मन

ऋण

Submitted by निखिल मोडक on 8 May, 2022 - 07:50

वेदनादायी क्षणांना सण म्हणावे लागले
सलत्या जखमांस हसुनी व्रण म्हणावे लागले ॥

विखरून गेले दान जे झोळीत होते घेतले
राहिल्या काही कणांना धन म्हणावे लागले ॥

मानले मी रूख त्यांच्या सावल्या करपून गेल्या
पेटत्या उरल्या उन्हाला वन म्हणावे लागले ॥

केला तयांनी यत्न वेडा मूर्त ही घडवावयाचा
राहिल्या दगडास मजला मन म्हणावे लागले॥

द्यायचे आता न मजला राहिले कोणास काही
राहिल्या हास्यास तरिही ऋण म्हणावे लागले ॥

©निखिल मोडक

शब्दखुणा: 

काय करावे

Submitted by पिहू१४ on 10 February, 2022 - 02:47

माझ्या मोठ्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे.आम्ही दोघी बोलत नाही,मन नाराजी आहे.तिच्यामुळे मला एकुलत्या एक भावाच्या लग्नाला जाता आलं नाही आणि माहेरी ही जाता येत नाही. तीची मुलगी , मुलगाही माझ्याशी बोलत नाही.
आईला वाटतं की मी लग्नाला यावं , काय करु काही कळतं नाही.

No judgements please!!!!!!

Submitted by किल्ली on 6 January, 2022 - 12:25

बऱ्याच वेळा असा अनुभव आलाय की, खरं तर भविष्यात येणाऱ्या खऱ्या खुऱ्या कठीण किंवा दुःखद परिस्थिती पेक्षा ती येणार, कशी असणार ह्याची कल्पना केल्याने जास्त त्रास होतो. वास्तविक पाहता तेवढं भीषण घडत नसतं जेवढं आपलं मन आपल्याला आधीच दाखवतं. मनाला सवयच असते काहिबाही कल्पून त्याची साखळी बनवत जायची. सगळीकडे नुसता अतिरेक करतं हे मन!
......
.
...

शब्दखुणा: 

एक प्रयोग

Submitted by सामो on 16 December, 2021 - 08:10

काल रात्री बराच वेळ पडून, इन्स्ट्रुनेम्टल म्युझिक (https://www.youtube.com/watch?v=WxDJsMQCSzQ&list=PLo4u5b2-l-fBE7Yg_v5XWw...) ऐकलं. रागांमधलं काहीच कळत नाही पण नोट केलेले की 'हंसध्वनी' हा राग आपल्याला फार आवडतो आहे. कदाचित संस्कॄतप्रचुर नावाच्या मोहातच पडले असेन, त्यातही शुभ्र हंस इमॅजिन केल्याने दूधात साखर. ते काहीही असो पण मन खूप शांत झाले. बराच वेळ गेल्यानंतर आपोआप मनात एक विचार आला. जशी पाच इंद्रिये असतात तसे आपले सहावे इंद्रिय असते आपले मन.

शब्दखुणा: 

अकांशाचा भुंगा...

Submitted by शिवांश on 15 November, 2021 - 23:11

अकांशाचा भुंगा पोखरी मनास
नश्वर असे सर्वकाही आठवी मनास
परी चालताना मार्गावरून सत्याच्या
खेचेल गोडी ऐहिक सुखाची मनास

वासना उठाठेव करिती मनास
उरेल का सत्य चिंता जाळसी मनास
मनाचेच हाल होती मनाच्याच हातून
दुसरा कोण विरोध करिसी मनास

अस्मितेचा मृत्यू रडवी मनास
दुःख काय असते जाणवी मनास
"मी" पणा सोडाया मन धाजावत नसे
तेव्हा मिथ्या अहंकार फासी देई मनास

काय काय करावे, संभ्रम आडवी मनास
गृहीत धरले सारे, चूक आकळी मनास
नश्वर वस्तूंचा मोहापाश सुटणार नाही
सत्य जाणून गल्यानी मारे मिठी मनास

- अक्षय समेळ

आशा

Submitted by शिवांश on 6 September, 2021 - 10:00

मंदावले चांदणे, अंधुकल्या वाटा
दिशा शोधण्यास प्रकाश काजवांचा
सुख निजले होते विवांचनेच्या कुशीत
जागताच आज पापण्या पाणावल्या

उदासीन मनाचा आज बांध फुटला
फेर धरून चौफेर मनसोक्त नाचला
लांघून साऱ्या सीमा मायावी जगाच्या
तो बेधुंद अवकाश गमन करून परतला

- अक्षय समेळ.

मन.... तुझे नी माझे.....

Submitted by कविता१९७८ on 12 September, 2020 - 13:15

मन तुझे आणि माझे
कुठेतरी खोलवर तरंगतय
काय शोधतय कुणास ठाऊक
जीवनाचे उथळ झरे?
की श्वासांची खोल दरी?
प्रेमाचा आनंदी सहवास?
की वास्तवाची अनुभविक दोरी?
नक्की जीवन म्हणजे काय
फुलपाखरु की भुंगा
सावली की झळ
मलम की ओरखडा
कळतच नाही
काय दडलय या मनात
कुठली दिशा
कसला ठाव
अतरंग की मायाजाल
याची दोरी कुणाच्या हातात
तुझ्या की माझ्या
की कुणाच्याच नाही
हे फक्त तरंगतय
आयुष्य नेइल त्या दिशेला
नव्या पहाटेकडे
नव्या किनार्‍यावर
वार्‍याच्या डौलावर

शब्दखुणा: 

मन

Submitted by दवबिंदू on 28 July, 2020 - 09:37

मन

सरींनी आनंदाच्या
मन आपलं हलकं होतं.
पानं उलटत कॅलेंडरची...
स्वप्नांत रंगून जातं.

लाटेने दुःखाच्या
मन आपलं भरून येतं.
पानं चाळत अल्बमची...
आठवणीत दंगून जातं.

चांदण्यात समाधानाच्या
मन आपलं शांत होतं.
काट्यांबरोबर घडय़ाळ्याच्या...
वर्तमानात रमून जातं.

- दवबिंदू

शब्दखुणा: 

मनीचे वस्त्र

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 25 June, 2020 - 13:49

मनीचे वस्त्र
**********

माझिया मनीचे
वस्त्र हे घडीचे
तुझिया पदाचे
स्वप्न पाहे ॥

किती सांभाळावे
किती रे जपावे
डाग न पडावे
म्हणूनिया ॥

मोडली न घडी
परी डागाळले
मोहाचे पडले
ठसे काही ॥

कुठल्या हवेचे
कुठल्या वाऱ्याचे
गंध आसक्तीचे
चिकटले ॥

कुठल्या ओठांचे
कुठल्या डोळ्यांचे
पालव स्वप्नांचे
फडाडले ॥

बहु दत्तात्रेया
समय तुम्हाला
आम्हा जोडलेला
काळ थोडा ॥

पाहुनिया वाट
जाहलो विरळ
फाटे घडीवर
आपोआप ॥

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मन