पाऊस वेंधळा पुन्हा नव्याने आवेगाने येतो
नव्या सरींनी तिच्या सयींचे जुनेच गाणे गातो...
पाऊस वेंधळा भल्या सकाळी धसमुसळासा दिसतो
अन योग्यासम संध्याकाळी ध्यान लाऊनि असतो...
पाऊस वेंधळा कधी तिच्या मग डोळ्यामधला विरह वाचतो
तिच्या अंगणी तुळशीपाशी डोह साचतो...
पाऊस वेंधळा नको वाटतो अंधारातून...अंधाराचा
उदास निश्चल अगतिक चेहरा या दाराचा...
पाऊस वेंधळा तरी कशाने मित्र वाटतो?
तो जाताना का डोळाभर मेघ दाटतो?
..............
पाऊस वेंधळा अन माझ्याही अशा मनस्वी ओळी
तो गेला कि रिते रिते नभ, रितीच माझी झोळी...
खाटेवरती का म्हातारी पडल्या पडल्या कण्हते आहे
कुणीतरी या नरड्यामध्ये ओता पाणी म्हणते आहे...
ऊन असे कि काळ्या मातीनेही अगदी प्राण सोडले
बांधावरली बाभूळ वेडी तरी सावली विणते आहे
ढेकळातल्या आडव्या रेषा भाळावर दिसणारंच नक्की
झोळीमधल्या क्षीण मुलाचे नशीब यातून बनते आहे...
पिवळ्या खुरट्या गवतामध्ये गाय मारते असंख्य टोचा
भकास डोळ्यावरती माशी पिसाटशी भणभणते आहे...
कधीतरी या तप्त उन्हाने घाम फ़ुटावा आभाळाला
अंथरुणावर धरती व्याकूळ तापाने फ़णफ़णते आहे....
--- संतोष वाटपाडे
ताण (टेंशन) – एक बोधकथा

बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेकर्यााला घरकामासाठी, गोठ्यातील कामासाठी व गुरांची राखण करण्यासाठी एक नोकर हवा होता.
एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला व त्याने त्याच्याकडे नोकरीची याचना केली. "तू काय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले.
मुलगा म्हणाला, "वादळीवार्यासह गडगडाटी धुवांधार पाऊस पडत असताना व वीजांचा कडकडाट होत असतांनाही मी रात्री शांतपणे गाढ झोपू शकतो !'
शिरवे आले अंगावरती
वैशाखमासे भिजली माती,
तप्त सरोवरे झाली थंड,
मयुरासंगे मने नाचती
वार्यासंगे करुनी गट्टी
मेघांनीही केली दाटी,
लपवूनी त्या दिनकराला
काळोखा धाडले अवनीवरती
झट्कूनी आपले ओले अंग
श्वान ही झाले होते दंग,
सुगंध मातीचा भटकंतीसाठी
आरूढ झाला वार्यावरती
फूले फुलली मने खुलली
बालबालका नाचू लागली
चातकानेही तहान भागवली
जलधारांनी धरती सजली
आठवणीने स्पर्शाच्या शहारले अंग
जशी जुई थरथरली वा-याच्या संग
नेहमीच सारखा आला तो धुमसून
तर त्या पावसाची चूक काय? सांग!
गंध मातीचा बेधुंद करणारा
केसातल्या गज-याची ओळख सांगणारा
तो तर येणारच पहिल्या सरींसवे,
मग त्यात पावसाची चूक काय? सांग!
सावळं अंधारं वादळ जमणार
विजांचा कडाड अन घन घुंमणार
सय वादळाची तुझ्या डोळ्यातल्या, मनातल्या
आली, त्यात पावसाची चूक काय? सांग!
भिजून सुखावून सारं गपगार
पुन्हा नवे हिरवे धुमारे फुटणार
आस आणि आशा पुन्हा भेटीची,
आली, त्यात पावसाची चूक काय? सांग!
येशील जाशील पावसासारखी
पुन्हा वैशाखात होरपळण्यासाठी
आलं मनात असं काही, उगाचच,
पुण्या-मुंबईकरांचे पावसाळ्यात भटकण्याचे आवडते ठिकाण म्हणजे लोणावळा व खंडाळा. या पर्यटनाच्या यादीत लवासा, अॅम्बी व्हॅली, ताम्हीणी घाट व माळशेज घाट ही स्थळे भाव घावून जातात. मात्र, नेहमीच्या या ठिकाणांऐवजी या वेळी निवांत ठिकाणी हिंडायला जायचे ठरविले. नेहमीच्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची वाढणारी गर्दी व त्यापेक्षाही त्यांचा नकोसा असलेला उच्छाद, हुल्लडपणा नको असेल तर अशा निवांत ठिकाणी जायला हरकत नाही. त्या विषयी...

पाऊस नसे हा पहिला पण भिजणे बाकी आहे
मी तिच्या लोचनांमधुनी पाझरणे बाकी आहे
विश्वास कसा ठेवावा तू आसपास असल्याचा
माणूस माणसामधला सापडणे बाकी आहे
मी लिहिल्या अनेक कविता संतोष वाटला नाही
नुकतेच मला कळले की, 'तू' सुचणे बाकी आहे
सत्यास शोधले होते, सत्यास मांडलेसुद्धा
पण सत्य नग्न असते हे आवडणे बाकी आहे
माझ्यात राम आहे अन् माझ्यामधेच रावणही
चेहरा तुम्हाला दुसरा दाखवणे बाकी आहे
आईस फसवुनी 'जीतू' मी अनेक पाउस भिजलो
ती ओल मनातुन अजुनी वाळवणे बाकी आहे

पिसं भरलं मनात मनी कसले हे भाव
तुला पाहुन हे झालं, उगा पावसाचं नाव
तुझ्या सावळ्या कांतीचे असे सावळे आकाश
तुझा श्वास जसा वारा, भवती ओलंचिंब गाव
ओला पदर उडतो तसा धारांचा आभास
जलामध्ये लपेटून झीम्म झीम्माड भिजावं
दिसे डोळ्यांमध्ये तुझ्या सप्तरंगांची कमान
लयकारीत मजेत ओलं प्रेमगाणं गावं
मनमोराचा पिसारा थरथरुन डोळे डोळे
मोरासवे मोर होऊन ओल्या मातीत नाचावं