मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
पाऊस
प्रतिसाद
आमच्या ठाण्याच्या घराच्या खिडकीत बसून, वाफाळणाऱ्या चहाचा आस्वाद घेत बसायला मला फार म्हणजे फारच आवडतं. सोबतीला एखादं छानसं पुस्तक किंव्हा ताजं वृत्तपत्र. मधून मधून बाहेर नजर टाकत असं चहा पिण्यातली गंम्मत काही औरच. माझी निवांतपणाची ती व्याख्या आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यात बाहेर पाऊस पडत असेल तर काही विचारायलाच नको.
सर पहिल्या पावसाची!!
आली ही सर पहिल्या पावसाची,
याच सरींनी घडविली भेट गगन-भूमीची,
भिजवुनी ही काळी माती
सुगंध उधळला आसमंताती,
दोघांच्या या भेटीने सारी सृष्टीच जणू भारली
पुन्हा नव्या चैतन्यात नटन्याची तयारीच करु लागली!
कोसळल्या मग सरींवर सरी
अंगणातला सुगंध गेला नदीच्या तीरी,
घरा घरात बागडू लागल्या मग बायका पोरी,
धांदल उडाली बघ मळेराणावरी
धान्याची झाकाझुक करू लागला शेतकरी,
स्वप्न पाहु लागला तो नव्या पेरणीची
उत्साही सर आली पहिल्या पावसाची.
पावसा....पावसा....
पावसा...पावसा...
पावसा... पावसा...
रिमझिम ये...
फुलांना, वेलींना गोंजारत ये.
पावसा.. पावसा...
सरींवर सरी पडू दे...
ओंजळीत पागोळ्या झेलू दे.
पावसा... पावसा...
मुसळधारा बरसू; दे...
बागडणर्या मुलांना चिंब भिजू दे.
पावसा... पावसा...
वार्याला सोबत घेऊन ये...
धारेत सोडली होडी माझी,
पुढे पुढे जाऊ दे.
पावसा... पावसा..
घे विसावा क्षणभर,
वाटेतला वाटसरू,
सुखरुप पोहचू दे ठिकाणावर.
पाऊस
पावसाळे
पावसाळे
कधी आला नदीला पूर...
वाहून गेले घरदारं.
गेले पाण्याखाली शेतातले उभे पीकं!
कधी खचली जमीन...
गाडले गेले गाव.
झाले अवघे जीवन भुईसपाट!
कधी झाली अतिवृष्टी...
कोसळल्या इमारती.
गेले पाण्याखाली वाहते रस्ते!
कधी पडला दुष्काळ...
तहानभूकेने झाला जीव व्याकूळ.
थांबता थांबेना डोळ्यांतला महापूर!
परवाचीच गोष्ट...
कोरोनाच्या संकटात म्हणती,
पडू नका घराबाहेर.
अन् वादळपावसात उडाले घराचे छप्पर!
चारोळी
एक ओंजळ तुझी माझी
एक ओंजळ तुझी माझी
यायचास मोठ्या दिमाखात शाळा सुरु होताना
गडगडाट कडकडाट धडाडधूम होताना
किती मज्जा वाटायची तुझ्या सोबत नाचताना
थेंब मस्त मजेत झेलत होड्या हळूच सोडताना
छत्री, रेनकोट द्यायची आई, विसरुन घरी जाताना
पाणी उडवित भिरभिरत परत घरी येताना
डोकं पुसत ओरडे आई किती भिजलास पहाना
चहा गरम आल्याचा भज्यां सोबत खाताना
वय वाढले, गंमत सरली, छत्री घेऊन शहाणा
जाता येता नावे ठेवली आॅफिसला जाताना
परत आता नातवासोबत मजा येई भिजताना
एक ओंजळ तुझी माझी गट्टी पुन्हा जमताना
पाऊस
कालचा पाऊस खिडकीशी थडकला, गालावर ओघळला
तसे त्याचे येणे जाणे नित्याचे, कधी भरतीचे, कधी सरतीचे
वीज कडाडली, काच तडकली,आवाजही झाला
ढगांचा गडगडाट, तुटण्याचा आवाज मीच ऐकला
त्याला पर्वा नव्हती कशाची,कोसळत होता
आडवा तिडवा, बेभरवशी अन सैरावैरा
मेघ आटले, तोही थकला अन मग थांबला
आता मला कळले तो मला आरपार भिडला
तो मोकळा झाला आणि मी कोसळत राहिले
तडकलेल्या त्या काचेबरोबर तुटत राहिले
ती अन् पाऊस..
ती अन् पाऊस..
खूप दिवस झाले
आता पावसात
चिंब चिंब भिजुन
भरलेल सावळ ते आभाळ
नजरेत साठवणारी ती
भिजावं का थोडंतरी?
ह्या येत्या पावसात
चिंब चिंब घेऊ न्हाऊन
असा विचार करणारी ती
गेले कित्येक दिवस
दिवस? छे! कित्येक वर्ष
रिमझिम पावसाकडे बघतीये
छत्रीबाहेर हात काढुन
भिजण्याचा प्रयत्न करतीये
हा पाऊस मात्र
द्वाडच फार
भिजवले मलाच फक्त
मन मात्र तसेच कोरडे
Pages
