . येवढं party च्या जामानिम्यात इतकं सगळं कोण लक्षात ठेवतो ? आणि ते सुद्धा लाल रुमाल?? माझं पण तसच झाल.
( मायबोली टंकनास येत असलेल्या अडचणींमुळे व अप्रकाशित सुविधा नसल्याने तसेच इतर एडीटर्सचा सराव नसल्याने इथेच पुढचा भाग अपडेट करत पूर्ण केले जाईल. वाचनखूण म्हणून संपादन १, २ हे कीवर्डस दिले जातील ).
एक.
मुरबाडच्या पुढे डोंगरदर्यात समतलपृष्ठावर सेट लागलेला आहे.
एक गाव दिसते. गावाकडे जाणारी नागमोडी वाट. वाटेवर एक भली थोरली शिळा. या शिळेवर बसून काही महान लोकांनी तंबाखू मळली असेल. शिळेला नागमोडी वळसा घालून वाट पुढे गावात शिरते.
खरं तर कॉलेजच्या दिवसांबद्दल लिहिण्यासारखं माझ्याकडे काही आहे असं वाटत नव्हतं. पण फारेण्ड यांचा लेख वाचला आणि मन एकदम....... ( फारेण्ड यांच्याच त्या ठोकळेबाज उपमावाल्या लेखातून वाक्य पूर्ण करा).
तर फारेण्ड-लेख वाचताना मला एकदम कॉलेजातल्या आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आठवल्या. पदवीच्या पहिल्या वर्षाला गेल्यावर म वा मंच्या कार्यक्रमांना हजेरी लावायला सुरुवात केली. एकदा कधीतरी उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेसाठी नाव दिलं. बोलायचा नंबर लागायच्या दोन तीन मिनिटे आधी विषयाची चिठी उचलून शेजारच्या रिकाम्या वर्गात जाऊन विचार करायला वेळ दिला होता.
{ॲन इमॅजिनरी व्हॉट्सअप चॅट लीक्ड
}
अंधारात त्याच्या व्हॉट्सअप स्क्रीनवर नवीन मेसेजचं एक ग्रीन वर्तुळ चमकलं..!
"'तूच आहेस का रे तिथे खाली?"'
तिचा मेसेज पाहून थोडा वेळ तो तसाच शांत बसून राहिला.. मग रिप्लाय दिला, होय.!
"'अरे देवा..! कधीपासून बसलायस तिथे? मी आत्ता पाहिलं वर येताना..! तू जा बरं तिथून आधी..'''
आजची तिसरी रात्र..! तू उत्तर दिलं नाहीयेस अजून..