भटकंती

२ लेख भटकंतीच्या स्वप्नरंजनाचे

Submitted by सामो on 12 December, 2019 - 15:48

लेख १ - दिवास्वप्ने- भटकंतीची

“God gave us memory so that we might have roses in December.” - या वाक्यात एक बदल करावासा वाटतो, “God gave us daydreams so that we might explore richness otherwise evading us.” ..... माझ्या दिवास्वप्नांबद्दल बोलायचं झालं तर,पद्मा गोळे यांची अत्यंत सुंदर कविता लहानपणे शिकले होते तीच इथे चपखल बसते -

"मी एक पक्षीण आकाशवेडी
दुजाचे मला भान नाही मुळी,
.
.
अशी झेप घ्यावी , असे सूर गावे
घुसावे धगामाजी बाणापरी,
ढगांचे अबोली, भुरे केशरी रंग,
माखून घ्यावेत पंखांवरी"

....तो जिंदा हो तुम !

Submitted by विद्या भुतकर on 10 December, 2019 - 21:04

दोन आठवड्यांपूर्वी एका ट्रिपला जाऊन आलो. ५-६ दिवसांची ट्रिप होती. खरंतर मी आणि नवऱ्याने ठरवूनच कधी नव्हे ते आधी बुकिंग करुन वगैरे सर्व नीट केलं होतं, तेही दोनेक महिने आधी. ट्रीपला जायचे दिवस जवळ आले तसे उत्साहाने खरेदीही केली. ती जागाच तशी होती, कॅंकून, मेक्सिको. इथल्या थंडीतून मस्त गरम वातावरणात ५-६ दिवस मिळणार होते. स्विमिंग पूल, तिथलं जेवण, ऊन आणि बाकीही पोरांच्या साठी ऍक्टिव्हिटीज प्लॅन केल्या होत्या. आणि इतकं सगळं असूनही मला मनात एकच भीती होती. दोन वर्षांपूर्वी याच महिन्यात अशाच उत्साहाने डिस्नीला ट्रिपला गेलो होतो. आणि परत येताना पाठदुखीचा जो त्रास सुरु झाला तो सर्जरीवरच थांबला.

Pages

Subscribe to RSS - भटकंती