साहित्य

बहावा

Submitted by Asu on 18 April, 2019 - 10:31

माझ्या मनावर सोनपिवळं गारूड घालणारा 'बहावा' माझ्या 'निसर्गभाव' या काव्यसंग्रहातून -
बहावा

हिरवी हिरवी गार
साडी नवरी नेसली
सोनपिवळ्या फुलांची
अंगी हळद माखली

भर उन्हात उभी
कुणी सखी साजणी
प्रेमभाव मनीचे
पक्षी गातात गाणी

थंड वाऱ्याची येता
मंद झुळूक वनी
पिवळ्या धम्म फुलांचे
डूल डुलती कानी

अंगठा रुतून भूमीत
लाजता ही नारी
वाटे आली जणू
नवरदेवाची स्वारी

शब्दखुणा: 

मोकळा श्वास २

Submitted by jayshree deshku... on 15 April, 2019 - 12:19

|| श्री गोंदवलेकर महाराज प्रसन्न ||
मोकळा श्वास – २
“ठरल तर मग डन! दिदी तू १८ ऑक्टोबरला पुण्यात येत आहेस. माझ्या लेकीचा डॉलीचा पहिला वाढदिवस आपण भारतात साजरा करणार. आई जाऊन दोन वर्ष व्हायला आली तरी माझे भारतात येणे झालेच नाही.” स्वरा तिच्या न्युझीलंडला असलेल्या मोठ्या बहिणीशी लंडन वरून फोनवर बोलत होती.

विषय: 

भिजायचे आठवते, पाऊस पडून गेल्यावर

Submitted by प्रतिक सोमवंशी on 14 April, 2019 - 23:23

मोकळा होतो श्वास, आभाळ रडून गेल्यावर
भिजायचे आठवते, पाऊस पडून गेल्यावर

क्षितिजावरती हे नेमके, गर्द धुके दाटते
भास होती अंधाराचे, सूर्य गडून गेल्यावर

उघडतात मग हळूहळू, बंद कवाडे तेजाची
उघडा पडतो रवी हा, पाऊस निघून गेल्यावर

तू भिजतेस नेहमी, आठवणी मागे पडतात
हुरहूर होते मनाची, तू सोडून गेल्यावर

जरी भिजलेली असेल काल, ही 'प्रति’ ची गजल
भिजायचे आठवते, पाऊस पडून गेल्यावर
©प्रतिक सोमवंशी
Insta @shabdalay

शब्दखुणा: 

बाबासाहेब आंबेडकरांचे गौरव गीत

Submitted by Asu on 14 April, 2019 - 00:03

महामानवास विनम्र अभिवादन -

बाबासाहेब आंबेडकरांचे गौरव गीत

गौरवगीत तुझे गाण्या दगडास बोल फुटावा
भारताच्या थोर सुपुत्रा प्रणाम आमुचा घ्यावा ||ध्रु||

भाग्य आमचे जन्म घेतला तू इथे भिमराया
उद्धारण्या समाजबांधवा झिजविलीस काया
वडील रामजी, आई भीमाई, पत्नी रमाबाई
संसार त्याग केलास तू, पतित समाजापायी ||१||

प्रलय-१९

Submitted by शुभम् on 13 April, 2019 - 06:43

प्रलय-१९

जेव्हा आयुष्यमानचे डोळे उघडले तेव्हा त्याला जाणवलं तो कोणाच्या तरी शय्याकक्षात होता . लुसलुशीत गादी त्याच्या शरीराला आरामदायी वाटत होती . त्याने आजूबाजूला पहिले एका बाजूला ते दोन बुटके आपली मान खाली घालून उभे होते . दुसऱ्या बाजूला एक म्हातारा माणूस त्याच्या शेजारी बसलेला होता . तो काही बोलणार त्याआधीच म्हातारा म्हणाला.....

शब्दखुणा: 

आयुष्य

Submitted by Asu on 13 April, 2019 - 00:17

आयुष्य

आयुष्याच्या वळणावर
जेव्हा मी मागे वळून बघितलं
नाचत होती भुतं
आक्राळ विक्राळ रूप घेऊन
माझ्या अतृप्त इच्छांची

कोसत होती मला
शिव्या शाप देऊन
असं वांझोटं सोडल्याबद्दल
अकाली गाडल्याबद्दल

पण मी ही असहाय होतो
काळाने बलात्कार केला तेव्हा
आणि प्रसवली
ही मृतबाळे जेव्हा
माझ्या इच्छा आकांक्षांची

केले मी त्यांना आता
मनाच्या बाटलीत बंद
बघायचे पुढे आता
नव्या आकांक्षा नवीन छंद

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य