पर्यावरण

पर्यावरण

जरा थंड घे..!

Submitted by Dr. Satilal Patil on 8 May, 2022 - 14:32

गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढलाय. तापमान आणि महागाई यांच्यात शर्यत लागलीय असं वाटतंय. माणूस आणि प्राणी हवालदिल झालेत. मिळेल तिथे सावली आणि गारवा शोधताहेत. ज्यांना पाय आहेत आणि जे चालत जाऊन सावलीत बसू शकतात त्यांनीआपलं सावलीतील अढळपद शोधलंय. पण जे चालू शकत नाहीत आणि ज्यांच्या पायांनी अन्नपाण्यासाठी जमिनीला जखडून घेतलंय ती झाडं मात्र सूर्याचा जाळ सोसत आणि पायवाल्यांना सावली देत उभे आहेत.

गप्पा ब्रम्ह आणि चंद्राच्या!

Submitted by अदिती ९५ on 3 May, 2022 - 03:29

ब्रह्मदेवाला वाटलं एकदा
करावं काहीतरी अफाट!
पृथ्वी बनवण्याचा घेतला मक्ता
नवनिर्मितीचा गिरवत कित्ता,
पृथ्वीभोवती दिला एक पहारेकरी
त्याच्या हाती समतोलाची दोरी,
चंद्र आपला घालत राहिला गस्त
काही वर्षात तिचे हाल बघून झाला त्रस्त!

एके दिवशी म्हणाला ब्रह्माला,
हा असा नग देवा, तुला कसा सुचला?
बाकी सगळी सृष्टी चालते नियमाने,
नियम मोडायच काम हा करी नेमाने!

आपली सूर्यमाला

Submitted by अदिती ९५ on 27 April, 2022 - 23:20

सूर्य महाराज एकदा खूप खूप चिडले
ताप ताप तापले अन् फटकन फुटले

छोटे मोठे गोळे इकडे तिकडे पडले
सूर्याभोवती सारे गोल फिरू लागले

पहिला झाला बुध, सगळ्यात जवळचा
एका वर्षात होतात त्याच्या चार चार फेऱ्या

दुसरा म्हणे मी शुक्र आहे फार तापट
सगळ्यात चमकतो, रंग माझा पिवळट

तिसरी आहे कोण? ही तर आपली पृथ्वी
पक्षी प्राणी माणसांनी इथेच केली वस्ती

चौथा आहे मंगळ पृथ्वीपेक्षा छोटा
माणसांनी शोधला इथे पाण्याचा साठा

पाचवा म्हणे बघा, मी आहे सगळ्यांचा गुरु
एकोण ऐंशी चंद्र माझे लागतात फेर धरू

शब्दखुणा: 

आपल्यापुरतं सारवता येतं ?

Submitted by Dr. Satilal Patil on 23 April, 2022 - 02:57

ओ अप्पा s s ओ अप्पा s s असं मोठ्याने ओरडत अप्पांच्या सुनबाई धावतच अंगणात आल्या. अप्पा अंगणातील झोपाळ्यावर बसून अडकित्त्याने 'कुटूर कुटूर' असा आवाज करत पानासाठी सुपारी कातरत होते. कातरलेल्या सुपारीची, शार्पनरने पेन्सिलीची निघते तशी नक्षीदार पापडी, कात-चुना लावलेल्या रंगीत पानावर पडत होती. 'काय झालं सुनबाई?' असं ताडकन उठत अप्पानी विचारलं. 'अहो अप्पा' s s बोलतांना त्यांना धाप लागत होती. 'बघा ना चिंटूला काहीतरी होतंय, तो कससंच करतोय' हातातला अडकित्ता फेकत आप्पांनी घरात धाव घेतली. अप्पांचा सात वर्षांचा नातू चिंटू’ बेडरुममधे दोन्ही हात पोटाशी आवळून कळवळत पडला होता.

हेच आपलं नेहमीचंच - ५

Submitted by पाचपाटील on 12 March, 2022 - 11:38

{{ रोज देसाळ 'भिंगरी' पिऊन पिऊन लीवरला सूज
आलीय देठ्या...! पन काय करनार..! दुसरी परवडत नाय
म्हणून ती प्याय लागती.. पन आज तू हैस तर
चांगला फॉरेनचा ब्रॅण्ड मागव...ॲंटीक्वीटी है का
बग..! }}

पुणे मुक्कामी ऋषीकेश देठे यांचे भेटीसाठी
आलेले विजुभाऊ यांनी, दोन पॅग घपाघप मारल्यावर
पयला गिअर टाकला...!!!

{{ म्हंजे साला आधी एंडोसल्फान फवारून फवारून
युरिया घालून घालून सगळ्यान्ला वावरांची
खराबी कराय लावली..
आन् आता ह्या भोसडीच्यान्ला हे जुनं आठवाय
लागलंय.. }}

या आधी न आलेली, नंतर पण न येणारी तारीख

Submitted by गारंबीचा शारूक on 21 February, 2022 - 04:52

तुम्हाला वाटलं असेल की गर्लफ्रेण्डचा फोन आला अशी सुरूवात करणार असेन मी. पण मुळीच नाही. कारण तिच्याशी सध्या कट्टी चालू आहे.
तिला भेटायचंच नाही म्हणून मी उदास बसलो होतो इतक्यात गफ्रे इन वेटींग नं २ (रनर अप २) मला भेटायला आली. ही जरा फाडफाड खर्डा इंग्लीश बोलते , म्हणून मी तिच्यापासून टरकूनच असतो. तिचा अ‍ॅक्सेंट पण अमेरिकन असल्याने उच्चार पण कळत नाही. मग मी येस्स, ओह, ओके इतकंच करत राहतो.

शब्दखुणा: 

पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय

Submitted by पाषाणभेद on 20 February, 2022 - 06:23
पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय Sound Pollution

पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय

सर्व सदस्यांना कळविण्यात आनंद होतो आहे की, "ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय" हे पुस्तक छापून आले आहे. व्यस्ततेमुळे ( व पुस्तक कोण वाचतो हल्ली??) प्रकाशन सोहोळा केला नाही.

ध्वनी प्रदूषण या घातक प्रदूषणाचे उगम काय? आरोग्याच्या नेमक्या कोणत्या समस्या याने निर्माण होतात? त्यावर उपाययोजना काय असाव्यात? यावरचे विवेचन या पुस्तकात केले आहे.

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ११: उद्ध्वस्त बस्तडी गावाच्या परिसरातील ट्रेक

Submitted by मार्गी on 15 February, 2022 - 05:15

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १०: ध्वज मंदिराचा सुंदर ट्रेक

Submitted by मार्गी on 7 February, 2022 - 05:44

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ९: अदूसोबत केलेला ट्रेक

Submitted by मार्गी on 2 February, 2022 - 05:04

Pages

Subscribe to RSS - पर्यावरण