रिपरिप (मुक्तछंद)
तुझे बंद ढगाळ डोळे अन्
त्यांतून सरणारा पाऊस
आता ओळखीचा झालाय.
पण एक खरं सांगू का,
पावसाच्या अमाप सरींनंतर
तुझ्या ओठांवर पडणारं,
फिक्कट गुलाबी इंद्रधनु,
मला खरंतर जास्त आवडतं!
तुझ्या मनाच्या या आभाळाला
कुठला असा काठच नाहीये!
अपरिमित अथांग आहेस तू.
म्हणून कधीकधी अवघड जातं
तुझं मन पूर्ण समजून घेताना.
फेसाळत्या अथांग समुद्रालाही
कुठेतरी किनारा लागून असतो.
त्यामुळं तू सागराहून गूढ आहेस.
पावसाविषयी असूया
पाहून माझे खुप हाल झाले
पावसाने केले तुझे केस ओले
गवतावर पडताच पाऊल शहारले अंग
भान हरपले जगा विसरले भिजण्यात दंग
पाऊस फिका पडला थेंब पडताच गाली
तुझ्या केस झटकण्याने तुषार पडले खाली
ओली करून साडी पाऊस मातलेला
बरसतो पुन्हा झिम्माड तुझ्या अंगाला
गिरकी घेतली, उड्या मारल्या, हात पसरले
विषाद वाटला माझाच तु पावसाला कवेत घेतले
पाषाणभेद
०७/०७/२०१९
नभातून पडावा पाऊस
मनात उतरावा पाऊस
धरतीमध्ये थेंब थेंब
रुजवावा पाऊस
झाडांवरल्या थेंबातूनी
झरावा पाऊस
कौलांच्या पागोळ्यांतूनी
ओघळावा पाऊस
हातातल्या ओंजळीत
पकडूनी प्यावा पाऊस
अधिर ओठांचा स्पर्शाने
हलकेच चुंबावा पाऊस
ललनेच्या केसांतूनी
झटकावा पाऊस
गावा पाऊस घ्यावा पाऊस
पाऊस घेवून आपणही व्हावे पाऊस
- पाभे
३०/०६/२०१९
नजर..
बालपणीचा पाऊस
म्हणजे असे
मजामस्ती,
शाळेत जाण्याची धांदल
,वाहत्या पाण्यात
सोडलेल्या कागदी होड्या
आणि अवखळ खेळ
तारुण्यात तोच
पाऊस म्हणजे
गुलाबी जग सारे,
प्रेमपत्र,
चोरटी बावरलेली नजर
आणि
पावसातली ती घट्ट मिठी
उतारवयात पाऊस
तोच ; पण
नेत्र असतात पाणावलेले,
हक्काची नातीही
दुरावलेली,
कोणीच नसे सोबती;
दोन शब्द बोलायला.
पाऊस असे तोच.
दरसाल तसाच बरसुन जाई
वयाप्रमाणे बदलत
जाई ती आहे
'नजर'
पावसाला अनुभवण्याची!
राडा
______
स्टेशनबाहेर पडलो. डोळे अर्धवट झोपेतच होते. आकाशातला प्रकाश डोळ्यावर पडला तसे आणखी आखूड झाले. अंदाजानेच गर्दीसोबत पावले टाकत चालू लागलो. अन ईतक्यात, डोळे उघडावेसे वाटणारा आवाज कानावर पडू लागला. सकाळी सकाळीच छानपैकी भांडण चालू झाले होते.
आवाज रिक्षास्टॅण्डच्या दिशेने येत होता, एक बाई रिक्षात अडून बसली होती. ना रिक्षातून उतरत होती ना रिक्षाला जाऊ देत होती. तिच्या भितीने आणखीही कोणी त्या रिक्षात चढायला धजावत नव्हते.
मातलेला पाऊस
मी आता पावसावर कविता करत नाही
कारण पाऊस कसा असतो नीट कळत नाही
कुठेतरी पाऊस मातला नदी नाल्यात
जनावरे माणसांची थडगी गल्लीबोळात
चाटूनपुसून गावासोबत जवळचा डोंगर सुद्धा नेला
तरी उन्मत हत्तीचा उतमात थांबेना , कुठे
गारपिटीत आशाआकांक्षा गोठवून गेला
गावाला आली स्मशानकळा
स्मशानभूमीत कधी मळा पिकत नाही
मी आता पावसावर कविता करत नाही
असाच तो करतो कुठे कानाडोळा
कुठेतरी बरसतो फक्त आगीचा गोळा
कुणासाठी तो फक्त आख्यायिका झालाय
गरीब स्वप्नाचा इंद्रधनू थडग्यात पुरलाय
पाऊस म्हंटल कि आठवतात का?
लहानपणीच्या होड्या, सोडायच्यात आजही थोड्या
पाऊस म्हंटल कि आठवतो का?
मातीचा वास, शहरात होतो फक्त आठवणींचा भास
पाऊस म्हंटल कि आठवतो का?
टपरीवरचा गरम चहा, मिळत नाही तसा कुठंही पिऊन पहा
पाऊस म्हंटल कि आठवती का?
पोत्याची कोप, सगळं असून हि नाही लागत झोप
पाऊस म्हंटल कि आठवतो का?
चिखलाचा राडा, आता फक्त ओढायचाय संसाराचा गाडा
रंगेबेरंगी छत्र्यांच्या आड आधार वाटतो
न भिजन्याचा तो फक्त एक बहाणा असतो
कुडकूडणारी थंडी अन गारठलेली जोडपी
थरथरणाऱ्या ओठांवर कुडकूडणारे शब्द
पाउस जरी थांबला तरी ओलावा तसाच राहणार
माझ्यापाशी ती तिच्यापाशी मी असल्यावर
कसलं घर अणि कुठला पाऊस अठवणार
आपण आणि पाऊस....

ऋतू बदलतोय, भिजतोय. आपले कठीण रुक्ष रूप सांडून कोवळा कोवळा होतोय. रंग बावरे वेल्हाळ रूप सांडून रुजवातीच्या जबाबदाऱ्या
पेलू पहातोय.
इतके दिवस करपून, कोळपुन गेलेल्या भुईवर वळवाचे चार थेंब काय पडले, उत्साहाने ती रोमांचित झाली आहे.
दाटून येणाऱ्या नभात ती उद्याच्या आशेचे चित्र पाहतेय. थोडीशी उन्हाची तलखी कमी होत आहे म्हणताच जराश्या सरीनन्तर ती परत वाढते. कुमारावस्थेतून यौवनात येण्याचा काळ जसा चिंतामिश्रित कुतूहलाचा असतो तसाच हा परिवर्तनाचा दोन ऋतूंच्या मधला हा काळ, हुरहुरीचा, नवीन अनुभव घेण्याचा. काया बदलून नव्या उत्साहाने तरारून उठण्याचा. लगबगीचा.