रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि पाणीटंचाईवर मात करण्याचे इतर उपाय

Submitted by अगो on 10 February, 2016 - 10:16

गेल्यावर्षी भारतात खूप कमी पाऊस पडला. तो कमी पडला किंवा जास्त पडला तरी वाढती लोकसंख्या, वाढती बांधकामं, क्षेत्रफळ आणि त्यावर राहणारी लोकं ह्यांचं व्यस्त प्रमाण ह्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न उग्र होत आहे. शहराचे काही ठराविक भाग सोडल्यास कॉर्पोरेशनचे ( धरणांतून येणारे )पाणी नीट उपलब्ध नाही. त्यामुळे पाण्यासाठी बेसुमार बोअरवेल्स खणल्या जात आहेत आणि टँकर लॉबी फोफावल्या आहेत.
मी राहते तो पुण्याचा भाग नवीन आहे. कॉर्पोरेशनचा पाणीपुरवठा तर अत्यल्प आहेच पण कमी पावसामुळे बोअरवेल्स आटत चालल्या आहेत. पैसे फेकून सुद्धा पाणी मिळणार नाही अशी स्थिती येण्याची चिन्हे आहेत कारण टॅंकरवालेही बोअरवेलचे पाणी उपसतात.

पुण्यात ऑक्टोबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा चालू आहे. धरणातल्या पाण्याची स्थिती बघता लवकरच तो दोन किंवा जास्त दिवसांआड होईल अशी शक्यता आहे. आमच्या भागातल्या बहुतेक बोअरवेल्स आटल्या आहेत किंवा त्यातले पाणी कमी झाले आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत असे समजले. वॉटर टँक्स बनवून त्यात पाणी साचवणे ही पद्धत आहे तशी बोअरवेल्स रिचार्ज करणे ही सुद्धा एक परिणामकारक पद्धत आहे असे समजले.

इन्नाच्या पोस्ट्समधून सांडपाणी पुनःवापरात आणणे ह्या महत्त्वाच्या उपायाबद्दल समजले.

इथे काय चर्चा अपेक्षित आहे :
१. रेनवॉटर हार्वेस्टिंग कसे करतात, त्यातल्या खाचाखोचा, खर्च किती येतो ह्यावर चर्चा
२. बोअरवेल्स रिचार्ज / रिवाईव्ह करणे ह्यावर चर्चा
३. रेनवॉटर हार्वेस्टिंग करणार्‍यांचे अनुभव
४. पुण्यात,वेगवेगळ्या शहरांत हार्वेस्टिंगचे/ वॉटर रिसायकलिंगचे काम करुन देणार्‍या कंपन्यांचे संपर्क, पत्ता इत्यादी.

५. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल ह्याबद्दलच्या सगळ्या तांत्रिक उपायांवर सकारात्मक उहापोह.

पाणी काटकसरीने कसे वापरावे त्याची चर्चा ह्या धाग्यावर नको कारण त्यासाठी सावलीने थेंबे थेंबे तळे साचे असा वेगळा धागा काढलेला आहे.

धन्यवाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाणी रिसायकल करणे पण गरजेचे आहे.

मला चांगले आठवतेय, कि सायकल चालवण्यासारखे एक साधेसे तंत्रज्ञान वापरुन कुणीतरी पाणी शुद्ध करण्याचे यंत्र बनवले होते. मी बहुतेक हे कुठल्यातरी माहितीपटात बघितले पण डीटेल्स विसरलो.

बोअर रिचार्ज पॉईंट तयार करणे ही काळाची गरज आहे.

http://jalvardhini.org/index.php

दिनेशदा कदाचित तुम्ही अ‍ॅक्वाडक्ट बद्दल तर बोलत नाहीत ना?

https://www.youtube.com/watch?v=-U-mvfjyiao

आमचे गाव विदर्भात आहे (अकोला) आम्ही आमच्या घरी बोरवेल रिचार्ज पॉइंट साधारण १० वर्षे अगोदरच करून घेतलाय, खर्च जास्त नसतो (आजचे महाग वातावरण पाहता खर्च त्याकाळ पेक्षा जास्तच वाटेल पण आजच्या तुलनेत ठीक ठीक वाटेल) मुख्य खर्च पाइपिंग चा असतो, स्वतंत्र घर असता टेरेसचे जितके आउटलेट आहे तितके सगळे पाइपला जोडून (इच्छा असल्यास किचन सिंक अन बाथरूम चे आउटलेट सुद्धा जोड़ता येतील) त्याचे एक सामयिक आउटलेट बोर पाशी न्यावे, जिथे ह्या आउटलेटचं तोंड असेल तिथे एक चार बाय चार बाय सवा पाच चा खड्डा खोदावा, ह्यात टिपिकल कोळसा (preferably दगडी) वाळु खड़ी अन रोड़ी चे थर घालावे, अन पाणी त्यात जाईल असे बघावे, त्यावर मातीचा थर घालवा

आमच्या घरी केलेली सिस्टम ही बोर पासुन तीन फूटाच्या अंतरात आहे अन आमची बोर आमच्या लॉनच्या एका टोकाला आहे लॉन ला घातलेले पाणी अन असे रिचार्जचे पाणी सगळे बोर जवळच मुरते, आम्हाला ह्या सिस्टम चा प्रचंड जास्त फायदा झालाय, अगदी उन्हाळ्यात सुद्धा बोर ला सतत चार पाच तास उपसा होईल इतके पाणी असते (इतके लागतच नाही पाणी अजिबात) अन आम्ही जवळपास पंचेचाळीस वेगवेगळ्या प्रकारची झाडे अन वीस बाय चौदा चे लॉन (कश्मीर डायमंड) असलेली बाग़ खाश्या वर्हाड़ी उन्हाळ्यात सुद्धा अतिशय सुलभ पणे अन सोपेपणाने मेन्टेन करू शकतोय

पिंगू, बरोबर. आणि सोन्याबापूंनी छान सांगितले आहे.
आपल्याकडे प्राचीन काळी ( मोहेजोदाडो काळात ) एक मोठे मडके करुन ते फोडून परत त्याची खापरे जुळवून असे प्रकार करत असत. कदाचित तेही त्यात बापू म्हणताहेत तसे मटेरियल वापरत असतील.

अगो, जिऑलॉजीचा ही अभ्यास करावा लागतो, तू रहातेस त्या भागात, नदिच्या जवळ असल्यानी , इंपर्व्हिअस स्ट्राटा नदिच्या दिशेनी उतरता असू शकतो. पाणी जमिनीत मुरवणे हे प्रत्येक वेळी स्वतःसाठी उपयोगी होइलच असे नाही. काही वेळा जनहितार्थ होइल!

सोन्याबापु धन्यवाद.

मीही गेल्या मे मध्ये गावी बोअर खोदुन घेतलीय. आंबोलीत अजुन तरी पाण्याचा दुष्काळ नाहीय पण तो दिवस फारसा दुर नाहीये. माझ्या आजुबाजुलाही काही जणांनी बोअर खोदलीय. हे बोअर रिचार्जचे गावी गेल्यावर लोकांना सांगुन सगळ्यांना करायला लावते.

बोअर रीचार्जबद्दल अजुन माहीती असल्यास ती कृपया द्या.

रेनवॉटर हार्वेस्टींगबद्दल अजुन माहिती वाचायला आवडेल. गावी ही कल्पना अंमलात आणणार आहोत.


पाणी जमिनीत मुरवणे हे प्रत्येक वेळी स्वतःसाठी उपयोगी होइलच असे नाही. काही वेळा जनहितार्थ होइल!

आपण केलेले जनहितार्थ, जनांनी केलेले आपल्या हितार्थ. मला तरी वाटते या संकल्पना सगळ्यांनी राबवण्यामध्ये सगळ्यांचे एकत्रित हित आहे. Happy

दिनेश,

तुम्ही अगदी 'कपाळावर खिळा' मारलात!

सिंगापूरचे प्रधानमंत्री म्हणतात, "आमचा देश प्रगत आहे कारण आम्ही गटाराचे पाणी पितो." म्हणजे गटाराचे पाणी पुनःशुद्धीकरण करून ते पिण्याला वापरतात. लंडनमध्ये म्हणे सातव्यांदा रिसायकल केलेले पाणी पिण्याला वापरतात. म्हणजे पिण्याला वापरण्यापूर्वी सहा वेळा ते इतर गोष्टींसाठी वापरून झालेले असते.

शरद , हा त्यापुढचा मुद्दा झाला.
ग्रे वॉटर ( सांडपाणी ) स्वच्छ करून परत वापरणे.!
निट ( फुल एफिशिअंसी)चालणारा सुवेज ट्रिटमेंत प्लांट, १०० पैकी किमान ८० % पाणि पुनर्वापराला उपलब्ध करून देउ शकतो.

सोन्याबापू, मस्त पोस्ट. धन्यवाद.

इन्ना, तू सांगितलेला मुद्दा लक्षात आला नव्हता. त्यावरही विचार करावा लागेल. जनहितार्थ झाले तर हरकत नाही पण आधी स्वतःला ऑक्सिजन मास्क लावणे कुणीही प्रिफर करेल ! साधना म्हणते तसं सरकारी पातळीवरुन सगळ्यांनाच हे करण्याची सक्ती झाली पाहिजे. शिवाय असे सांगितले गेले तर बरीच लोकं कॉन्ट्रिब्यूट करायलाच तयार होणार नाहीत !!

आम्ही कॉलेजात असताना यावर एक प्रोजेक्ट केले होते. तेव्हा अगदी हिंडून फिरून माहिती मिळवली होती. आता सगळे धूसर आठवते आहे. Sad मेहंदळे गॅरेज जवळ एक संस्था आहे हे काम करणारी. जरा शोधून माहिती देईन.

आशूडी, प्लीज दे. काही दिवसांतच सोसायटी मिटिंग आहे. त्यात माहिती द्यायची आहे.

अजून एक करता येण्यासारखी गोष्ट - पाणी जमिनीत जिरु शकेल अशा पृष्ठभागांचा जाणीवपूर्वक प्रसार. काँक्रिट हे सोइचे असले तरी त्यावर पडणारे पाणी वाहून जाते. त्या ऐवजी पाणी जिरेल असे पृष्ठभाग असतील तर पाणी तिथेच जिरेल, जोडीला वाहून जाणार्‍या पाण्यामुळे जी तात्पुरती ' गुढघाभर पाणी' परीस्थिती निर्माण होते ती देखील कमी होइल.
लॉनला पर्याय म्हणून त्या त्या परीसरात उपलब्ध असलेले, कमी पाण्यात वाढणारे ग्राउंड कव्हरचा वापर, कमी पाण्यात होणार्‍या स्थानिक झाडांची लागवड करुन जाणीवपूर्वक झेरीस्केपिंग यासारख्या गोष्टी सोसायटीच्या आवारात तसेच कमर्शिअल कॉम्पेक्स मधे केल्यास पाणी वाचवता येईल.

मी जिथे राहतो तेथे पाउस फक्त ५०० मिमि पडतो कधी कधी तर ३०० मिमिच पडतो. तेम्व्हा बागेला पाणी घालण्याची परवानगी नसते. म्हणून मी बागेमधे सात tanks with a total capacity of 14000 litres बसवले आहेत. तसे करणे मुम्बै पुण्यात करता येणे शक्य नाही पण सोसायत्यामधे करणे शक्य आहे व करावे. त्यामुळे म्युनिसिपलिटीच्या पाण्यावर जास्त अवलम्बून राहावे लागणार नाही.
स्वाती२ ने लिहिल्याप्रमाणे सर्व surfaces impermeable न ठेवता ज्यातून पाणी झिरपेल असे वापरवेत. जेणेकरुन पावसाचे पाणि जमिनीत जाउन ग्राउन्ड water मधे मिसळेल व त्याचा साठा वाढेल.

एका कंपनीत एच आर्/अ‍ॅडमीन मॅनेजर असताना हे सर्व करायला मला मुक्त वेळ मिळाला होता. एकुण तीन बोअर घेतली पण एकालाही पाणी लागले नाही. मग नंतरच्या पावसाळ्यात कंपनीच्या पत्र्याच्या छतावरुन येणारे पाणी ज्या सिमेंटच्या पाईपने जमीनीवर आणले जाते तो पाईप खालुन बंद केला. ( उघडता येईल असा गोणपाट कोंबुन )

आठ इंची व्यासाच्या सिमेंटच्या पाईपला जमीनीपासुन दहा फुटावर अर्धा इंचाचा एक सॉकेट छीद्र पाडुन एम्सील ने बसवला. याला एक रबरी पाईप जोडता येईल असा ३/८ इंचाचा ब्रास निप्पल लावला ज्याला रबरी पाईप जोडुन पावसाचे पाणी एका २०० लिटरच्या ड्रमात जमा केले.

हे एक साधा घरगुती फिल्टर वापरुन डायरेक्ट बोअर मधे सोडले. एक असा माणुस निवडला ज्याने पुढील तीन वर्षे आपले काम संभाळुन स्वतः हुन केले. या काळात मी ती नोकरी सोडली

चवथ्या वर्शी ह्या व्यक्तीची चिकाटी कामाला आली. दररोज २००० लीटर उपसा होईल इतके पाणी बोअर वेल देऊ लागली असा त्याचा फोन आला.

नितीनचंद्र चांगली अयडीया.आमच्या कंपनीत आता मानवी नळ बंद करुन वॉशरुम मध्ये सेन्सर ने चालू बंद होणारे ऑटोमॅटिक नळ आणले आहेत.त्याने नळ चालू राहून होणारा पाण्याचा नास टळतो पण नळ स्वतः चालू बंद करता येत नसल्याने प्रत्येक वेळी एक ठराविक पाणी वाया जाते.

वापरलेल पाणी प्रक्रिया करून परत वापरणे यासारखा इमिजिएट आणि जास्तिजास्त किफायत्शिर मार्ग नाही.
पुनर्वापरासाठी लोकांची मानसिकता तयार करणे मोठ काम असतं , येउ घातलेल्या (खरतर येउन ठेपलेल्या) पाणी टंचाईनी ते काम होइइल तर बरं.

सध्या शहरात जिथे नळावाटे पाणीपुरवठा होतोय तिथेच पाण्याचा अपव्यय जास्त आहे. खरे तर या काळात पाणी कपात करण्यापेक्षा सुरवातीपासूनच करायला हवी, म्हणजे लोकांना कमी पाण्यात भागवायची सवय लागेल.

वापरलेल पाणी प्रक्रिया करून परत वापरणे यासारखा इमिजिएट आणि जास्तिजास्त किफायत्शिर मार्ग नाही. >>>

सोसायटी बांधतानाच हा प्लांट नसेल तर आता हे बसवणे शक्य आहे का ? हे पाणी किमान फ्लशसाठी तरी वापरता येते का ? फ्लश आणि बाथरुमच्या पाण्याची टाकी वेगळी नसणे वगैरे मॅनेज करता येते का ? ( माझ्या ओळखीत केवळ एकांकडूनच त्यांच्या सोसायटीत ही सोय असल्याचे ऐकले आहे पण ते पाणी गार्डन आणि इतर कॉमन युटिलिटीसाठी वापरले जाते असे त्यांच्या बोलण्यात आले. ) साधारण दोनशे फ्लॅट असलेल्या सोसायटीसाठी अंदाजे किती खर्च येईल ?

तसेच बोअरवेलसाठी सॉफ्ट वॉटर ट्रीटमेंट प्लँट बसवला असेल तर त्यात भरपूर पाणी वाया जाते. त्याचा पुनःवापर कशा प्रकारे करणे शक्य आहे ?