लेखनसुविधा

देई भक्ती भाव

Submitted by पुरंदरे शशांक on 26 November, 2018 - 23:48

अल्प स्वल्प देई । माते भक्ती भाव । तेणे मज वाव । प्रपंच हा ।।

बैसे वो नयनी । वेगे तू माउली । कदा मायाजाळी । गुंतेचिना ।।

ह्रदी स्थिरावे गा । जगदंबे माते । सुख दुणावते । अंतर्बाही ।।

जगज्जननीये । धरावे हातासी । तेचि गा मिराशी । वाटे जीवा ।।
......................................................
वाव ..... अनावश्यक

मिराशी.... परंपरागत हक्क

मराठीत ऑफलाईन टंकलेखन

Submitted by shantanuo on 11 September, 2018 - 09:51

गुगल इनपुट टूल्स वापरून ऑनलाईन टाइप करता येते.
https://www.google.com/inputtools/

पण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टाईप करण्यासाठी त्याचा उपयोग नाही. भाषाइंडीया या साईटवरून डाऊनलोड केलेल्या इनपुट एडिटरचा अनुभव कसा आहे?
https://bhashaindia.com/downloads.aspx

शतशब्दकथा: शतशब्दकथा

Submitted by अपरिचित on 13 August, 2018 - 09:23

शतशब्दकथा

बऱ्याच दिवसापासून शतशब्दकथा लिहावसं व्हावंसं वाटत होतं.
शतशब्दकथा म्हणजे नेमकं काय तर १०० शब्दांत मांडलेली आशयघन/मार्मिक/गंमतीशीर कथा.
कथा मांडणं तसं ठीक आहे पण हे १०० शब्द मोजायचे कसे वा कोणी; ह्या प्रश्नाने मला विचारात पाडलेले. पण मनात आलं, जितक्या कथा वाचल्या त्यातील एकाही कथेने खरंच १०० शब्द पुर्ण केले असतील का? कथा टाकण्यापुर्वी येथील अॅडमिन/संपादकाने योग्य खातरजमा केली असेल का?
जर नसेल तर काही बदल सुचवले असतील का?
पण जाऊ देत काही का असेना, आपण आपले कर्म करत राहावे.
सबब, मनात काहीही किंतु न ठेवता शेवटी शतशब्दकथा लिहायला घ्यायचं ठरवलं

शब्दखुणा: 

कथा : मैत्रा - भाग २

Submitted by भागवत on 10 August, 2018 - 10:42

तुमच्याकडे कोणती फालतू सुपरपॉवर आहे??

Submitted by कटप्पा on 27 July, 2018 - 15:26

आहे का तुमच्याकडे एखादी सुपेरपॉवर जी फक्त तुम्हाला माहीत आहे? अशी फालतू पॉवर की जी तुम्हाला सुपरहिरो चा दर्जा देऊ शकत नाही पण वेगळी आहे ?

आता माझे बघा - मी कधी हवे तेंव्हा झोपू शकतो. अगदी ढोल ताशे वाजत असतील तरी मी ठरवले झोपायचे समजा तर मी पाच मिनिटात झोपू शकतो. दुपारी जेवून, संध्याकाळी 7 पर्यंत झोपून परत 1 तास डिनर करून परत झोपू शकतो. आहे ना फालतू पॉवर?

माझा रूममेट - त्याच्याकडे एक युनिक पॉवर आहे. त्याला झुरळांचा वास येतो. रूम मध्ये झुरळ असेल त्याला वास येतो आणि तो सांगतो पण कोणत्या बाजूने येतोय.

शब्दखुणा: 

तेवढ्यापुरताच होता मामला

Submitted by सुप्रिया जाधव. on 19 April, 2018 - 19:22

ज्या क्षणी तू हात माझा सोडला
जीवनाने पाय मागे ओढला

केवढा उद्विग्न झाला चेहरा
कोणता होता विषय तू काढला ?

ना स्वत:चा, तो तुझा होइल कसा ?
केवढा झाला उशिर समजायला !

एवढ्यासाठीच बहुधा थांबलो
तेवढ्यापुरताच होता मामला

पोखरत काळीज आहे काळजी
सातवा तर जन्म नव्हता आपला ?

एवढ्यासाठीच चालत राहते
परतण्याचा दोर आहे कापला

सुप्रिया

कधीतरी तू ठेव स्वतःला माझ्या जागी

Submitted by सुप्रिया जाधव. on 1 March, 2018 - 13:58

पूर्ण रात्रभर एक चांदणी होती जागी
आसपास रेंगाळत होता चन्द्र विरागी !

अर्ध्यावरती बोट सोडले प्रत्येकाने
आश्रयास माझ्या आला एकांत अभागी

उठता-बसता इथे-तिथे काष्ठी-पाषाणी
एक चेहरा खुणवत असतो जागोजागी

अतातरी तू वाग स्वतःच्या मनासारखे
मनासारखे जर त्याच्या अवघे जग वागी

अखंड होतो तेव्हा जो तो निरखत होता
तुकडे झाल्यावर जो तो टाळाया लागी

झिजून गेल्या कातळास हे विचारले मी
काय मिळवले शेवटास तू बनून त्यागी ?

तुझे देवपण तुझी थोरवी मान्य मला, पण...
कधीतरी तू ठेव स्वतःला माझ्या जागी

सुप्रिया

Pages

Subscribe to RSS - लेखनसुविधा