बटाट्याचे उपयोग
स्वयंपाकघरात गाल फुगवून बसला होता बटाटा
अंगावरल्या डोळ्यांनी मला पाहत होता ||
माझ्याशी बोलायला लागला तो जेव्हा
खरे नाही वाटले मला तेव्हा
तुम्हालाही वाटेल मी सांगे हा प्रसंग खोटा ||
"
खाण्यामध्ये उपयोग माझे आहेत खूप मोठे
तरी तुम्ही का बोलतात डोक्यात आहे कांदे बटाटे
नाकाने सोलाल कांदे तर आहे तुमचाच
तोटा ||
कांद्याचे वाढले ना रे बाजारी भाव
चढ्या दराने गंजले सारे रंकराव
आता मला आला आहे मान मोठा ||
अनेकदा हॉटेलमध्ये आपण जेवायला गेल्यावर समोर अन्न येतं आणि केव्हा एकदा जेवायला सुरुवात करू असं होतं. अनेकदा तर शेजारच्या टेबलवर काय आलंय हे पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. अन्नाचा सुवास हे तिथे एक मुख्य कारण असतं. आजकाल समोर आलेला पदार्थ खाण्यासाठी केवळ तो कसा लागतोय इतकंच पुरेसं होत नाही. तो पदार्थ दिसतो कसा, त्याची मांडणी कशी आहे हे सर्वही महत्वाचं झालंय. त्यात फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या माध्यमांमुळे अन्नाचे फोटो काढून ते सर्वांशी शेअर करणं अजून वाढलं आहे. त्यामुळे दिसण्याला अजूनच महत्व. अगदी थोड्या दिवसांपूर्वी आलेला 'गुलाबजाम' हा चित्रपटच त्याचं उत्तम उदाहरण आहे.
कोणाला चांगले हापुस, पायरी वगैरे आंबे विक्रेते माहीती आहेत का?
ज्यांनी स्वतः किंवा त्यांच्या मित्र/परीवारांनी अनुभव घेतला आहे.
मला मुंबईत कोणाला तरी भेट पाठवून द्यायचीय. ऑनलाईन पैसे भरायचे असतील तर उत्तम.
नसली तरी पैसे पोस्ट करेन पण खात्रीशीर ठिकाण माहीती हवे आहे. ( काळेबंधू आंबेवाले नको आहेत, खूपच वाईट अनुभव आहे दोन वर्षाचा.
नमस्कार!
अहमदनगर - औरंगाबाद राज्य महामार्ग क्र ६० वर अहमदनगर पासुन अंदाजे ६० किमी वर श्री क्षेत्र देवगड हे गांव आहे. तेथील दत्त मंदिर प्रसिद्ध आहे.
तेथे मला ३७,००० स्क्वेअर फुट रोड्लगत जागेवर एक रेस्टॉरंट सुरु करायचे आहे. सदर जागा नेवासा, श्री क्षेत्र शिंगणापुर, औरंगाबाद आणि आदर्श गांव गोगलगांव यांपासुन १० ते ५० किमी अंतरावर आहे.
माझ्या कल्पनेनुसार - एक डायनिंग हॉल, एक कॉन्फरंस रुम (१०० क्षमता), एक १५-२०,००० स्क्वे. फुट. लॉन, ५ रुम्स/व्हिलाज (लॉज), अशी योजना करतो आहे.
त्याबाबत आपली मदत अपेक्षित आहे.
मुळ लेखः चंप्या दुधवाला....! http://www.maayboli.com/node/12638
सब फार्मर्स अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लि. नेवासा तर्फे पुणे येथे एस बी आय बॅंकेसमोर, ससानेनगर ला २५ डिसेंबर २०१५ पासुन सुरुवात झाली आहे. स्टेट बॅन्क ऑफ इंडिया, ससाने नगर शाखेसमोर दुध व पनीर विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे.
शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री सेवा उपलब्ध असल्याने निर्भेळ, शुद्ध दुध उपलब्ध आहे. ५०० मिली पाऊच रु. २०/-
पनीरः प्रती १०० ग्राम : रु. २५/-
लवकरच खवा (मावा) उप्लब्ध केला जाईल.
सदर कंपनी शेतकर्यांची शेतकर्यांसाठी आहे!
शुभेच्छा नव-वर्षाच्या
करा निर्धार नव-वर्षाचा
यशप्राप्तीसाठी झटण्याचा
सुख-शांती-यश देखील
खुशी-खुशीने वाटण्याचा
मिळत राहील यश सदैव
तुमच्या सार्या प्रयत्नांना
जीवनी तुमच्या तत्परतेने
डिस्चार्ज मिळो यातनांना
झाला प्रफूल्लित मन:पुर्वक
हा घ्या शब्दफूलांचा गुच्छा
देतो आपणास स्नेहबंधाच्या
नव वर्षाच्या नव शुभेच्छा
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आमचे संविधान
स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान
धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
अन्नाची सुरक्षितता,...?
आहाराच्या असुरक्षिततेच्या
ऊसळ्यांवरती ऊसळी आहेत
माणसांसाठीच्या अन्नामध्ये
माणसांकडूनच भेसळी आहेत
जणू मना-मनात पोसलेले
निष्काळजीपणाचे वेल आहेत
माणसांची दक्षता घेण्यासाठी
आज माणसंच फेल आहेत,..?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
सवय दोन मिनिटांची
नवरा म्हणाला बायकोला
तु अशी का फुगली आहे
दोन मिनिटात खायला कर
जाम भुक लागली आहे
मग बायको म्हणाली नवर्याला
म्यागीची हौस अजुन का भरली नाही,.?
दोन मिनिटाच्या नाष्ट्याची
माझ्यात हिंमत उरली नाही
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३