मायबोलीकर

तुम्ही कधी टीव्हीवर झळकला आहात का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 January, 2024 - 07:26

तुमचा कधी वर्तमानपत्रात फोटो आला आहे का? असा एक धागा मायबोलीवर यापुर्वीच आला आहे.
तर आता त्याच धाग्याला अपग्रेड करून तुम्ही कधी टीव्हीवर झळकला आहात का हा धागा काढत आहे.

धागा काढायचे तात्कालिक कारण म्हणजे नुकतेच माझी मुलगी टीव्हीवर झळकली. पराक्रम म्हणाल तर एक स्त्री दुसर्‍या स्त्रियांच्या सुखदुखात सामील होताना कॅमेर्‍यात कैद झाली Happy

विषय: 

तुम्ही न पाहिलेल्या माबोकरांच्या व्यक्तीमत्वाची तुमच्या मनातील प्रतिमा

Submitted by अभि_नव on 17 February, 2016 - 03:32

ज्या माबोकरांना तुम्ही प्रत्यक्ष भेटलेले नाहीत किंवा छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्या सदस्यांच्या माबोवावरातुन तुमच्या मनात त्यांच्या व्यक्तीमत्वाची तयार झालेली प्रतिमा साकारायची आहे.

कोणाचाही अपमान करु नका आणि आपल्याबद्दल (सामाजीक संकेत पाळुन) लिहिले असेल तर अपमान वाटून घेऊ नका!

सभ्य शब्दांची मर्यादा पाळा आणि उगाच कोणत्याही उल्लेखामुळे जाती, धर्माची भावना दुखावुन घेऊ नका.

प्रेरणा - लिंक पहिल्या प्रतिसादात दिली आहे.

मायबोलीच्या वाचकांची संख्या ११ लाखावर

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

मायबोलीवर येणार्‍या वाचकांची संख्या एका वर्षात ११ लाख (११, ४३, १२४) इतकी झाली आहे.
मायबोलीने नेहमीच "आधी केले, मग सांगितले" हे धोरण आखून घेतले आहे. गेल्या वर्षातही आपण १० लाखावर मजल गाठली होती, पण हा केवळ योगायोग नाही याची यावर्षीही खात्री करून घेतल्यावर हे जाहीर करतो आहोत.

या संख्येत एक व्यक्ती कितीही वेळेस आली तरी एकदाच धरली जाते ( Unique Visitor). त्या व्यक्तीच्या भेटींची संख्या ( Visits) प्रत्येक भेटीबरोबर वाढते. मायबोलीच्या वाचकांनी गेल्या १ वर्षात मायबोलीला
३२, १०, ९८४ इतक्या वेळा भेट दिली.

या संख्येत मायबोलीकर आणि मायबोलीवर येणारे अतिथी या दोघांचाही समावेश आहे.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मायबोलीकर