ऋतू बदलतोय, भिजतोय. आपले कठीण रुक्ष रूप सांडून कोवळा कोवळा होतोय. रंग बावरे वेल्हाळ रूप सांडून रुजवातीच्या जबाबदाऱ्या
पेलू पहातोय.
इतके दिवस करपून, कोळपुन गेलेल्या भुईवर वळवाचे चार थेंब काय पडले, उत्साहाने ती रोमांचित झाली आहे.
दाटून येणाऱ्या नभात ती उद्याच्या आशेचे चित्र पाहतेय. थोडीशी उन्हाची तलखी कमी होत आहे म्हणताच जराश्या सरीनन्तर ती परत वाढते. कुमारावस्थेतून यौवनात येण्याचा काळ जसा चिंतामिश्रित कुतूहलाचा असतो तसाच हा परिवर्तनाचा दोन ऋतूंच्या मधला हा काळ, हुरहुरीचा, नवीन अनुभव घेण्याचा. काया बदलून नव्या उत्साहाने तरारून उठण्याचा. लगबगीचा.
त्याची पावसाला आर्जवे
नकोच पडु आता .
तिचीही पावसाला विनंती
चिंबच भिजव आता ...
त्याचा पाऊस म्हणजे
चिखलाने वैतागलेला
तिचा पाऊस म्हणजे
मृदगंधाने शहारलेला...
पाऊस त्याचा पाऊस तिचा
दरवेळी दोघांचा ठरलेला वाद
सैरावैरा पावसासारखे दोघेही
धुमसायचे मनातल्या मनात...
पाऊस थोडा ओसरला की
दोघेही शांत व्हायचे.
श्रावणसरींनी बरसल्यावर जसे
पुन्हा ऊन पडायचे...
पाऊस तुझा पाऊस माझा
वाद शेवटी मिटायचा
मिठीत सामावताच दोघे
पाऊस पुन्हा बरसायचा...
- १२-०६-२०१८ निखिल..
पुन्हा तीच आळवणी
थेंब पहिले वहिले
धरेवर कोसळले
अंकुरती आशा थोर
मनमन थरारले
रान होईल हिरवे
दाणे अमूप टपोरे
उजाडशा झोपडीत
डोळे लकाके गहिरे
सुखावेल गाईगुरां
चारा गोजिरा हिरवा
वेली रोपट्यांना येई
धुमारून तो फुटवा
भाजी भाकरी इवली
पडे ओंजळीत का रे ?
दिस येतील सुखाचे
परजेना (पर्जन्या) सांग ना रे !!!

वाऱ्याचा सोसाट, ढगांचा गोंगाट
आकाशी झिंगाट, रोषणाई !
पाऊस मिठीत चिंब भिजला
घास भरवते एकमेकाला तरुणाई
जोडून तिफन, वादळावर आरूढ़
रचते भारुड, बैलांची सवाई !
पाऊस मिठीत चिंब भिजला
जोत सरकतो फुलवत हिरवाई
छपुर ठिबकलं ओसरीत भरलं
चिखलाचं जिणं जागीच सरकलं
पाऊस मिठीत चिंब भिजला
बळी घेत रोज एक रोगराई
― अंबज्ञ
"अगं, चलतेस का आता, उशीर होतोय. केबिन लॉक करायचं आहे मला."
"हो सर, एक मिनिट!" आपला पावसात भिजण्याचा प्लॅन न सांगता तिने चोर कप्प्यातली छोटीशी कॅरीबॅग काढून, त्यात मोबाईल आणि आणि पैसे व्यवस्थित गुंडाळून पुन्हा चोरकप्प्यात ठेवले. आणि विलास ला म्हणाली," चला"
दोघे केबिन लॉक करून गेट वर आले. विलास ची बस अजून गेटवर आली नव्हती. अक्षदा ला बाय करावं म्हणून त्याने वळून पाहिलं तर ती गायब होती. 'अरेच्चा, आत्ता तर सोबत होती, कुठे गेली? '
*पाऊस, भूमी आणि मैथिली*
-----------------------------------------------------------------------------------------------------------
कधीपासून पावसाची झड लागलीये, हा कोकणातला पाऊस सुद्धा इथल्या माणसांसारखाच वेडा, एकदा जीव टाकला कि पूर्ण बरसूनच जाणार...
आज सायंकाळी गर्लफ्रेंडला भेटायची वेळ दिली होती. ऑफिसमधून निघालो, ट्रेनमधून उतरलो, स्टेशनबाहेर पडलो, हातातून मोबाईल काढला, वेळ चेक केली, व्हॉटसप चाळायला घेतले. आणि अचानक वरून थेंबथेंब पाऊस बरसायला लागला. मोबाईल भिजू नये म्हणून मी पटकन छत्री उघडली. उजव्या हातात छत्री आणि डाव्या हातात मोबाईल. चार मिनिटांचाच रस्ता चालायचा होता आणि समोरच्या नाक्यावर गर्लफ्रेंड भेटणार होती. ती तिथे आधीच पोहोचून माझी वाट बघत होती. रमतगमत यथावकाश मी सुद्धा तिथे पोहोचलो, तसे ती मला म्हणाली. "गेल्या तीन चार मिनिटांत मी ईथून शेकडो लोकांना जाताना पाहिले. कोणीही मला या रिमझिम पावसात छत्री उघडलेली दिसली नाही.
खड्डा
लवता लवत नाही
पापणीही मिटत नाही
भाळी आभाळभर चिंतापरी
आभाळालाच पाझर नाही
खिशात दमडी नाही
घरात भाकर नाही
लाज बाजारात विकूनही
नशिबाला ठिगळ नाही
ढगात पाणी नाही
घरात नाणी नाही
फुलांत मकरंद नाही
फुलपाखरू दिसत नाही
सूर्याच्या दाहापायी आतडी
काही जळत नाही
घोटघोट हुंदका गिळून
खड्डा काही भरत नाही
हिरवी बाजीगरी
पाऊस सरता ऊन्हे कोवळी रेशीम धाग्यांपरी
दंवबिंदूंची झालर उमटे हिरव्या पात्यांवरी
नेत्रसुखद रंगांची उधळण कडे पठारांवरी
भिरभिरणारी अातषबाजी चित्र करी साजिरी
शीळ मधुर पक्ष्याची अलगद येता कानांवरी
सुंदरतेला नाद लाभला दूर दूर अंबरी
वाटा भिजल्या, हिरव्यारंगी कातळही गहिवरी
मुक्त मनाने श्रावण परते काळजात हुरहुरी
हिरव्यारंगी रंगवूनी मन देत उभारी खरी
सतेज करते पुन्हा सृष्टीला हिरवी बाजीगरी