गद्यलेखन

अवास्तव वास्तव

Submitted by प्रभुदेसाई on 15 May, 2021 - 00:20

अवास्तव वास्तव
आज रविवार होता. कदाचित शनिवारही असेल. काय फरक पडणार होता? काही वाटेल ते झालेतरी तरी तो आज काम करणार नव्हता. उठून चहा करून घ्यावा असं वाटलं होतं पण नाही उठला. अंथरुणात लोळत पडण्यातली मजा काही औरच. अर्धवट झोपेत अर्धवट.....
तेवढ्यात टेलिफोन वाजला. त्याने घड्याळात पाहिले. जवळ जवळ दहा वाजत होते. आता कोण फोन करत होतं? टेलेफोन वाजायचा थांबला. चला सुंठीवाचून खोकला गे ... पुन्हा घंटी वाजायला सुरुवात झाली. आता घ्यायलाच पाहिजे. त्याने आळसटलेल्या हाताने फोन उचलला.

दैवगती (भाग २)

Submitted by मिरिंडा on 14 May, 2021 - 05:33

जणू कोणी आत येत असल्याची वर्दीच दिली गेली. आतमध्ये मिट्ट काळोख होता. आतून मात्र एक प्रकारचा कुबट वास आला. तीन वर्षांपासूनची गुदमरलेली हवा तोंडावर आली. मॅनेजर एकदम आत जायला धजत नव्हता. त्याला तीन वर्षांपूर्वीचं पळालेलं गिर्हाइक आठवलं. त्या दिवशी रात्री साडे तीनच्या सुमारास घामाघूम होऊन भीतीने डोळे गरगर फिरवीत , थरथर सुटलेला  कौंटरजवळ धावत आलेला तो मध्यमवयीन माणूस त्याला आठवला. त्याचं सामानही त्याने नेलं नव्हतं. अचानक सदाशिवचा आवाज येऊन तो भानावर आला. एक पाय आत टाकीत त्याने अंदाजानेच लायटाचं बटण दाबलं. मंद पिवळसर प्रकाशात  ते दोघे आत उभे राहिले. खोली चांगलीच प्रशस्त होती.

गाईड ( धक्कथा)

Submitted by पारंबीचा आत्मा on 13 May, 2021 - 16:49

"जीव द्यायला गडच सापडला का ?"

स्वतःच्याच नादात असलेली ती या प्रश्नाने थबकली. आवाजाच्या रोखाने तिने पाहीले. जवळपासच्याच गावातला कुणीतरी खेडूत होता. रापलेला वर्ण, पस्तिशीच्या घरातले वय पण केस मागे गेलेले. धारदार नाक, पाणीदार डोळे मात्र अतिशय गबाळा वेष.

मी काहीही करीन याला काय करायचं असा विचार येऊन ती जमेल तितकं उर्मट उत्तर देणार होती. पण त्याच्या नजरेत असं काही होतं की ते उत्तर आवंढ्यासोबत गिळलं गेलं.

" मरण्याची हौस आहे ?"
" तुम्हाला कुणी सांगितलं मी इथे जीव द्यायला आलेय म्हणून ?"

पहिलं गुलाब - भाग २

Submitted by तुषार विष्णू खांबल on 13 May, 2021 - 11:36

पहिलं गुलाब – 2
शब्दरचना - तुषार खांबल

पहिलं गुलाब - भाग १
https://mabo.page.link?utm_campaign=inApp-share&apn=com.maayboli.mbapp1&...

शब्दखुणा: 

आता मात्र खरोखर सिरिअस हंं!

Submitted by प्रभुदेसाई on 13 May, 2021 - 10:27

जाणीव, नेणीव आणि फ्री विल ह्यांची ऐसी तैसी.
पहाटे म्हणा किंवा सकाळी म्हणा सहा वाजले की तात्याचा मोबाइल तात्याला विसाव्या शतकातील गोड गोड गाणी ऐकवून जागा करतो. तुम्ही काहीही म्हणा पण तात्याला स्वतःला विसाव्या शतकातील गाणी फार आवडतात. त्या वेळी कोणी लता मंगेशकर नावाच्या एक गायिका होत्या त्यांचा गळा गोड होता. त्यांनी गायिलेल्या बऱ्याच गाण्यांचा संग्रह तात्याकडे आहे. हा गाण्यांचा संग्रह तात्याला कसा मिळाला? सगळं सांगत बसलो तर वेळ लागेल. पुन्हा केव्हातरी.

ओळख लपवल्याने मनाला लागलेली टोचणी

Submitted by सीक्रेट गुप्ता on 13 May, 2021 - 07:48

मी मायबोलीवर ज्या नावाने वावरते ते माझे खरे नाव नाही. सुरूवातीला खरी ओळख देणे मला योग्य वाटले नाही. रिअल लाईफ मधे पण माझ्या दोन ओळखी आहेत. एक व्यावसायिक कारणासाठी काही कारणाने घ्यावे लागलेले नाव. पण माझ्या व्यवसायातल्या बहुतेकांना हे माझे खरे नाव नाही हे माहीत आहे. ती एक गरज होती.

शब्दखुणा: 

मिस्ड कॉल

Submitted by प्रभुदेसाई on 13 May, 2021 - 07:39

मिस्ड कॉल
विनू आणि गोट्या शेताच्या बाजूला असलेल्या चिंचेच्या झाडाच्या चिंचा पाडत होते.
“ए पोरांनो कुठला गाव आहे हा?” दोन मध्यम उंचीच्या मध्यम वयाच्या बाप्यांनी प्रश्न केला.
“गावात नवीन दिसताय जणू, नाव नाय माहित? मग इथपोत्तर आलात कसे?” विनू आश्चर्यचकित झाला.
“मी आहे अल्फा१ आणि हा माझा मित्र झेटा२६. आम्हाला तहान लागली आहे. प्यायला पाणी मिळेल का?” स्वतःला अल्फ़१ म्हणणारा विचारत होता. आता गोट्या पुढे सरसावला.

दैवगती

Submitted by मिरिंडा on 10 May, 2021 - 02:43

१९५५/५६ सालची  गोष्ट.  उन्हाळ्याचे दिवस. . तो शेतीच्या कामासाठी मुंबईहून दिवड्यासाठी निघाला.. दिवडा.... साठगांवच्या पुढचं त्याचं गाव. साठगांवहून बसने चार तास लागत. सकाळची एस्टी न मिळाल्याने त्याला रात्र साठगावात काढणं भाग होतं. ते फार मोठं गाव नव्हतं. प्रथमच संध्याकाळच्या एसटीने तो उतरला होता . रात्रीचे दहा वाजत होते.  आता हॉटेल मध्ये राहणं भाग होतं. एस्टी स्टॅंडवरुन तो खांद्यावरची बॅग सांभाळीत हॉटेलच्या शोधात निघाला  होता.  सकाळशिवाय दिवड्याला जाणारी एस्टी नव्हती. हॉटेल मिळालं नाही तर स्टॅंडवरच झोपायचा त्याचा विचार होता....  वडिलोपार्जित घर आणि जेमतेम एकराची शेती असलेला तो .

Pages

Subscribe to RSS - गद्यलेखन