पाऊस
वेड्या पावसानं ...
वेड्या पावसानं ...
जीव वेडावला बाई कसा वेड्या पावसानं
अंग ओलावत जाई मन चिंब थरारून
असा भरारा पाऊस दिशा जाती काजळून
मना चाहूल कुणाची जरा जाते उजळून
टप टप पावसाची लय जातसे भिनून
एक शिरशिरी आंत नकळत खुणावून
येतो पाऊस माहेरा जरा थांबून थांबून
कळ आतली उगाच उठे दाटून दाटून
कुणा लुभावे पाऊस कुणा घेतो कवळून
डोळा लागला पाऊस कढ अंतरी पिऊन ....
येताना ढग दाटून
झुंबर ढगांचे
सांगावा
सांगावा
आले सांगावा घेऊन
ढग गहिरे जरासे
येई पाऊस मागून
सोड मनाचे निराशे
येतो हवेत गारवा
वारा वाभरा दुवाड
किलकिले करुनिया
ठेव मनाचे कवाड
नवलाची येई खास
मत्त वळवाची माया
घेई ऊरात भरून
भुई-अत्तराचा फाया
पखरण थेंबुट्यांची
होत राही अविरत
सल कोरडे विरु दे
ओल राख अंतरात ....
रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि पाणीटंचाईवर मात करण्याचे इतर उपाय
गेल्यावर्षी भारतात खूप कमी पाऊस पडला. तो कमी पडला किंवा जास्त पडला तरी वाढती लोकसंख्या, वाढती बांधकामं, क्षेत्रफळ आणि त्यावर राहणारी लोकं ह्यांचं व्यस्त प्रमाण ह्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न उग्र होत आहे. शहराचे काही ठराविक भाग सोडल्यास कॉर्पोरेशनचे ( धरणांतून येणारे )पाणी नीट उपलब्ध नाही. त्यामुळे पाण्यासाठी बेसुमार बोअरवेल्स खणल्या जात आहेत आणि टँकर लॉबी फोफावल्या आहेत.
पुन्हा पाऊस वळला
पाठमोरा होता होता पुन्हा पाऊस वळला
दिलाशाच मंद हासु रानी सांडूनिया गेला ∥ धृ ∥
नाचणारया पावलांनी बाळवारा वनी आला
पाचोळ्याचे भिरभिरे फिरवीत उधळला
संगे गिरकी घेताना पंख फुटले धुळीला ...
रानझरी खुदकली गरतीचा साज ल्याली
सानओहोळ कुशीत घेऊनिया झेपावली
सांगे कडेकपारींना 'आला मु-हाळी न्यायला '...
घळीतून कारवीचे निळे सूर ओघळले
आवतन मधुदाट कुणी वेचले, टिपले
निळ्या पावरीचा सूर आज समेवर आला....
रानअळु खुळावले सुखभारे हिन्दोळ्ले
कुणी पर्णकायेवरी चन्द्रमणी खेळवले
चाळा रानझुळुकेचा गोड छळुनिया गेला …
सोनसळी कांतीवर पंखस्पर्श थरारला
पाऊस
पाऊस
पावसाचे टपोरे मोती
थेंब झेलून घ्यावे हाती
अलगद अलगद पाकळ्यांवरती
दवबिंदू हे कसे डोलती
पाने ही भिजून ओली
उमलली त्यावर जाळीची नक्षी
गर्द हिरवे डोंगर कडे
धुकेही दाटले चोहिकडे
मोर वनी नाचती गाती
कोकिळ कुहुकुहु साद घालती
आला बघा हा पाऊस आला
मनास माझ्या भिजवून गेला
धुंद मातीचा सुगंध ओला
धरेवर सजला प्राजक्ताचा सडा
क्रांति पाटणकर
पाऊसःआगळावेगळा - पण ओळखीचा
पाऊस - कधी धो-धो पडणारा, तर कधी रिमझिम बरसणारा, कधी रौद्र रुपात तांडव करणारा तर कधी गायब होणारा ! अशी पावसाची विविध रुपे तर सर्वज्ञात आहेत. पण या नेहमीच्या पावसाव्यतिरिक्त आहे का असा एखादा पाऊस जो आपल्या सार्यांना चिरपरिचित आहे अगदी अनादि काळापासून?
अगदी तान्हे बाळ असतानाही आपल्या गरजा, हट्ट पूर्ण करुन घेण्यासाठी आपण 'या पावसाचा' उपयोग करुन घेत असतो. या पावसाचे थेंब पाहून भलेभले घायाळ होतात, अगदी शरणागतीही पत्करतात.
गॄहराज्यावरी गाजवी सत्ता राजा चिमणा एक
अन या 'चिमण्या राजाचं' हुकुमी अस्त्र असतं 'हा पाऊस' !
आलं ना लक्षात मी कोणता पाऊस म्हणतेय ते?
पाऊस असाही ...
पाऊस असाही ...
माझ्या मनात पाऊस
येतो अधून मधून
खुणावित जातो वेडा
जरा डोळे मिचकून
घोंघावत रोरावत
येतो वाभरा बनून
आवरावे कसे याला
कसे घालावे बांधून
रेशमाच्या झालरींनी
करी नाजूक शिंपण
याचे विभ्रम पहाता
जातो आश्चर्य पावून
ऊन-पावसाचे नाते
उलगडे असासून
शब्दरुप गर्द पान
येई वर तरारून .....
----------------------------------------