पाऊस

पाऊस

Submitted by अक्षय. on 5 July, 2017 - 06:35

पाऊस
थेंबाने मातीचा सुगंध चहूकडे दरवळवणारा
निसर्गाला हिरवळीने बहरवणारा
बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा
धो धो कोसळणारा खुदकन हसवणारा
अंगावर शहारे आणणारा चिंब भिजवणारा
चहाचा घोट नवा वाटणारा कांदाभजीला चव देणारा
कागदाच्या होडीबरोबर वाहणारा
शाळेभोवती तळे साचून सुट्टी देणारा
खिडकीतून हळूच खुणावणारा
खोटे पैसे घेऊन खरा येणारा
सर्वाना हवाहवासा वाटणारा
प्रेमाला हाक देणारा
ओल्या नजरांना प्रेमात पडणारा
एकाच छत्रीत जवळ आणणारा
पाऊस ..

शब्दखुणा: 

वर्षाविहार २०१७

Submitted by ववि_संयोजक on 27 June, 2017 - 10:31

GST AD1.jpgपरवा पावसाने
मला रस्त्यातच गाठलं
वविच्या आठवणीने त्याच्या
डोळ्यात, पाणी की हो दाटलं

सांग माबोकरांना
आलोय मी देशात
गटग करुया मिळून
लोणावळ्याच्या घाटात

मलाही व्हायचंय चार्ज
करायचेय मजा मस्ती
बघायच्यात माबोवरच्या
आयडी मागच्या हस्ती

मग काय म्हणता लोकहो? पावसाला निराश नको ना करायला? जायचं का मग लोणावळ्याला? कधी? कसं?
ते सगळं उलगडायलाच आलोय हा पावसाचा संदेश घेऊन...

पहीला पाऊस-एक आठवण

Submitted by र।हुल on 8 June, 2017 - 16:34

"लगी आज सावन की फिर वो झड़ी है।
वही आग सीने में फिर जल पड़ी है।

कुछ ऐसे ही दिन थे वो जब हम मिले थे।
चमन में नहीं फूल दिल में खिले थे।

वही तो है मौसम मगर रुत नहीं वो..
मेरे साथ बरसात भी रो पड़ी है।"

दरवेळेस पाऊस येतो आठवणी घेऊन तिच्या सोबतीच्या. मनांत फुलवतो पुन्हा एक नाजूकसा धागा प्रितीचा..कुठं असेल बरं ती आज? तिलाही येत असेल का आठवण माझ्यासारखीच?.कदाचित..

शब्दखुणा: 

खिडकीतला पाऊस!

Submitted by सचिन काळे on 1 June, 2017 - 10:45

दोन दिवसांपूर्वीच मुंबईत हळूहळू पावसाला सुरुवात झालीय. घामाची चिकचिक आणि उन्हाने त्रस्त झालेल्यांचा, आता पावसाचे आगमन होणार याची नांदी मिळाल्याने जीव सुखावला आहे. पावसाच्या सरी पडलेल्या पाहून मला तर आनंदाने नाचावासे वाटू लागले, आणि मी फेसबुकवर पोस्टसुद्धा टाकली. "पाऊस आया!!!.....एssss पावसामें नाचोssss!!!!...... ढिंगचॅक्! ढिंगचॅक्!! ढिंगचॅक्!!!......." मोराला आपला पिसारा फुलवून पावसात नाचताना जेवढा आनंद होत असेल तेवढाच मलाही पहिल्या पावसात भिजताना आनंद होतो.

विषय: 
शब्दखुणा: 

पाऊस

Submitted by Godeya on 7 September, 2016 - 07:42

सर सर शिवार
हिरवं रान

भिजली जमिन
रानोमाळ

गंध पसरे
चोहिकडे

फिरत राही
काही वेडे

उनाड वारा
भरभरारा

कुठं राहिला
गांव माझा...!

गोदेय १६

विषय: 

वेड्या पावसानं ...

Submitted by पुरंदरे शशांक on 12 July, 2016 - 02:03

वेड्या पावसानं ...

जीव वेडावला बाई कसा वेड्या पावसानं
अंग ओलावत जाई मन चिंब थरारून

असा भरारा पाऊस दिशा जाती काजळून
मना चाहूल कुणाची जरा जाते उजळून

टप टप पावसाची लय जातसे भिनून
एक शिरशिरी आंत नकळत खुणावून

येतो पाऊस माहेरा जरा थांबून थांबून
कळ आतली उगाच उठे दाटून दाटून

कुणा लुभावे पाऊस कुणा घेतो कवळून
डोळा लागला पाऊस कढ अंतरी पिऊन ....

शब्दखुणा: 

येताना ढग दाटून

Submitted by चितस्थधि on 11 July, 2016 - 11:51

येताना ढग दाटून यावे तशी आलीस
जाताना धो धो पावसासारखी नाचून गेलीस
उदासीचे मळभ पांघरून येत जाऊ नकोस
आलीस तर संजीवनीचे कोंब
देऊन जात जाऊ नकोस

चितस्थधि

शब्दखुणा: 

झुंबर ढगांचे

Submitted by पुरंदरे शशांक on 3 July, 2016 - 23:16

झुंबर ढगांचे

झुंबर ढगांचे
झुलते तालात
गाणे पावसाचे
पेरते वनात

सावळे सावळे
घन आभाळात
सल उकलवी
भुईचे अल्लाद

थेंब पावसाचे
येती आवेशात
मुग्ध रान सारे
बेहोशी उरात

दाटला कल्लोळ
गगनी अवनी
जलरुप घेई
स्वये नारायणी

सांगावा

Submitted by पुरंदरे शशांक on 31 May, 2016 - 06:02

सांगावा

आले सांगावा घेऊन
ढग गहिरे जरासे
येई पाऊस मागून
सोड मनाचे निराशे

येतो हवेत गारवा
वारा वाभरा दुवाड
किलकिले करुनिया
ठेव मनाचे कवाड

नवलाची येई खास
मत्त वळवाची माया
घेई ऊरात भरून
भुई-अत्तराचा फाया

पखरण थेंबुट्यांची
होत राही अविरत
सल कोरडे विरु दे
ओल राख अंतरात ....

रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि पाणीटंचाईवर मात करण्याचे इतर उपाय

Submitted by अगो on 10 February, 2016 - 10:16

गेल्यावर्षी भारतात खूप कमी पाऊस पडला. तो कमी पडला किंवा जास्त पडला तरी वाढती लोकसंख्या, वाढती बांधकामं, क्षेत्रफळ आणि त्यावर राहणारी लोकं ह्यांचं व्यस्त प्रमाण ह्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न उग्र होत आहे. शहराचे काही ठराविक भाग सोडल्यास कॉर्पोरेशनचे ( धरणांतून येणारे )पाणी नीट उपलब्ध नाही. त्यामुळे पाण्यासाठी बेसुमार बोअरवेल्स खणल्या जात आहेत आणि टँकर लॉबी फोफावल्या आहेत.

Pages

Subscribe to RSS - पाऊस