मुक्तस्रोत(Open Source)

जिवाचं कोल्हापूर ❤️

Submitted by www.chittmanthan.com on 29 January, 2024 - 05:23

           आपल्या शालेय जीवनात दहावी हा एक महत्वाचा टप्पा असतो . माझ्याही आयुष्यात दहावी आलीच.पण  जरा सुस्तच होती . मी क्लास लावलेला जाधव सरांकड पण अभ्यास मात्र जसा जमेल तसा, काय ताण नाही काही नाही . कोण विचारलं दहावी चा अभ्यास कसा सुरु आहे ? उत्तर ठरलेलं असायचं "एकदम निवांत" मला दहावी नंतर काय करायचं हे माहीत नव्हतं . कोण विचारलं डिग्री कुठली करणार हे माहीत नव्हतं. आमच्या वर्गात मात्र ३-४ पोर होती जी म्हणायची मी कोट्याला जाणार आयआयटी ची तयारी करायला. कोण बोलायचं ब्रेन सर्जन होणार. च्यामायला ऐकून भीती वाटायची ओ. एवढ्या कमी वयात एवढी स्पष्टता... कौतुक वाटायचं त्यांचं.

३० वर्षांपासून अखंडित....

Submitted by पराग१२२६३ on 26 January, 2024 - 04:09

सव्वीस जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाल्यावर भारत सार्वभौम, प्रजासत्ताक झाला. तेव्हापासूनच दरवर्षी 26 जानेवारीला देशभर प्रजासत्ताक दिनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाऊ लागलं. त्या कार्यक्रमांपैकी सर्वात मुख्य कार्यक्रम असतो नवी दिल्लीत आयोजित होणारे संचलन आणि अन्य कार्यक्रम. हा सोहळा मी 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा दूरदर्शनवर पाहिला होता आणि तेव्हाच मला तो प्रचंड भावलाही. पुढच्या काळात या सोहळ्याविषयी कुतुहल वाढत गेलं आणि कधीही न चुकता या सोहळ्याचं फक्त दूरदर्शनवरच थेट प्रसारण पाहण्याचा पायंडा पडला.

गप्पांचे ऑनलाईन अड्डे

Submitted by Diet Consultant on 21 August, 2023 - 02:14

हाय
सगळ्यांना नमस्कार !
सध्याचे गप्पांचे ओनलाईन अड्डे काय आहेत ?
जनरल नव्या लोकांशी गप्पा मारणे , माहिती करून घेते विविध गप्पांच्या विषयांवर.
मला विपू मध्ये कळवा

फन एलिमेंट इन लाईफ ...

आशियामधला सर्वात तरुण राजवाडा

Submitted by पराग१२२६३ on 31 July, 2023 - 03:32

स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदर भारतीय उपखंडात उभारल्या गेलेल्या शेवटच्या काही राजवाड्यांपैकी जोधपूरचा उमेद भवन राजवाडा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सगळी संस्थानं भारतीय संघराज्यात विलीन झाल्यामुळं पुढच्या काळात भारतातच नाही, तर संपूर्ण उपखंडात नवीन राजवाडे उभारले गेले नाहीत. उमेद भवन राजवाडा स्वातंत्र्यप्राप्तीच्या जेमतेम चार वर्षे आधी बांधून पूर्ण झाला होता. त्यामुळं हा उपखंडातला सर्वात तरूण राजवाडा मानला जातो. आम्ही हा राजवाडा पाहायला गेलो, त्या घटनेला आता 33 वर्ष होत आली आहेत, पण तरीही त्या आठवणी अजून ताज्या आहेत.

खंडाळ्याच्या घाटाची 160 वर्षे

Submitted by पराग१२२६३ on 3 May, 2023 - 12:08

IMG_8139_edited.jpg

मुंबईला पुण्याशी जोडणारा लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन आता 160 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या मार्गामुळे या शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या काही तासांवर आला. वेडीवाकडी वळणे घेत, दऱ्या-खोऱ्यांतून, बोगद्यांमधून होणारा हा प्रवास सर्वांना कायमच रोमांचित करत आला आहे. या प्रवासावर आधारित गाणीही अतिशय लोकप्रिय ठरली आहेत.

चूल

Submitted by मंगलाताई on 10 April, 2023 - 04:50

चूल
चुलीवरची भाकरी चुलीवरचे मटण असे खूप ऐकतो . अशा जाहिराती असलेल्या पाट्यांनी हॉटेल सजवून टाकलेली आहे आणि लोक चुलीवरच्या पदार्थांची चव घेण्यासाठी जाऊन तेथे जेवण करतात . चुलीवरच्या भाकरींची , चुलीवरच्या स्वयंपाकाची वेगळीच चव आहे , अशी एक सर्वसामान्य मान्यता आहे . महाराष्ट्रात चुलीवरच्या जेवणाला पसंती देतात . अनेक पारंपरिक पदार्थ चुलीवर केल्या जातात आणि काही पदार्थ तर चुलीवरच केल्या जातात . चुलीचे महत्त्व या काळातही विशेष असे आहे .

शब्दखुणा: 

हिरवाई

Submitted by मंगलाताई on 29 March, 2023 - 01:19

हिरवाई
निसर्गाचा रंग कुठला आहे म्हणून विचारलं तर सहजच कोणी सांगेल हिरवा/ निळा . पण एवढ्या एका शब्दांत वर्णन होणे शक्य नाही . हिरवा रंग एवढं म्हणून हिरव्या रंगाची ओळख आपण करून देऊ शकतो का? निसर्गात गेलो , वनात
गेलो तर हिरवा रंग आपले विविध समृद्ध दालन आपल्यासमोर उघडून उभा असतो आता प्रश्न असा पडतो की यातला हिरव्या रंगाचे वर्णन कसे करावे ?

शब्दखुणा: 

महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले व्यवसाय

Submitted by मंगलाताई on 13 March, 2023 - 07:57

महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले व्यवसाय
भारतात आता अनेक व्यवसाय आहेत . समाजाच्या मागणीनुसार आणि गरजांनुसार व्यवसाय देखील बदलत आहेत . कँटरिंग , लाँन , हॉटेल अशा मोठ्या व्यवसायात अनेक लहान व्यवसाय गुंतलेले आहेत . छोट्या छोट्या व्यवसायांवर मोठे व्यवसाय सुरू असतात . हल्ली हे व्यवसाय तर फक्त फोनवरही सुरू असतात . यांची एक साखळी असते .

चित्रातली देवळे-देवळातले चित्र

Submitted by मंगलाताई on 19 February, 2023 - 01:52

चित्रातली देवळे-देवळातले चित्र
अगदी लहानपणापासून जेव्हा कधी मला फावला वेळ मिळत असे कागदावर रेघोट्या मारतांना सहजच माझ्या हातून चित्र उमटे .एक नदी, काठावर एक देऊळ हेमाडपंथी घाटाचे , देवळामागे उंच झाड , देवळावरचा ध्वज, दगडी पायर्या , आणि बाकीचा अख्खा परिसर मोकळा .

वाई ते पुणे

Submitted by पराग१२२६३ on 11 February, 2023 - 06:57

अलिकडेच एके दिवशी पाचगणीला गेलो होतो. बऱ्याच वर्षांनी पाचगणी, वाईला भेट देत असल्यामुळं गेल्या वेळेपेक्षा आता तिथं बदललेलं बरंच काही दिसत होतं. पाचगणीची भेट आटपून पुण्याला परत येण्यासाठी सकाळी निघालो. पाचगणीच्या एसटी स्थानकात पोहचल्यावर पुण्याच्या बसला वेळ आहे समजलं. त्यामुळं समोर उभ्या असलेल्या वाईच्या बसमध्ये आम्ही बसलो. वाईला पोहचल्यावर काही वेळानं पोलादपूर-स्वारगेट बस आम्हाला मिळाली.

Pages

Subscribe to RSS - मुक्तस्रोत(Open Source)