
तर मागच्या आठवड्यात लॉटरीच लागली. एखादा नवीन पक्षी त्याहीपेक्षा अगदीच अनपेक्षित पक्षी आला की मी म्हणते लॉटरी लागली! ( गंमत जंमत सिनेमातल्यासारखे
) माझ्यासाठी असा एखादा पक्षी बर्ड बाथवर येणे, इतक्या जवळून न्याहाळता येणे हे लॉटरीसमानच आहे!

हा धागा झाडे, पाने, फुले, फळे ह्यांची प्र. चित्रे, त्याविषयीची काही माहिती किंवा किस्से यांसाठी.
वर्षा चा पक्षांचा धागा बघताना जाणवलं की अशी झाडांची आणि अर्थात त्याबरोबर पानं , फुलं, फळ यांचाही एखादा एकत्रित साठा असेल तर..
बऱ्याच धाग्यांवर. कारण कारणाने अनेक जण असे फोटो / माहिती शेअर करत असतात.
**"
सेंट लुईस च्या बोटॅनिकल गार्डन मध्ये घेतलेले काही फोटो.

फिंच म्हटल्यावर डार्विन आणि त्याच्या theory of evolution by natural selection मधल्या फिंच पक्ष्यांच्या चोचींच्या आकृत्या डोळ्यासमोर यायच्या. भारतात कधीही हा पक्षी मी पाहिला नव्हता. आणि इथे आल्यापासून रोज दर्शन होतेय! गंमत म्हणजे यांना पाहिल्यावर मला हमखास आपल्याकडच्या चिमणीची आठवण येते पण मी असलेल्या सध्याच्या या भागात मला प्रत्यक्ष चिमणी मात्र फारशी दिसल्याचं आठवत नाही. आपल्याकडील चिमणा नाही, पण चिमणीताई मात्र इथल्या सौ. हाऊसफिंचसारख्या पुष्कळच दिसतात. तसाच करडा रंग, आकार आणि हो तशीच चोच!
Window birding अर्थात पक्षी बघायला मुद्दाम कुठेही न जाता, घरबसल्या, खिडकीतून दिसणार्या पक्ष्यांना बघणे! नुसत्या डोळ्यांनी बघा, कॅमेर्यातनं बघा किंवा दुर्बिणीतून. खिडकीतून दिसतायत ना, मग अजून काय हवं?